चारोळी..

Short Poem




1) 

दुःखात असताना
आठवण होते देवाची
आणि सुखात असताना
गरज नसते कोणाची
2)

जाताना बरोबर 

काहीही नेत नसतो

तरीही मनुष्य काहीतरी

मिळवण्यासाठी धडपडत असतो


3)

जे नशिबात असतं

ते भोगावं लागतं

कारण आपल्या दोषांना 

ही कारण हवं असतं


4)

जन्मतः मिळतात 

अनेक नाती

मृत्यू नंतर फक्त उरते

आपली  किर्ती


5)

प्रत्येकाला चुकीचा 

पश्चाताप होत असतो

पण हे कळल्यावर

उशीर झालेला असतो


6)

मनुष्य किती 

वेडा असतो

जे नाही त्याचा 

ध्यास घेत असतो


7)

स्वतः साठी जगणं

सोप असतं

दुसऱ्या साठी जगणं

अवघड असतं


8)

मन किती 

वेडं असतं

जे आपलं नाही 

त्यासाठी रडत असतं


9)

देव आहे 

आपल्या ह्रदयी 

तरी शोधतो

त्याला ठायी ठायी


10)


सुख हवसं वाटतं

दुःख नकोसं वाटतं

पण न मागता

दोन्ही मिळत असतं


11)


सुखापेक्षा मला

दुःखच जवळचं वाटतं

कारण दुःखातच जीवन 

काय आहे हे समजतं