जिद्द भाग -२

एका स्ञीच्या जिद्दीची कहाणी


सगळ आवरलं गेल्यावर सरिताच्या आजोबांनी आवाज दिला..

"ऐ..पोरींनों,सरूला आणा कि हाॅलमध्ये..."

आजोबांचा बोलणं ऐकून सरिताचे एक काका उठले आणि.. सचिनच्या समोर एक जवळची निलकमलची खुर्ची उचलून ठेवली... सचिन,रवी व सगळ्यांच लक्ष समोरच्या दाराकडे होत..तोच लाल साडीतील,खाली मान घातलेली, सुंदर अशी डोक्यावर पदर सावरत सरिताने रूममध्ये एन्ट्री केली...सगळ्यांची नजर हटू नये अशीच ती वेळ होती... सुंदर,लावण्य,सहजता, संस्कार... सगळंच ढासून भरलं होतं.... सचिन तर एकटक बघतच बसला ... तोच आवाज आला..

"सचिन...अरे काही बोलशील का?बघतच बसशील.."
नजर हटवत लाजत सचिनने खाली मान घातली...बाबा,काका , आजोबांनी सरिताला प्रश्न विचारले...सारे उत्तर रोखठोक व सच्चे असे होते...नकाराला कोणतीच उणिव नव्हती...तोच बाबानी सचिनला आवाज देत नजरेनेच विचारले...हो कि नाही..
सचिनच्या डोळ्यात पसंती झळकत होती... बाबांनी ते सहजच हेरल...

"काय? सदाशिवराव पुढचं कस? करायचं मग...".

"अहो ..सोयरे मुलगा व मुलगी ठरवतील ते करू ...पण मी नव्या मताचा,दोघांना बोलायला वेळ देऊ दोघांचा होकार असला तर बोलायला सोपं...काय?पोरांनों बरोबर ना?"

सगळ्यांनी एका दमात..,"हो "म्हटलं.
सचिन व सरिताला मळ्यातील एका कोपऱ्यात नेण्यात आलं... दोघेही तसं समजदार, शिक्षित त्यामुळे घरच्यांच्या विरोधात जाणं शक्य नव्हते.व दोघांनाही एकमेकांना नापसंत करण्याचं कारणच नव्हतं...सरिता तशी धीट ती सचिनला म्हणाली,"मला काही विचारायचं आहे, विचारलं तर चालेल..."

"हो हो विचार कि".

"लग्नानंतर मला माझ्या विचारांच स्वातंत्र्य राहिलं ना?कि मोठी सून मग सारच सहन करत बसायचं,जेथे मी चुकली नाही तिथे खंबिरपणे माझ्या पाठीशी उभे रहाल ना?".

सचिनने मागचा पुढचा विचार न करता,"हो मग तु नव्या विचारांची तु तुझ्या मताने वागण्याच स्वातंत्र्य आहेच तुला,व मीही कायमचं तुझ्या सोबत असेन बघं...नव्या विचारांची नांदी घेऊन संसार करू आपण...".

सरिता खुश झाली..,"तुमचे काही प्रश्न आहेत का?माझा होकार आहे मग..".सरिता लाजतच म्हणाली.तोच सचिन म्हणाला,"मी तर फोटोतच होकार दिला ना बाय".
सरीता पुन्हा लाजली... दोघेही परत घरी गेले.. दोघांचाही होकार मिळताच घरात जल्लोष सुरू झाला...काही क्षणातच कच्च्या नारळाने लग्न फिक्स झालं.. नामदेवरावांनी नव्या सुनेच्या हातात पाचशेची नोट ठेवत म्हणाले.,"सरिता तु मोठी सुन ,पैसा येतो जातो पण तुला घराचं घरपण व आनंद जपायचा आहे बसं...".

सगळ्यांनी टाळ्या वाजवत शुभेच्छांचा वर्षाव केला, पंधरा दिवसांनी लग्नाचा मुहूर्त फिक्स झाला...दोघांकडेही सदनता मग काय, लग्नाला कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती.धुमधडाक्यात लग्न लागलं,सा-या तालुक्यात हेवा वाटावा असं हे लग्न सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरलं...

लग्नानंतर सरिताने सचिनच्या घरात प्रवेश केला तो नव्या विचारांनी..लाडकी सून मग काय?सरिताचे सगळेच लाड होऊ लागलेत.सचिन व सरिताने शेतीत सुधारणा करायचं ठरवलं.जुन्या चालीरितींना फाटा देत अधूनिक शेतीत सचिनने स्वतःला ढाळून घेतलं..मग काय? उत्पन्न,रूतबा, मानसन्मान सारंच परिवाराला भेटू लागलं...सारी शेती अधूनिक त्यामुळे नवनवीन प्रयोग करणार व सचिनला सरिता साथ देऊ लागली.कोणत्याच गोष्टीत कमी पडणार नाही अशी भूमिका ती बजावू लागली.आता लग्नाला फक्त दोनच वर्ष झाले होते.पण प्रगती बघता व दोघांची एकमेकांना साथ बघता ...,"एकमेकांसाठीच दोघांचाही जन्म झाला असावा"असंच भासत होते...आता कमी होती फक्त एका बाळाची...
  सारं सुरळीत होतंच त्यात आनंदाचा सोहळा व्हावा तशी सरिता आई बनण्याची बातमी आली...मग काय?घरात नव्या पाहुण्यांचे स्वागत व आनंदाला पारावार नाही उरला...

क्रमशः

पुढची कथा पुढिल भागात..

🎭 Series Post

View all