फटकळ

Phatakl
घरात सगळेच काही सारखे नसतात, कोणी प्रेमळ, कोणी गोड, कोणी मनमिळाऊ, कोणी बोलके, तर कोणी फटकळ असतेच एखादे. स्वभावाला औषध नसते तसेच फटकळ लोकांना ही नाही. फटकळ म्हणजे काय तर आढे वेढे न घेता बोलणारे काही प्रेमळ माणसे.ते तुमच्या आमच्या घरात ही असतात. आपण सांभाळून घेतो पण बाहेरचे नसतात तसे सांभाळून घेणारे. आणि समज लग्नासाठी घरात असलेली मुलगीच जर अशी असेल तर मग काय, अरे आई वडलीलांच्या डोक्याला त्रास. तीच कस होणार याचा नाही हो, त्यांचं कसे होणार याचा ( जर आई वडील समजदार असतील तर)
रागिणी ,ही आपली अशीच एक फटकळ member आहे,आई वडील तीला सतत सांगत, समजावत असतात,उठता बसता," की बाई लोकांच्या घरी जायचय ग तुला ,काही टेन्शन घे, तिथे के सत्य बोलायचा हट्ट करू नकोस, आणि बोलायचंच असेल तर कृपया करून तू गोड भाषेत बोल ग माझे." किती ही समजवा ते म्हणत हात टेकले ग "रागे तुझ्या समोर "
आजी ही गालात गालात हसत, आणि म्हणत सासरचे कुठे तरी निघून जातील हिच्या मुळे.
तितक्या रागिणीला मुलगा पाहयला आलाच . सगळ्यांना tension हिला चूप बसायला सांगितले तर ती आपल्यालाच चार गोष्टी ऐकवायला बसेल भर पाहुण्यांना, पण नशीब आज फक्त मुलगाच आला होता.
Ragu ला आईने ,बाबाने, दादाने, आजीने कामवाल्या मावशीने ही गप्प बसायला सांगितले होते, तो बोलेल तितकेच उत्तर दे, जास्त बोलू नकोस . साडी घालून ये ,चहा घेऊन ये, सरळ बस, त्याच्या कडे लगेच बघू नकोस direct हे सगळं तिची आई तिला सांगत होती.
तिने खूप वेळ ऐकून तसे तसे केले जे आईने सांगितले.

ती आणि तो दोघेच निवांत बागेत बसून गप्पा मारायला गेलीं होती आणि मग विचारलेल्या प्रश्नांची ही उत्तरे दिली . मग शेवटी न रहाता तिने त्याला विचारलेच ,मला सगळे प्रश्न विचारलीत मग असं का नाही वाटले की ,मी ही काही बोलावं माझ्या गुणां विषयी, तुला वाटले नाही का तिने ही मला काही प्रश्न विचारावेत ,की सगळे तुम्ही बोलणार आहात. माझा हा जो स्वभाव तुम्हाला ला दाखवायला लावला आहे ना तो माझा मूळ स्वभाव नाही अजिबात. मग तुम्ही म्हणाल की, तुला तर मी गरीब समजत होतो, शांत समजत होतो . मी मूळची स्वभावाने फटकळ आहे. जमनावर असेल तर तसे सांगा ,कारण मी खोटं बोलू शकत नाही.

यावर मुलगा उठला आणि hall मध्ये आला, आणि म्हणाला," माझं तिचे बोलणे संपले आहे "."मी कळवतो रागिणी बद्दल सगळ्यांना आणि मग होकार कळवतो."
( खर तर त्याला ती पहिलीच अशी मुलगी भेटली होती जी त्याचाही इतक्या हक्काने बोलत होती, मनोमन पटली होती, हो थोडी direct बोलणारी होती हे पटलं होतं ). ह्या वर आईला शंका आली की नक्कीच ह्या पोरीने काही तरी बोलली असणार, ज्यामुळे त्याला राग आला असणार. आणि म्हणूच तो निघून गेला असणार रागात. आईने रागिणीला विचारले, अग काय बोललीस तू ? का तो निघून गेला ? रागिणी म्हणाली, "अग त्यांना मी माझा स्वभाव सांगितला बस इतकंच ग. आणि  ते निघून गेले ," .
बरेच दिवस झाले पण मुलांकडच्यांचा निरोप नाही येत म्हणून आई tension मध्ये होती. त्यांना फोन करू, की त्यांच्या निरोपाची वाट पाहू. त्याला रागिणी आवडली होती पण हिनेच घोळ केला. आता काय फोन येणार त्यांचा !!!! आपलीच मूर्ख त्याला तरी काय म्हणावं.
तितक्यात mobile ची ring वाजली, ती शरद ची आई बोलत होती, त्या म्हणाल्या आहो माफ करा आम्हाला!!!
(हे ऐकून तर रागिनींची आई दकलीच , आता हे नातं होणार नाहीत वाटतं, नकार कळवण्याची माफी मागतात बहुतेक च )  त्या म्हणाल्या शरद ला आणि आम्हाला तुमची रागिणी पसंत आहे . त्याला अचानक गावी जावं लागले त्या दिवशी म्हणून वेळ लागला होकार कळवायला. आम्ही सगळे त्याच्या पसंतीवर खुश आहोत .येऊ रागिणी ला भेटायला आम्ही ही उद्या. तयार रहा मग भेटून बोलू.
होकार कळाल्यावर आई खुपच खुश होती, तिने रागिणी ,आणि इतर सगळ्यांना सांगितले ,अरे आपली फटकळ पसंत आहे त्यांना