पिल्लू मत कहो ना!

एका छोट्याचे विनोदी मनोगत



आलेलेले!किती गोल!!माझं पिल्लू ते!

आम्ही दिवसातून हजारदा आमच्या बच्चूला हे म्हणत असतो.आता आपण प्रेमाने म्हणत असतो.पण परवा हम पाच सिरियलचा विषय निघाला आणि त्यातील प्रसिद्ध संवाद आंटी मत कहो ना। यावरून वाटले,लहान मुलांना असे वाटत असेल का? तर माझ्या छोट्या वरदच्या स्वभावाचे,अतिशय सुस्पष्ट उच्चार आणि नेमके बोलण्याचे निरीक्षण करून लिहिलेले हे विनोदी मनोगत.



माझी मम्मा आणि पप्पा सारख अस पिल्लू-पिल्लू करत असतात.(माणसाच्या पिल्लाला बाळ म्हणतात,हे दोघेही शिकवतात बरं शाळेत.)


थांबा! गोंधळू नका. माझे नाव वरद. वय वर्ष दोन पूर्ण होतील येत्या मे महिन्यात.

आता मला सगळं बोलता येत आणि समजत देखील.मोठा झालो ना मी.



तर मी काय सांगत होतो,हा बघा म्हणजे ह्या पप्पा आणि मम्मीला लहानपणी सगळे पिंटू,पिंकी वगैरे अस म्हणायचे.


काय म्हणता?मला कसे माहीत?हमारे कान बहोत कुछ सूनते है। आपण तर बाबा पोटात असल्यापासून सगळं ऐकत आलोय.

तर आता तुम्हीच सांगा परवा मम्मी फोनवर सीमामावशी बरोबर बोलत होती,"अग,वरद पिल्लू ना सारख इकडे तिकडे पळत असत."


याक, कस वाटत हे ऐकायला.आता दुसरी गोष्ट ते पिल्लू म्हणजे व्याकरणात नपुसकलिंग(गोडबोले दवाखान्यात आणि पेठेत जन्मलोय म्हंटल मी.) असते ना.


कमऑन यार मम्मी,मी बॉय आहे.हे अस \"ते पिल्लू \"कुठे म्हणतात का? बरं हे झालं फोनवर,प्रत्यक्षात सुद्धा कोणीही गाल पकडत आणि सुरू आलेलेले, किती गोडाय पिल्लू.मला ना पपी असल्याचं फिलिंग येत माहितीय.


आता परवाची गोष्ट रस्त्यात एक काकू भेटलेल्या.मी त्यांना म्हंटल हाय काकू!तर चिडल्या ना.

आता ह्यात काय चिडायचे.तर पप्पा लगेच म्हणाला,"पिल्लू,अस काकू नाही म्हणायच."

वा रे वा!म्हणजे यांनी मला पिल्लू,बाबडी, सानू,पानु म्हंटलेलं चालत आणि......तर आता तुम्ही म्हणाल हा पोरगा चिडलाय का एवढा?


तर सांगतो.आमच्या मामाच्या घरी गेलेलो.तर तिकडे मम्मी मला बागेत घेऊन गेली.तिकडे एक गोड पोरगी आलेली.मस्त गुलाबी फ्रॉक,त्यावर छोटा जंबु, लाल गाल. काय मस्त दिसत होती.आपल्याला जॅम आवडली.तर मी चांगलं बॉल खेळत होतो.ती झोक्यावर बसलेली.

तेवढ्यात मम्मी म्हणाली,"पिल्लू,तिकडे नको जाऊस."अस्सा राग आला ना.कचरा झाला ना सगळा.


लहान असलो म्हणून काय झालं.हिरो पर्सनॅलिटी आहे आपली.एकदम टकाटक.

आता तुम्ही मला सांगा टॉम क्रूझला कोणी गोडुल म्हंटलं किंवा गेलाबाजार आपल्या गश्मीरला कोणी चॉकलेट म्हंटलं. कस वाटेल ते?

मीसुद्धा मिनी व्हर्जन आहे.हँडसम दिसण्यात,पप्पांवर गेलो ना(रंग मम्मीचा बरं का)


तर अशा एवढ्या हँडसम मुलाला पिल्लू म्हणायच.अरे पिंट्या म्हणा,चिंटू म्हणा.आजीने एवढं छान गणपतीचे नाव ठेवले वरद ते म्हणा.


पण तरीही एक सिक्रेट सांगतो हा,मम्मी पप्पा कामावरून आले की मला जवळ घेऊन लाड करतात ना भारीवाली फिलिंग येते.


पण.....पिल्लू मत कहो ना!

आखील भारतीय पिल्लू मत कहो ना संघटनेचा अध्यक्ष वरद.