पिंजरा सोन्याचा भाग ३
मागील भागात आपण पाहिले की अखिल निमिषाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जपत असतो. पण तिने कोणाही परपुरूषाशी बोललेले त्याला आवडत नसते. बघुयात काय होईल दोघांचे ते?
" अखिल..."
" काय ग? एवढी सिरियस का झाली आहेस?"
" माझी प्रेगनन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.." निमिषाला धक्का बसला होता.
" ही एवढी आनंदाची बातमी तू एवढे तोंड पाडून का सांगते आहेस? मला खूप म्हणजे खूपच आनंद झाला आहे.." अखिलला झालेला आनंद दिसून येत होता. दोघांनीही लग्नाआधी ठरवले होते की किमान दोन वर्ष तरी बाळ होऊ द्यायचे नाही. त्यामुळे हा अचानक बसलेला धक्का समजून घ्यायला निमिषाला जड जात होते. तिला हे नक्कीच माहित होते की गर्भपाताचा निर्णय कोणालाच मान्य होणार नाही. कोणाचेही मन दुखावण्यापेक्षा बाळ होऊन जाऊ दे हेच तिने मनाशी ठरवले. अपेक्षेप्रमाणेच दोघांच्याही घरचे ही गोड बातमी ऐकून खुश झाले होते. कळतनकळत निमिषाही आपली आधीची चिडचिड विसरून येणाऱ्या बाळाच्या सरबराईत गुंतली होती. असेही तिच्या बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष देणारा अखिल आता तर तिचा एक शब्दही खाली पडू देत नव्हता. ऑफिसमधल्या तिच्या मैत्रिणी यावरून तिला चिडवायच्या. आता तो तेही मनावर घेत नव्हता. इतरांशी ती बोलत असल्यास आता तो लक्ष देत नव्हता. निमिषाला आपण सौख्याच्या शिखरावर असल्यासारखे वाटत होते. चांगली नोकरी, काळजी घेणारा नवरा, येणाऱ्या बाळाची लागलेली चाहूल.. सातवा महिना लागला. अखिलेने थाटात निमिषाचे डोहाळजेवण केले.. त्यासाठी खास त्याचे आईबाबा, दादावहिनी गावावरून आले. आपला जावई आपल्या मुलीचे एवढे कौतुक करतो आहे हे बघून निमिषाच्या घरातलेही खुश होते. दोन दिवस राहून अखिलचे दादावहिनी जायला निघाले. निघताना अखिलच्या वहिनीने निमिषाला विचारलेच.
" तुला राग येणार नसेल तर एक विचारू का ग?"
" राग कसला वहिनी? बोला ना.."
" त्याचे काय आहे, आपले जास्त बोलणे कधी झाले नाही ना म्हणून आपले विचारले. अखिल भाऊजी नीट वागतात ना ग तुझ्याशी?"
" म्हणजे?" निमिषाला क्षणभर समजलेच नाही.
" म्हणजे? कसं सांगू? बोलायला वागायला नीट आहेत ना?" वहिनी अडखळत बोलत होत्या. निमिषाच्या डोळ्यासमोरून गेल्या वर्षभरातल्या घटना तरळून गेल्या. ज्या गोष्टी सख्ख्या मैत्रिणीलाही सांगता येत नाही त्या वहिनींना कशा सांगायच्या, हा प्रश्न तिला पडला.
" हो वागतो ना नीट. काही प्रॉब्लेम आहे का वहिनी?" निमिषाने उलट विचारले. त्या पुढे काही बोलणार तोच अखिल आणि दादा तिथे आले.
" काही खाजगी गप्पा चालल्या होत्या वाटते?" दादांनी वहिनींना विचारले. त्यांचा तो स्वर ऐकून निमिषाच घाबरली.
" नाही. फक्त आता कशी काळजी घ्यायची ते समजावत होते." वहिनी चाचरत म्हणाल्या. अखिल आणि दादांच्या चेहर्यावर सुटकेची भावना दिसल्यासारखे निमिषाला वाटले. वहिनींकडे बघून निमिषाच्याच पोटात तुटले.
" तुम्ही सांगितलीत तशी मी नक्की काळजी घेईन.. बाळाचीही आणि माझीही." ती वहिनींच्या हातावर हात ठेवत म्हणाली. त्या तिच्याकडे बघत कसनुसं हसल्या. ते सगळे गावाला परत गेले. निमिषाही निघणार होती आता माहेरी जायला. आईबाबांना सोडून अखिल परत आला. निमिषा स्वतःची बॅग भरत होती.
" झाली तयारी?" अखिल तिच्याशेजारी बसत म्हणाला.
" हो.. तू येशील ना आईकडे मला भेटायला?"
" हे काय विचारणे झाले? ऑफिसला जाईन. सकाळचा नाश्ता करेन.. तिथेच काहीतरी खाऊन संध्याकाळी तुम्हाला भेटायला येईन.. माहित नाही बाकीचा वेळ मी तुमच्या शिवाय कसा काढेन ते."
" आपल्या काकू येतील ना स्वयंपाक करायला.."
" हो पण एकट्याने जेवण जाईल का मला?"
" अखिल मी नक्की जाऊ ना?" निमिषाने विचारले..
" म्हणजे काय? डॉक्टरांनी तुला जास्त दगदग नको सांगितले आहे म्हणूनच तर तू आताच मॅटर्निटी लिव्ह घेऊन घरी राहते आहेस ना. तिथे कमीत कमी आईबाबा समर तरी आहेत. इथे काय मी एकटा भुतासारखा.." अखिल बोलत होता. निमिषाने फोन उचलला..
" हॅलो आई.. मी ना डिलीव्हरीनंतरच येते घरी रहायला.."
" हो... मला माहित आहे तू किती तयारी करून ठेवली आहेस.."
" मी नंतर राहते ना चांगले चार महिने.. आता इथे हा एकटा राहिल ग.."
" नको ना चिडू.. प्लीज.. मी संध्याकाळी येऊन जाते.."

" तू जाणे का कॅन्सल केलेस?" अखिलने विचारले.
" एवढ्या प्रेमळ बाबाला एकटे सोडून मला आणि बाळाला चैन पडणार नाही म्हणून.. पण नंतर मात्र आम्ही तिथे जास्त राहणार बरं. " निमिषा हसत म्हणाली.. अखिलच्या चेहर्यावर आपली योजना यशस्वी झाल्याचा आनंद होता..

नक्की काय आहे अखिलच्या मनात? बघू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा