स्वप्नातली गोष्ट

स्वप्न

एक दिवस कानी माय,

गंमतच झाली.

सपनात माह्या चक्क,

एक परी आली.

दिसत होती माह्या सारखीच,

पण ओळखलं नाही तीले,

कां काउन मले वाटे,

ती मीच तर नव्हे.

गप्पा झाल्या गोष्टी झाल्या,

म्हणली आहेस तू कशी,

डोयात तीच्या बघून म्हणलं,

जशी तुले दिसते तशी.

लय आनंद झाला मले,

तीले जवळून बघून,

ते ही भल्ली हरीकली,

मले समोर पाहून.

लय फिरलो,लय हासलो,

खुप खुप मजा केली,

दोरीवरल्या उड्या खेळतांना,

अचानक पडली मी खाली.

जशी पडली खाटेवरुन,

मायनं पिरगयला माह्या कान,

अन् एक कानाखाली दिली हाणून,

जाग आली मले ,मायचा अवतार बघून.


🎭 Series Post

View all