पेरणी

पेरणी सुविचार, संस्कारांची



*विषय-पेरणी*

मन असे मानवाचे
किती उनाड उनाड,
फिरे मोकाट होऊन
उगा करी फडफड.

चित्त नसे थाऱ्यावर
किती चंचल बेभान,
त्याला आवर घालून
द्यावी वास्तवाची जाण.

सुविचार संस्कारांची
करु मनात पेरणी,
बीज सत्याचे रुजत
उगवेल तरारूनी.

सुख शांती बहरुनी
मळा हसरा फुलेल,
समाधान नांदताना
मन आनंदी डुलेल.

वेड्या मोकाट मनास
स्थैर्य जीवनी येईल,
सद्गुणांच्या पावसात
जन्म न्हाऊन जाईल.
-----------------------
सौ.वनिता गणेश शिंदे©®