जलदलेखन
फुकटचा 'घरगडी'
भाग- 1
फुकटचा 'घरगडी'
भाग- 1
"अग्गोबाई! गिफ्टचा एवढा मोठा बॉक्स... नोकरच लागला असेल आणायला." इती नीता
हे ऐकून सगळ्या मैत्रिणी हसायला लागल्या.
"मलाही असंच मोठ्ठ गिफ्ट आणायचं होतं गं काहीतरी राधिकासाठी.
पण...आणायचं कसं बाई? म्हणून मी पाकिटात पैसे घालून घेऊन आले.
आता ते किती ते नका विचारू बरं. नाहीतर....
हे ऐकून सगळ्या मैत्रिणी हसायला लागल्या.
"मलाही असंच मोठ्ठ गिफ्ट आणायचं होतं गं काहीतरी राधिकासाठी.
पण...आणायचं कसं बाई? म्हणून मी पाकिटात पैसे घालून घेऊन आले.
आता ते किती ते नका विचारू बरं. नाहीतर....
माझ्याकडे काही नोकर बिकर नाही बाबा ."
परत सगळ्या मैत्रिणी खदखदून हसायला लागल्या.
" अगं नीता एवढं बोलण्या अगोदर वीणाला विचार तर खरं हा गिफ्ट चा बॉक्स कुणी आणला ते. "
कल्पनाने हसत हसत चिमटा काढला.
कल्पनाने हसत हसत चिमटा काढला.
"खरंच कोणी आणला ग बॉक्स वीणा?"
" माझा ' फुकटचा घरगडी' आणखी कोण?" इति वीणा
" माझा ' फुकटचा घरगडी' आणखी कोण?" इति वीणा
" हो तेच तर म्हणते ना मी तिच्याकडे घरगडी आहे. माझ्याकडे नाही ना. मग काय करायचे?...नीता
परत सगळ्या मैत्रिणी खो-खो हसायला लागल्या.
नीता आपली साधी भोळी मैत्रिणींचा विनोद तिच्या लक्षातच आला नाही.
नीता आपली साधी भोळी मैत्रिणींचा विनोद तिच्या लक्षातच आला नाही.
आपण विनोद थोडा वेळ बाजूला ठेवू पण किती घरात हे चित्र आहे?
आपला 'गडी' ( सखा) म्हणजे 'घरगडी'.
नीताची ट्यूबलाइट जरा उशिरा पेटली. जसे तिच्या लक्षात आले तसे ती मैत्रिणींना म्हणाली,
" बापरे मी तर कल्पनाही नाही केली बाई अशा विचारांची. "
"बोलवतं तरी कसं गं तुम्हाला? गमती गमतीत सुद्धा आणि खरेच म्हणत असाल तर धन्य आहे बाई तुमची. तेही असं चारचौघात?"
तोच कल्पना जवळजवळ भडकलीच, " काय तरी बाई तू जुन्या विचारांची. आणि चारचौघात कशाला ग आपण चार मैत्रिणी बसलो आहोत आणि हसी मजाक सुरू आहे. "
तोच वीणाने तोफ डागली,
" घरातल्या पुरुषांनी घरातल्या बाईला काहीही म्हटले तरी चालते मग आपण मजाक मजाक मधे असं म्हटलं तर कुठे बिघडलं? "
" काय बोलतेस तू वीणा मजाक मजाक मध्ये हे असं बोलणं बरं दिसतं का तेहीआपल्याच माणसाबद्दल? आणि समजा त्यांनी चारचौघात तुम्हाला मजाक मधे
'मोलकरीण' म्हटले तर तुम्ही ऐकून घ्याल?"
नीताला त्यांचे बोलणे बिलकुलच रुचले नव्हते.
नीताला त्यांचे बोलणे बिलकुलच रुचले नव्हते.
"अग्गोबाई ते मोलकरणी पेक्षा काय कमी समजतात आपल्याला?" कल्पनाने आपल्या कल्पनेचे तारे तोडले.
"प्लीज, बस करा ग आपल्या अकलेचे तारे तोडणे.
घरात अशा विचाराने जर आपण राहत असू न तर ते घर नाही रणभूमी शोभेल."
नीता सगळ्यांची कान उघाडणी करत म्हणाली.
घरात अशा विचाराने जर आपण राहत असू न तर ते घर नाही रणभूमी शोभेल."
नीता सगळ्यांची कान उघाडणी करत म्हणाली.
पण आजकाल घराघरात असेच वातावरण दिसते आहे.
पूर्वीचे लोक बायकोला अहो जाहो
म्हणायचे बायकोचे नाव सुद्धा घ्यायचे नाही.
नंतरचा काळ आला नवरा बायकोला नावाने हाक मारायला लागला.
आता तर नवरा बायको दोघेही एकमेकांना नावाने हाके मारतात त्यापुढेही जाऊन बायको नवऱ्याला चारचौघासमोर जानू म्हणायलाही कमी करत नाही.
एकमेकांना बरोबरीचे समजण्याच्या नादात एकमेकांविषयीचा मान सन्मान राहिलाच नाही.
उलट एकमेकांवर नुसते शिंतोडे उडवले जात आहेत.
क्रमश:
पुढील भागात
भाग -2 मध्ये
याचा परिणाम काय होतो यातून एक कुटुंब कसे उध्वस्त होते ते बघूया पुढील भागात.
©®शरयू महाजन

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा