Login

जिद्द भाग -१

एका स्ञीच्या जिद्दीची कहाणी


"अरे सचिन...बस झालं रे काम,चल आवर पटकन,मुलीकडचे वाट बघत बसतील,का? आम्ही जाऊ तुला नाही बघायची मुलगी...."

आजोबा बोलल्याबरोबर... थोडंसं लाजत सचिनने हातातलं काम टाकून रूमच्या दिशेने धुम ठोकली...सारिकाचा फोटो बघितला तेव्हापासून ती त्याच्या मनात बसली होती... सडपातळ बांधा, धारदार नाक,लांबसडक केसांची डाव्या खांद्यावरून कमरेपर्यंत ती वेळी..व फोटोतच चिकाटी व चौफेर नजर बघून " हिच माझी कारभारीण"म्हणतं त्याने स्वतःला च  पसंती दर्शविली होती.

मुलीकडच्यांना घाई होती.सारिकाच लग्न लवकर करायचं होतं...एकतर जेष्ठ कन्या त्यात पुन्हा गुरूबदल मग पुन्हा वर्षभर लग्न लांबणीवर पडणार.सारिकाच्या तीन बहिणी बापाला काळजी लागून राहिली होती..सचिनचे वडिल व सारिकाचे वडिल दोस्त म्हणून घरातच घरोबा झाला तर दोघांनाही आनंद होता...

आजोबा,सचिनचे वडिल नामदेवराव व काका तयारी करून बाहेर पोर्चमध्ये बसली होती.सचिनसोबत चुलतभाऊ रवीही जाणार होता तोही तयारी करत होता..सचिनची तयारी बघत तो म्हणाला
"दाद्या काय?नटतोस राया, तुला माहित आहे ना?ती सारिका माझ्या वर्गात होती.खुप डेंजर आहे बरं,तुला बोटावर खेळवेल नाही सांगून टाक लेका, नाहि तर पुन्हा म्हणशील बोलला नाही तु...".

"अरे गप कि ..वहिनी म्हण आता मला तीच आवडली बघ,राहिल मी तीचा गुलाम बनून पण लग्न तर तिच्याशीच करेन भावा‌.."

रवीला हेच ऐकायचं होतं.वहिणी म्हणून सारेच गुण होते तिच्यात,थोडी करारी होती ती पण तत्वांना वागणारी,हिम्मतवान कुठेच न घाबरणारी सारिका मोठी सून म्हणून ह्या घरात आली तर घराचं रूपच पालटेल असंच वडिलधाऱ्या मंडळींचाही आग्रह होता...

दोघेही भाऊ बाहेर गेले..तशी आई व काकींने सचिनच्या डोक्यावर हात फिरवला...आजीने हाताची ओंजळ करत कडाकडा बोट मोडत दिष्ट काढली...

"सागू ,किती रे मोठा झाला,आता आमचा आराम बाबा आण लवकर सुनबाई... तीला पसंत असेल तर बोलणी करून टाका हो आबा ...मोठा मुलगा खुप तयारी करावी लागेल उगाच लांबवण काही योग्य नाही हं..."

काकी म्हणाली,तीला आजी व आईनेही दुजोरा दिला.

"अगं जाऊ तर द्या ,दोघांची पसंती झाली कि मग पुढचं बघू,लग्न आठ दिवसांत उभं करू की"

काका म्हणाले..तोच रवी म्हणाला..
"अहो दादा आम्ही तर स्वप्न बघितली बरं....सारिकावहिणी स्वयंपाक घरात काम करताय यांची...".
सचिनने लाजतच रवीला चिमटा काढला सगळेच हसू लागले...

नामदेवरावांनी रवीकडे गाडीची चावी दिली.सारे गाडीत बसलेत.काही तासांतच सारिकाच्या घरी पोहचले,भल मोठं घर तसं घरभर माणसही होती.एकञ कुटुंबातील पोर ती.पाहूणे आले बघताच एकच गोंधळ उडाला..घरात घुसल्याबरोबर आदरसत्कार सुरू झाला..पहिलीच सोयरीक कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती... चहा पाणी झालं,आता मुलगी बघण्याच्या कार्यक्रम होणार होता..

क्रमशः

कशी होते पसंती बघू पुढच्या भागात...