Jan 26, 2022
नारीवादी

मातृत्वाचा प्रवास

Read Later
मातृत्वाचा प्रवासमातृत्वाचा प्रवास

मातृत्वाच्या वाटेवर,
पडले पहिले पाऊल |
अवचित जेव्हा लागली,
इवलीशी नवखी चाहूल ||१||

ठोका तुझ्या हृदयीचा,
माझ्या अंतरी धडधडला |
उदरातच तुझा स्पर्श अनुभवता,
जीव हा सुखावला ||२||

कोडकौतुकातच सारा
नऊ महिन्यांचा काळ सरला |
डोहाळे माझे पुरविताना,
जीव साऱ्यांचाच दमला ||३||

बाळंतपण म्हणजे जणू,
पुनर्जन्मच बाईचा |
बाळाबरोबरच तर खऱ्या अर्थाने,
जन्म होतो आईचा ||४||

कुशीत तुला पहिल्यांदा घेता,
जन्म सार्थकी लागला |
प्रसववेदनेचा त्रास क्षणार्धात,
आनंदाश्रूंच्या सरीत विरला ||५||

© केतकी ❤️


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now