जिद्द भाग -५

एका स्ञीच्या जिद्दीची कहाणी


अजूनही अधूनमधून माहेरची मंडळी सरिताची समज घालत होते.तुझं एकांकी जगणं योग्य नाही हेच सगळे नातलग सरिताला सांगत होते,पण तीला समोर असलेल सचिनच्या प्रेमाचं ते लेकरू नव्याने उभं राहायला व जगावेगळ अस्तित्व उभं करायला बळ देत होतं.

घरातही तीच्या मर्जीला मान दिला जात होता.आता आपण कोणावर बोझ न बनता नव काहितरी करावं व स्वतःला सिद्ध करावं हा विचार सरिताने केला.बाळाकडे बघायला घरात दोन आजी व पणजी होत्याच काही दिवसात रवीचही लग्न होणार त्याआधी आपण आपल्या पायावर उभं रहावं म्हणून तीने घरात शब्द टाकला.

तीने काहीतरी करावं व स्वतःला सिद्ध करावं हे घरच्यांनाही मान्य होत.त्यामुळे आजोबांनी तीला पुढचं शिक्षण घेण्यासाठी परवानगी दिली पण सरिताच्या मनात वेगळीच कल्पना होती.
ती आजोबांना म्हणाली,"बाबा मी जर ह्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आधूनिक शेती केली तर.. फक्त तुम्ही मला साथ द्या बस .. पुन्हा शिक्षण व नोकरीत अडकण्यापेक्षा मी त्यांच्या आवडीच्या कामात रहायचं म्हणते..".

नामदेवराव व घरातील सगळ्यांना हा विचार पटला.सरिताने कंबर कसली.अधूनिक मशनरिची ओळख व ते चालवण्याच  कसब ती शिकली.फवारणी ,मळणी व त्यासोबत निर्यातीत लागणारी सर्व माहिती व प्रशिक्षण सरिताने घेतलं..टाॅक्टर चालवण्यापासून तर मालाची विक्री सारंच सरिता मोठ्या हुशारीने करू लागली.पण हे करणं तीच्यासाठी सोपं नव्हतं.
लोकांची निंदा -नालूस्ती सहन करत तीला सारं करावं लागलं..पण घरच्यांच्या माणसांची मोलाची साथ तीला होती.
"नवरा गेला व ही मोकळी झाली,"असे सररास टोमणे तीला समाजातून मिळत होते.

सचिनच्या प्रेमाखातर व परिवाराला साथ देत सरिताने लवकरच शेतीमध्ये नवीन प्रयोग करत एक यशस्वी उद्योजिका होवून दाखवलं.मुलगाही आता बराच मोठा झाला होता.तिच्यासाठी दुःख पचवणं सोपं नव्हतं व हे सारं करणही सोपं नव्हतं.पण म्हणतात ना?एका आईने ठरवलं तर सारं शक्य होत.. तसंच झालं एकिकडे विधवेचं जीवन व दुसरीकडे मुलाचं संपुर्ण आयुष्य ह्यात ती अटकली असताना तीने दाखवलेली त्यावेळची जिद्द तीला स्वतःला सिद्ध करण्यासाठी कामी आली.तीने ठरवलं असतं तर ती वेगळ्या वाटेने गेली असती पण आज ती सचिनच नांव लावत ,संदेशची आई बनत ,घराण्याची यशस्वी सून झाली.नव-याची जबाबदारी न विसरता कुणाला न दुखवता, सहनशिलतेने, आत्मसन्मानाची पाञ ठरली.

स्ञी खरंच एक त्यागाची मूर्ती जरी असली तरी ती अशक्य ते शक्य करून दाखवू शकते हे सरिताने सिध्द केले.आपण एक अबला नारी आहोत असं  न दाखवतो ती स्वतः लढली, लढतांना शिकली,समाजाचा विचार न करता योग्य गोष्टींचा विचार करत , आजच्या मितीस काय? योग्य यांचा शोध घेत स्वतःला कठिण परिस्थितीतून बाहेर काढून नव्या उमेदीने उभ करत, नव जग निर्माण केलं.नव-याची कमी तीला भासत होतीच पण त्यांच्या माणसांना सोबत घेऊन तीने घेतलेली भरारी त्यांच्या आत्म्याला ही शांती देऊन गेली असेल नाही का?.

का?नको त्या समाजाचा विचार करत , बुरसटलेल्या विचारांना बळी पडत , बुजगावण बनत आपण आपलं अस्तित्व संपुष्टात आणावं . नविन वाटा भरपुर असतात त्यांचा शोध घेत, हिमतीने लढा देत सारंच मिळवता येतं हे तीने दाखवून दिलं.एकटे पालकत्व सोपं नसतं, एकटं जगणंही सोपं नसतं पण नव्या प्रवाहात जाण्यापेक्षा नव-याची कमी न दाखवता, सचिनच्या सोबत त्यांच्या परिवाराला संग करत ,मुलाला वडिलाच छञ नसलं तरी घरातील सर्वांच्या प्रेमात वाढवणं त्या घरातील संस्कारात घडवणं.घरातील सर्वांना कायमचं त्यांचा मुलगा हा आपल्यात नाही तरी त्याची देण आपल्या सोबत आहे ,हे सोपं नसलेलं काम सरिताने करून दाखवलं होतं.तिच्या रूपाने आदर्श सून व एका हुन्नरी उद्योजिकेचा नवा आदर्श समाजासमोर उभा राहिला व हे सर्व शक्य झालं तिच्यात त्या क्षणी झालेल्या जिद्दीने....


समाप्त...


🎭 Series Post

View all