जिद्द भाग -३

एका स्ञीच्या जिद्दीची कहाणी
सचिन व सरिताच बाळ येणार,घरात छोट्याची किल्लकारी गुंजणार म्हणून, सारंच घर आनंदात होतं.सरिताचे बघता बघता सहा महिने संपले, दोन्ही सासवांनी सरिताला तळहाताच्या फोडावाणी जपलं होतं.बाळ व सरिताची दोघांचीही तब्येत ठणठणीत होती...आता सातव्या महिन्यात ओटिभरणाचा मोठा कार्यक्रम करण्याचं ठरवलं.सचिन व सरिताच्या लग्नानंतर दोन्ही घरात तसा एकञ काही कार्यक्रम झाला नव्हता.सरिता तर खुशच होती.पण सचिनही खुश होता.होणा-या बाळाचं नाव, त्यांच्या भवितव्याच्या गोष्टी तो सरिताशी करत होता..मुलगा झाला तर" वेद "आणि मुलगी झाली तर "वेदिका"अशी नावही त्याने ठरवून टाकली होती..
सरिता सचिनला कायमचं म्हणत असे,"काय ?घाई असते हो तुम्हाला,येऊ द्या कि बाळाला ह्या जगात मग करू ना सगळं.."
तेव्हा तो म्हणतं असे,"सरिता अगं कोणतीही गोष्ट नियोजन करून केली कि बरं असतं बघं... उगाच घाई होतं नाही.."

तेव्हा तीला हसूच येई.बाळाच्या बाबतीत नियोजन करणारा सचिन, बाळाच्या काळजीने सारं करत होता हे तिच्या लक्षात येत होतं..बघता बघता सहावा महिना संपायला आठ दिवस राहिले होते व डोहाळे जेवणाचा कार्यक्रमांची धुमधाम सुरू झाली.सरिताचे डोहाळे पुरवायला सासर माहेर दोघांकडची मंडळी आनंदाने सहभागी झाली होती.नविन पिढीचे नवे लेकरू दोघाही परिवारात येणार होतं.

नामदेवराव, सासूबाई,काकी सासू ,काका यांनी तर सारं घरच सजवलं होत..लाडक्या दिराने वहिणीसाठी एक नविन पाळणा बनवून घेतला होता.हिरवीसाडी व बाळसेदार रूपात सरिता खुलून दिसतं होती.दिष्ट लागू नये अशी ती सुंदरता . सचिन तर बघतच बसला होता.कार्यक्रम आटोपला सारे विधी व्यवस्थित पार पडले .सरिकाच पहिलं बाळांतपण माहेरी करण्याची रीत असल्याने आठवा महिना सुरू होण्याच्या आत ती माहेरी चालली गेली.जाण्याअगोदर सचिन सारिकाला म्हणाला,"आता परत भेटू का?गं आपण".
खरतर ह्या वाक्याचा सरिताला रागच आला होता.ती तावातावाने म्हणाली,"म्हणजे काय?अहो तुम्ही धीर द्यायला हवा ना?इतकं सारं छान झालं येथून पुढेही होईलच की".

सचिनने सरिताला जवळ घेतलं,"अगं सरिता मी सहजच बोललो पण जीवनाचा काय?भरवसा बरं ,पण आपणं लक्ष्यात ठेवायचं, आपल्यापैकी कोणीही हे जग सोडून गेलं ना तरी बाळासाठी हरायचं नाही हं.., हिमतीने जगायचं, दुःखाची झळ कधीच त्याला जाणवू द्यायची नाही.आणि हे सारं मी आता नाही गं आयुष्यात कधीही घडल तरी त्यासाठी बोलतो.समाजाचा विचार सोडला ना?सरिता जगणं व दुःख कमी होतं बरं का?तु माझ्यानंतर माझा परिवार खुप छान सांभाळशिल पण तुझ्याविना मी हे जीवन नाही जगू शकत गं,तु मला कायम हवीस व तु कायम सोबत असशील हे माहित आहे मला..नहाक चिडचिड नको, जीवनात प्राक्टीकल रहायला हवं गं..."
सरिताने फक्त मानेने होकार दिला..
तोच सचिनने तीला परत चिडवलं..,"म्हणजे मी गेल्यावर माझ्या कुटुंबाला तु छान सांभाळशील बरोबर ना?"
आता मात्र तीला रडूच कोसळलं..तोच रवी आला .

रवी म्हणाला,"वहिनी दादाला सवय आहे हो असं बोलायची तुम्ही बिनधास्त जा मी घेईन काळजी त्याची काही नाही होत त्याला..."

"नक्की ना भावजी, तुमच्या भरवशावर हं..पण जरा इकडेही लक्ष ठेवा , सध्या तुमच लक्ष दुसरीकडे आहे हे कळतं मला.."
सरिताच्या बोलण्याने रवी लाजला.. थोडावेळ गप्पागोष्टी झाल्या.दुस-या दिवशी सरिता माहेरी गेली..

इकडे सचिन त्याच्या कामात व्यस्त होता.दोघांच फोनवर बोलणं होई पण भेटणं शक्य नव्हतं.बघता बघता न ऊ महीने झाले.सरिताच्या माहेरच्यांनी सरिताला दवाखान्यात दाखल केलं..बातमी क्षणात सचिनच्या घरी पोहचली.सारा परिवार तिकडे गेला.सचिनला कळताच सचिनही दवाखान्याच्या दिशेने निघाला.रस्त्यातच सचिनला तो एका गोंडस मुलाचा बाबा झाल्याचं कळलं.. आनंदाची लाली त्यांच्या गालावर चढली होती..काय?करू काय?नको अशी त्यांची स्थिती होती.मिञ, नातलग सगळ्यांचे फोन सूरू होते..त्याने घाईघाईत मिठाई घेतली व रस्त्याला लागला कधी एकदा बाळाचा चेहेरा बघतो व सरिताला भेटतो असं त्याला झालं होतं. पण विधिलिखित काही वेगळंच होतं.समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकच्या धडकेत काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं..आनंदाच्या भरात त्याचा गाडीवरून तोल गेला. एकिकडे आनंद व एकीकडे नको ती दुःखद घटना नामदेवराव व परिवाराला पचवणं अवघडच होतं.. त्यात सचिन सरिताला भेटायला येत नसल्याने तीच्या जीवाचा आकांत चालू होता...

म्हणतात,"खेळ कुणाला दैवाचा चुकला". तशीच परिस्थिती होती.एका नवजात बाळाला बापाचे मुखही दिसू इतकी दुःखदायक स्थिती काळीज हेलावून सोडत होती.सचिनचा शेवटचा सोपस्कार सरिताशिवाय करणही चुकिच होतं.काळजावर दगड ठेवून तिला ह्या गोष्टीची कल्पना द्यावीच लागणार होती.आता जे होईल ते बघण्याशिवाय पर्याय नव्हता.दोघाही परिवारात दुःखाचा भलामोठा डोंगर कोसळण वाईटच होतं.

नामदेवरावांनी स्वतःला सावरलं व स्वतःच सरिताला समजवण्यासाठी पुढे आले.एकिकडे नवजात नातवडांच सुख व दुसरीकडे तरणाताढा मुलगा गमावलेला बाप किती ते दुर्दव्य म्हणायचं..पण खचून चालणार होतं का?.
जड पावलांनी त्यांनी सरिताच्या रूमच्या आत प्रवेश केला.त्यांचा उतरलेला चेहरा तीला काहीतरी अघटीत घडल्याचा संदेश देत होतं.. तरीही ती म्हणाली,"बाबा हे अजून आले नाहीत हो.., काही प्रोब्लेम झाला का?त्यांचा फोनही नाही लागत..मी मेसेज बघितला ते इकडेच निघालेत पण पोहचले नाहित व तुम्हीही शांत आहात.."

नामदेवरावांनी सरिताच्या डोक्यावरून हात फिरवला व म्हणाले,"पोरी थांब किती प्रश्न विचारशील ,मी जे सांगतो ते शांत ऐक,तु शांत ऐकशील तर बोलतो बघं"

सरिता आता पुरती गोंधळली होती,"खरंतर तीला थोडीफार संकटांची चाहूल लागली होती.."बाबा हे बरे आहेत ना?काय? झालं,बोला ना?बाबा प्लिज बोला ना?".

सरिताच्या बोलण्याने नामदेवरावांनी इतक्या वेळ दाबून ठेवलेला हुंदका फुटला..ते रडतच म्हणाले,"सरिता सचिन आपल्याला परक करून गेला गं पोरी..काय?तोंड दाखवू मी समाजाला,ह्या लेकराच काय दुर्भाग्य गं पोरी ,बापने त्याला डोळे भरून पाहिलं नाही.. देवाने काय? दिवस दाखवला ग बाई.. ".

सरिता पुरती कोलमडून पडली होती,एक हाताश बाप समोर होता व एक बाप लेकराला न बघताच जगसोडून गेलेला होता.काय? करणार होती ती.

मनात असंख्य प्रश्न, समोर ते काही तासांच लेकरू व हताश बाप..

सरिताने जवळ असलेल्या आईच्या गळ्यात पडून मनसोक्त रडून घेतलं.आता तीलाच धीट व्हायचं होतं.सचिनचे ते शेवटचे वाक्य तीला साद घालत होते..,"सरिता समाज नावच ठेवतो, आपणं समाजाला घाबरायचं नसतं, हिमतीने सर्वांवर मात करायची असते..".

ती आईला म्हणाली,"आई चल आपल्याला जायला हवं,बाबा ,चला तिकडे लोक आपली वाट बघत असतील ".

सरिताच बोलणं ऐकून नामदेवराव तडक उठले.एक बापाचं काळीज मुलाला भेटायला असूरलेल होतं..

"बाबा ..सचिन वाट बघतोय तुमची चला जाऊ आपणं".

क्रमशः




🎭 Series Post

View all