Jan 27, 2021
माहितीपूर्ण

फांदि

Read Later
फांदि

……  फांदी ……

रस्तयाच्या कडेला एक भले मोठे झाड,त्या झाडाला अनेक फांद्या.त्या फांद्यामधील एक फांदी रस्त्यावर झुकलेली पाणानी भरलेली,फुलांनी बहरलेली. त्या फांदीची छान सावली,वाटसरूनी यायचे थोडा विसावा घ्यायचा,पक्षानी तिच्या अंगाखांद्यावर खेळायचे,पाणाआड लपायचे.किती छान वातावरण नयनरंम्य देखावा.

अशातच एक वाटसरू आला.फांदीच्या सावलीत थांबला,तिला हात पुरवण्याचा प्रयत्न करू लागला.एकदा दोनदा,तीनदा.नंतर उंच उडी मारून फांदीला पकडले.फांदी नंम्रपणे थोडी खाली झुकली,तिला वाटले असेल गरज याला आपल्या पानांची,फुलांची पण,छे.त्याला पानेही नको होती,फुलेही नको होती.तो उगाच त्या फांदीची पाने फुले आेरबडून खाली टाकू लागला .फांदीला पुन्हा पुन्हा खाली झुकवू लागला.फांदी काही वेळा झुकली.खाली अजून खाली,पण आता मात्र जास्तच होत होत फांदीचीपण सहनशिलता संपली असेल.त्याने खाली वाकवले तेव्हा ती वाकली .पण नंतर त्याच्या हातातून सुटून सपकण असा आवाज करीत,त्याने जेवढ्या ताकदीने खाली आेढले होते त्याच ताकदीने वर गेली.वर जातामना मात्र एक झाले फांदी अचानक सुटल्याने वाटसरू भांबावला व त्याला काही कळायच्या आत फांदिचा सपका त्याच्या तोंडावर बसला.नाकाला लागले,डोळ्यांना लागले.त्याचे केस विसकटले,हे सार दुष्य पाहात असतांना मनात विचार आला,निसर्ग कीती छान शिकवन देतो ना आपणाला.

स्री पण त्या फांदिसारखीच नव्हे का? बहरलेली,फुललेली सर्वांना मायेची सावली देनारी. पण तीच्या वाट्याला कधी असे झुकणगयाचे प्रसंग येतातच नाही का? अश्यावेळी कसे वागावे असेच तर ती फांदी शिकऊन गेली नाही का? तीच्या सारखे आपणही झुकावे एकदा,दोनदा, खाली पुन्हा खाली. पण सहनशिलतेच्या पलिकडे गेले म्हणजे पुर्ण ताकदीने ऊठावे आणी त्याच फांदिसारखे फटका देऊन वर उंच जावे. पुन्हा नव्याने फुलण्या साठी बहरण्या साठी सर्वांना मायेची सावली देण्यासाठी किर्तिचा सुगंध दरवळण्या साठी.

पुष्पा प्रमोद.