Login

फुलले नाते प्रेमाचे❤️...भाग 3

Katha Don jiwanchi


फुलले नाते प्रेमाचे❤️...भाग 3


आधीच्या भागात आपण पाहिले की,


अभिजीत आणि आनंदी दोघेही फिरायला गेले. तिथे एकमेकांसोबत वेळ घालवला. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. रात्री जेवण झाल्यानंतर दोघेही बाहेर शतपावली करायला निघाले. थंड वाऱ्यामुळे आनंदीने शाल ओढली. दोघेही एका बाकावर बसले, आनंदी अभिजीतला बिलगून बसली, तिला अस बघून अभिजीतला खूप बरं वाटलं.

आता पुढे,

दोघेही रूम वर आले,
“आनंदी तू वर बेड वर झोप, मी इथे सोफ्यावर झोपतो.”

“नाही सर प्लिज, तुम्ही इथे बेडवर झोपा. अस बरं दिसत नाही.”

“अग त्यात काय एवढं, मी झोपेन इथे. तू रिलॅक्स होऊन झोप.”

आनंदी बेडवर झोपली, अभिजीत सोफ्यावर झोपला.

सकाळी आनंदीला थोडा उशिरा जाग आली, आनंदी उठली तेव्हा अभिजीत उठून फ्रेश झालेला होता. त्याने दोघांसाठी गरमागरम कॉफी आणली.

“गुड मॉर्निंग आनंदी..” अभिजीत

“गुड मॉर्निंग.” आनंदी

“काय झोप झाली की नाही.” अभिजीत

“माझी झोप झाली पण तुमची झोप झाली का? तुम्ही रात्रभर सोप्यावर झोपला होतात ना?” आनंदीला थोडं वाईट वाटत होतं.

“हो हो माझी छान झोप झाली आहे, मी एकदम फ्रेश टवटवीत आहे. आपल्या दोघांसाठी कॉफी घेऊन आलोय. पटकन जा फ्रेश होऊन ये. आपण कॉफी घेऊयात.” अभिजीत

आनंदी फ्रेश होऊन आली, दोघांनी कॉफी घेतली.

थोड्यावेळाने आनंदीचा मोबाईल वर फोन आला. आनंदीने बघितलं तर फक्त एक नंबर होता. कुणाचा फोन आहे याच विचारात तिने फोन उचलला.

“हॅलो.”

“हॅलो माय चार्मिंग, माय डार्लिंग काय सुरू आहे तुझं?”

“कोण बोलतंय ?” आनंदीने आश्चर्याने विचारलं.

“माझा आवाज विसरलीस इतक्या लवकर.”
“कोण बोलतंय?”

“मला वाटलं नव्हत इतक्या लवकर तू मला विसरशील, पण ठीक आहे आता माझा आवाज तू विसरलीस तर मी तुला आठवण करून देतोच. मी तोच आहे ज्याच्याशी तू लग्न करणार होतीस तू.”

“तुझी हिम्मत कशी झाली मला फोन करण्याची, हे बघ मी तू यानंतर मला कधीच फोन करायचा नाही.”

“अरे बापरे घाबरलो, मी तर घाबरलो..” असं म्हणत तो जोरजोरात हसला.

“तुला काय वाटलं तुझं लग्न झालं म्हणजे तू आता माझ्या तावडीतून सुटलीस? नाही असं कधीच होणार नाही.” पुन्हा जोरजोरात हसण्याचा आवाज आला.

आनंदीने फोन ठेऊन दिला, तिला घाम फुटलेला होता, ती घाबरली होती.
अभिजीत फ्रेश होऊन बाहेर आला, त्याची नजर या भुतासारख्या उभ्या असलेल्या आनंदीकडे गेलं.
तो आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघू लागला, तो तिच्याजवळ गेला.

“आनंदी अगं काय झालं? अशी का उभी आहेस?”

आनंदीच लक्षच नव्हतं, ती स्तब्ध उभी होती. अभिजीतने पुन्हा तिला आवाज दिला.

“आनंदी अग काय झाले? का अशी आहेस?”

तिच्या हातात मोबाईल बघून अभिजीतने पुन्हा विचारलं.
“कुणाचा फोन आलेला होता का? आई बाबा बरे आहेत का? की अजून काय झालं? बोल ना ग कुणाचा फोन होता? तुझ्या हातात मोबाईल दिसतोय, कुणाचा फोन आला होता का?” अभिजीत तिला काळजीने विचारत होता. पण आनंदी काहीच बोलत नव्हती.

आनंदी स्तब्ध होऊन बेडवर जाऊन बसली.

“निनाद..” तिच्या तोंडून एकच शब्द निघाला.

“निनाद?? त्याचं काय?”

“त्याचा फोन होता.”

“आनंदी तू काय बडबडतेस?”

“हो खरंच निनादचा फोन होता, त्याने मला फोन केला होता.”

“अग पण तो तुला फोन का करेल आणि त्याचा आणि आता तुझा काही संबंध नाहीये. तो का करेल तुला फोन?”

“केला त्याने मला फोन, ती स्तब्ध होऊन बोलत होती,

“तो मला म्हणाला माय डार्लिंग माय चार्मिंग कशी आहेस? मला विसरलीस का पण मी तुला नाही विसरलो आणि मी तुला माझ्या आयुष्यातून असं जाऊ देणार नाही.” असं म्हणून तो जोरात हसायला लागला.

“आनंदी तू बरी आहेस ना? अगं काय बोलतेस?”

“खरच बोलते, हा बघा नंबर. बघा तुम्ही, या नंबर वर फोन लावून बघा निनादचाच फोन होता.”

“ओके ओके तू रिलॅक्स हो, पाणी घे, रिलॅक्स हो मी बघतो काय करायचं ते.” अभिजीत ने तिला पाणी दिलं. ती पाणी प्यायली, थोडा वेळ शांतपणे बसली.
“आनंदी रिलॅक्स हो, कुठलाही विचार करू नको. असेल कुणाचा तरी फोन चुकून तुला लागला असेल, त्याला दुसऱ्याशी बोलायचं असेल पण तू तुझ्याशी बोलला. असं काही असू शकतं.”
“अरे पण तू बोलला ना मी निनाद बोलतो.”

“आनंदी एकाच नावाची अनेक माणसे आहेत या जगात, तू उगाच काही टेन्शन घेऊ नकोस आणि आता मी आहे ना तुझ्यासोबत तुला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही.” असं म्हणून त्याने तिला जवळ घेतलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
आनंदीने डोळे घट्ट मिटले पण तो निनादचा हसण्याचा आवाज तिच्या कानात गुंजतच होता.

‘खरंच तो निनाद होता का? आणि होता तर त्याने मला फोन का केला? काय झालं असेल? का फोन केला असेल आणि तो असा का बोलला मला?’ आनंदी तिच्याच विचारात गुंतली.

“आनंदी अजूनही तोच विचार करतेस का?”
“नाही.”
“चल मग तयार हो आपण बाहेर जाऊयात, तुला थोडं बरं वाटेल.”

“आपण थोड्यावेळाने गेलो तर नाही का चालणार?”

“अग पण बाहेर गेलो तर तुलाच बरं वाटेल, इथे बसलीस ना तर तेच तेच विचार तुझ्या डोक्यात फिरत राहतील. त्यापेक्षा तू तयार हो छान, आपण बाहेर जाऊया.”
होकारार्थी मान हलवत आनंदी उठली, ती छान तयार झाली.

“आनंदी एक मिनिट.”

“काय झालं?”

“एकच मिनिट थांब.” असं म्हणून अभिजीत आत गेला. आतून काहीतरी घेऊन आला.

“हात समोर कर.” आनंदीला बोलला. आनंदीने हात समोर केले. त्याने हातावर एक वस्तू ठेवली.

“काय आहे.”

“तूच बघ काय आहे.”

आनंदीने तो पॅकेट उघडला, तर त्यात छान एक वन पीस होता. पिंक कलरचा घेरदार नक्षीकाम केलेला वनपीस होता.


“आनंदी आवडला तुला?”

“हो खूप छान आहे.”

“मग घाल लवकर प्लिज.” त्याने रिक्वेस्ट केल्यानंतर आनंदीने तो ड्रेस घातला.

आनंदी त्या ड्रेस मध्ये खूप सुंदर दिसत होती. तिचा चेहरा आणखीच खललेला दिसत होता. आज अभिजीतला तिच्याकडे फक्त बघावसं वाटत होतं. तिच्या सुंदरतेला कुणाची नजर लावू नये म्हणून त्याने काळी टिकही तिला लावून दिलेली होती.

आनंदीने ही आरशात स्वतःला बघितलं, तिलाही स्वतःचा हेवा वाटायला लागला खरंच मी इतकी छान दिसते ती स्वतःलाच प्रश्न विचारून खुदुखुदू हसायला लागली. तिला गालातला गालात हसताना बघून अभिजीतही सुखावला.

“आनंदी निघायचं ना?”

“हो हो निघूया. दोघे एकमेकांच्या हातात हात घालून निघाले, त्यांचा दिवसभराचा प्लॅन सेट झालेला होता. आणि रात्री कॅण्डल लाईट डिलरचा प्लॅन झालेला होता. दोघेही फिरायला जायला निघाले ठरल्याप्रमाणे त्यांना न्यायला गाडी आली. दोघेही गाडी बसले आणि त्यांचा प्रवास सुरू झाला.

गाडीमध्ये आनंदी पुन्हा गप्प होती, अभिजीतने तिला बोलत करण्याचा प्रयत्न केला.
“आनंदी तुला माहितीये आता आपण ज्या जागेवर चाललो ना ती जागा तुला खूप आवडेल छान आहे, तुला तिथे खूप फ्रेश वाटेल.”

आनंदीने फक्त चेहऱ्यावर हलकी स्माईल आणली.

“काय आनंदी अजूनही तोच विचार करतेस का?”

“नाही नाही खरंच मी कुठलाही विचार करत नाहीये.” दोघांच्या गप्पा सुरू होत्या. दोघे एकमेकांच्या गप्पात रंगून गेले होते. एकमेकांच्या हातात हात घालून डोळ्यात डोळे भिडवून दोघेही बोलत होते.

बोलता बोलता विषय प्रेमाकडे वळला आणि आनंदी खाली मान टाकून लाजली, तिचा लाजलेला चेहरा बघून अभिजीतने तिला जवळ घेतलं, तिच्या हाताचं हळूच चुंबन घेतलं, तिच्या माथ्याचा चुंबन घेतलं.

क्रमशः





0

🎭 Series Post

View all