मामाचे गाव

मामाचे गाव

खडखड खडखड छकडा गाडी,

धुळीच्या रेषा हवेत काढी,

जरा भूतकाळात डोकावू या,

मामाच्या गावाला जाऊ या.

मामांचा वाडा मोठा,

घरा समोर गुरांचा गोठा,

वासरांच्या मागे धावू या,

मामाच्या गावाला जाऊ या.

मामाची बायको साधीभोळी,

प्रेमाने करायची रस आणि पुरणपोळी,

विविध खाद्यपदार्थ चाखू या,

मामाच्या गावाला जाऊ या.

मामाची बायको प्रेमळ फार,

भाच्यांवर प्रेम अपरंपार,

आजीआजोबांची माया आठवू या,

मामाच्या गावाला जाऊ या.

मामा मोठा ईजारदार,

गरीबांना त्याचा मोठा आधार,

असा सुरेख भूतकाळ आठवू या,

मामाच्या गावाला जाऊ या.