मावळती आशा

मावळती आशा

समजायला लागल्यापासून सवय झाली मला,

पदोपदी संघर्षाची,

अन् नकळतपणे,

लादल्या गेलेल्या निर्णयांची.

तरुणपणी मग कसल्या इच्छा-आकांक्षा

रूंदावणार तरी कशा मनाच्या कक्षा,

कशी मिळणार मनाला उभारी,

वडिलधाऱ्यांच्या धाकाच्या भिंती भारी.

प्रत्येकाचे मन सांभाळतांना,

स्वतः च्या मनाने खचत जावे,

वरवर हसरा चेहरा ठेऊन,

कुठवर जगावे.

कधी कधी वाटते असेच जाईल,

जीवन माझे संपून.

मृत्यूनंतरच मला मिळेल न्याय,

हीच आशा ठेवून.

मागणे माझे जास्त नाही,

फक्त माझे म्हणणे समजून घेणारी व्यक्ती हवी,

नेहमीच मला प्रश्न पडतो,

आपल्याच वाट्याला ही समस्या कां यावी.

काही सांगावे,बोलावे म्हटले तर,

मन भरुन येतं अन् डोळे लागतात झरायला,

खरं तर ते अश्रू नसतात,

ते मनाच्या जखमेचे भळभळणारे,

रक्ताचे थेंब असतात.



री कशा मनाच्या कक्षा.

कशी मिळणार मनाला उभारी,

वडिलधाऱ्यांच्या धाकाच्या भिंती भारी