अंतःकरणाची शुद्धता

शुद्ध अंतःकरण

शुद्ध अंतःकरणातून प्रसवणार,

चांगले शुद्ध विचार,

बीज चांगले असेल तर,

फळेही चांगलीच मिळणार.

मनात ठेवा नेहमी शुद्ध आणि स्वच्छ विचार,

वाईट भावना ठेऊन काय साध्य करणार.

जसा चष्मा असेल तसेच जग दिसणार,

स्वच्छ नजरेने बघाल तर सारे जग सुंदर दिसणार.

कुपमंडुक  वृत्ती सोडा,जरा बाहेरही डोकवा

बाहेर आहे सुंदर जग,ते ही पाहायला शिका.

कुठवर जगणार स्वार्थी भावना ठेऊन,

निस्वार्थ जीवन जगा अगदी भरभरून.

मनुष्य जन्म एकदाच मिळतो,

घ्या तुम्ही जगून,

नका बघू इतरांकडे,

संकुचित भावना ठेऊन.

खेळीमेळीने राहा, पारदर्शी राहा

पोटात एक आणि ओठात एक ठेऊ नका तुम्ही,

जातांनाचा मार्ग एकच आहे,

याची जाणीव असू द्या सर्वांनी.








🎭 Series Post

View all