जिद्द भाग-४

एका स्ञीच्या जिद्दीची कहाणी
ओली बाळांतीण, डोळेभरून लेकराला बघावं, सोबतीला जोडीदार असावा अस कोणत्या स्ञी ला नाही वाटणार पण सरिताला हे सारंच पारकं झालं होतं.लेकरू हातात घ्यावं तर साताजन्माचे वचन घेतलेल्या जोडीदाराचे क्रियाकर्म चुकतील ज्या सात वचनात आपणं बांधले गेलो होतो त्या सात वचनांसाठी धीर धरत तीने घर गाठलं..

समाज ,जनमानस,लोकांच तुसरट बोलणं,नको ते संशय व नवजात बाळाला दोष देणं हे कुठे थांबणार होतं..सरिताला बघताच लोकांची कुजबुज सुरु झाली होती.सचिनची आईने स्वतःच्या काळजावर दगड ठेवून सरिताला धीर देत होती..
नामदेवराव, आजोबा आजी तर पुरते कोलमडले होते..
सचिन घरातला मोठा मुलगा सगळ्यांचा लाडका तोच आता  सगळ्यांना पोरक करून गेला होता.

हिम्मत, सहनशीलता, सारंच पणाला लावल तरी सचिन नसल्याची पोकळी कमी थोडीच होती.पण हे असत्यही नव्हतं ते मान्य करावचं लागणार होत.दोन वर्षांचा सहवास, सोबत आता लेकराची साथ किती आनंद होता.आता कुठे स्वप्नांना पंख फुटु लागले होते.त्यात पंख छाटल्यागत स्थिती होती सरिताची.

सचिनचे सारे विधी अटोपलेत,इकडे सरिताचं बाळांतपण व सोबत दुःखाची तिरिप,सचिनची पोकळी,व त्या लेकराचे व सरिताने उभे आयुष्य ह्या सगळ्यांचे गणित तर सरिता लाच सोडायचं होतं."आलिया भोगासी असावे सादर".अशी तीची स्थिती होती.

पहिले काही दिवस तर आन्न काय? पण पाण्याचीही शिसारी यावी अशी सरिता ची स्थिती होती.सरिताला बघून
आजी म्हणाली,"सरू अगं पोरी,तुला पोटात घालून घेऊ का?गं,सचू आहे असं समज बाई,त्या तान्हा लेकरासाठी दोन घास खा ,तुला आमच्या सर्वांसाठी हिंमत धरायची आहे बघं.हे लेकरू काही जाणत का?बाई त्याला तुझी गरज आहे गं..".
सरिताला समजवायला तसं सारंच जग कमी पडावं.पण ते लेकरूच तीची" जिद्द"बनणार होत.सचिनची स्वप्न ते बाळच पुर्ण करणार मग त्यासाठी त्याला उभं करणं, मोठं करणं हे आई म्हणून तीचं कर्तव्य होतं.हे तीला पटतही होतं पण मन मात्र सचिनमध्येच गुंतलेलं होतं..जगाचा निरोप घ्यावा व संपवावा सारा व्याप ,नको ती जगाची कुचकी बोलणी,विधवेचा तो शाप ,ती अवहेलना, सारंच कल्पनेपलिकडच वाटतं होतं तीला..

बघता बघता तेरा दिवस झालेत.आता सरिताला माहेरी घेऊन जाण्याचा निर्णय माहेरच्या लोकांनी केला.सचिन नसल्याने आता सरितावर सासरच्या लोकांचा तेवढा हक्क उरलाही नव्हता.तेही मुलांच्या दुःखात होते.आजोबा आजींना माञ सचिनसोबत सरिता व बाळालाही गमावतो का? याची भिती वाटत होती.सारे पाहुणे मंडळी गेली व दोन्ही परिवाराची बैठक बसली.
सरिता चे आजोबा म्हणाले,"नामदेवराव सरिता ओली बाळांतीण त्यात आता सचिनरावही नाहित आता ती आमची जबाबदारी आम्ही नेतो आमच्या घरी बाकी लेकरू मोठं झालं कि बघू काय? निर्णय घ्यायचा ते..".
सोबतीला चार मोठ्या माणसांचा ही तोच निर्णय होता.

नामदेवराव म्हणाले,"एकदा सरिताला काय? वाटतं ते विचार तीचा निर्णय आम्हाला मान्य असेल.."

सगळ्यांनी त्या वाक्याला दुजोरा दिला..
सरिताला माहेर जाण्याबद्दल व तिच्या निर्णयाबद्दल विचारण्यात आलं..
सरिता तशी धीट होतीच पण आजचा तिचा निर्णय तीला सचिनची साथ व स्वाभिमान देणारा किंवा नव्या वळणावर घेऊन जाणारा ठरणार होता.हे सारं घडणार याची तीला थोडीफार कल्पना होती पण जे बोलायचं ते आज व ठामपणे बोलावं लागणार होत...

सरिता पुढे आली तीने सचिनच्या फोटोकडे बघितलं,त्याचा हसरा चेहरा तीला सकारात्मकता देत होता..तिने ठामपणे बोलणं सुरु केलं..
सरिता म्हणाली,"आजोबा,बाबा,तुमची काळजी मला कळते पण मी आता ह्या घरची सून आहे,जरी हे नसले तरी ह्या घराची धुरा ते माझ्यावर टाकून गेलेत आता मी व माझं नशीब,बाळासाठी व ह्यांच्या स्वप्नासाठी मला येथेच रहायचं आहे.जे वाईट घडायचं ते घडून गेलं,आता ह्या घरातल्या माणसांना मी बाळापासून पोरक नाही करू शकत...मला येथे राहायचं हि माझी" जिद्द " समजा".
सरिताच बोलणं ऐकून सारेच शांत झाले.तीला अजून दुःख देणं योग्य थोडीच होतं..तिचं म्हणणं ऐकणं हेच सगळ्यांच्या हातात होतं..

सरिताचा निर्णय ऐकून सारेच परत गेले.सरिताची आई काही दिवस थांबली.दु:ख पचवण्यासारखं नव्हतंच पण त्या लेकरांच्या बाललिलांनी घरात थोडासा आनंद मिळत होता.
क्रमशः

🎭 Series Post

View all