पिंपल्स आणि मी... थोडक्यात...

पिंपल्स आणि मी थोडक्यात सांगते...

"आई गं, किती आले बघ ना चेहऱ्यावर पिंपल्स ? " वैदू आरशात चेहरा पाहत आईला बोलते.


" अगं बाळा ह्या वयामध्ये येतात चेहऱ्यावर, काळ्जी नको करुस . " आई वैदूला बोलते.


" ह्या वयामध्ये म्हणजे ? " वैदू आईला विचारते.


" बघ पिंपल्स यायचे बरेच कारणे असतात, जसं की. वयात येताना, चेहरा स्वच्छ न धुतल्यामुळे, आणि तेलकट तुपकट खालल्यामुळे. " आई बोलते.


" अरे बापरे, म्हणजे आता मी काय करू ? आणि हे जाणार कसं ? शी मी किती घाणेरडी दिसणार ? चल आपण डॉक्टरकडे जाऊया. " वैदू बोलते.


" अगं बाळा डॉक्टर कडे कशाला जायचं, इतकं काही झालं नाही ये. " आई वैदूला सांगते.


" तू आता वयात येते आहेस, पाळीच्या वेळेला ह्या गोष्टी होणार वैदू !" आई बोलते.


वैदू आरशात पाहते आणि बोलते, " बरं म्हणजे एकच येणार ना की खूप साऱ्या ?"


आई हसते आणि बोलते, " एकच बाळा आणि आली तरं दोन येतील किंवा काही वेळेस येणार ही नाही. "


वैदू पुन्हा आईला प्रश्न करते," मग मी काही लावु का ह्यांना, म्हणजे येणार नाही . "


आई बोलते, " कशाला काय गरज ? काही लावु नकोस. मासिक पाळी येणार तरं तुला पिंपल्स ही येणार. ते नैसर्गिक आहे त्याला काही लावायची गरज नाही."


वैदू आरशात पाहत बोलते, " आई गं, पण हे का येते ? "


आई बोलते, " बाळा जेव्हा तुझ्या शरीरातील हार्मोन्स बदलतात तेव्हा तुला पिंपल्स येतात. "


वैदू बोलते, " मग आता ? "


आई बोलते, " ते तुला प्रत्येक महिन्याला सांगणार की आता तुझी मासिक पाळी जवळ आली आहे करून, आणि मग आपोआप जाणार. "


वैदू हसते, " अरेरे, किती गमतीशीर आहे हे सगळं. "


आईसुद्धा तिच्या जोडीला हसते., " चल तुला आता कडुनिंबाचा पाला देते कुटून तो लाव त्याला. "


मासिक पाळी..

वयात यायच्या वेळेला मुलींना किती समजून सांगाव लागत ना ? आणि मासिक पाळी आली पहिल्यांदा की त्यांना किती प्रश्न पडतात. मग हेच का ? ते तसंच का नाही ? वगरे वगरे.


आम्हाला पहिल्यांदा शाळेत ह्या गोष्टी समजावून सांगण्यासाठी खास तास असायचा. पण आता ते इतकं कठीण जात नाही समजावून सांगायला. कारणं जनरेशन गॅप..


आमच्या वेळेस पाळी आली की कपडा कसा घ्यायचा हे सुद्धा आई समजावून सांगायची. आता कपडा, सॅनिटरीपॅड च्या ही पलीकडे उत्तम साधन शोधली गेली आहेत.

सगळं इतकं सोप्प झालय की अवघडल्या सारखे वाटतं नाही.

कारणं थँक्स टु मेन्स्ट्रुनेशन कप...


...   End