ईरा माझी लाडकी

ईरा

व्वा  ईरा !! व्वा !!!

काय वर्णन करू तुझे,

तुला पाहून वाटतं जणू,

जन्माचे सार्थक झाले माझे.

जसं तुला पाहिलं आणि,

जशी ब्लॉग लिहायला सुरुवात केली,

तशी काय जादू झाली,

लेखणी माझी आणखीनचं तल्लख झाली.

खरचं आम्हा नवोदित लेखकांना,

जणू मिळाली पर्वणी,

लेखणाची आवड मला आणि,

आपोआप सरसावली माझी लेखणी.

ईरा तुझा वाचक वर्ग आहे खुप,

आणि प्रतिक्रिया लय भारी,

कवयित्री / लेखिका झाल्याच्या आनंदात,

मन घेऊ लागलं उंच उंच भरारी.

मरगळलेल्या मनाला ईरा ब्लॉग्ज वाचून,

येतो वेगळाचं उत्साह,

संजना मॅडम आणि टीमचे,

खरचं आहे खुप सहकार्य.

ईरा म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वतीचे मिलन,

लेखक आणि वाचक वर्ग पाहून,

वाटतं जणू सुरु आहे स्नेहसंमेलन.

म्हणून ज्यांना लेखणाची आवड आहे,

त्यांनी घ्या लेखणी आणि करा सुरुवात,

मनात येणाऱ्या कल्पना,

उतरतात ब्लॉग वर आपोआप.

म्हणूनचं म्हणावसं वाटतं माझी लाडकी ईरा,

घे गरुडझेप आकाशी,

लक्ष मात्र असू दे,

तुझ्या लेखक / वाचक वर्गापाशी.