Jan 27, 2021
माहितीपूर्ण

दुधाचे पेढे

Read Later
दुधाचे पेढे

सगळ्यांना माहीती असेलच तरी पण माझ्या बाजूने मी थोडा प्रयत्न करते....

कोरोना सारख्या जागतिक संकटामुळे प्रत्येक जण नवीन रेसिपी करून बघत आहेच त्यात आता आलेले गणपती बाप्पा आले आहेत....त्यांची पूजा, आरती आणि त्यासाठी ठेवला जाणारा प्रसाद....

मग् मनात आले चला ह्या वर्षी बाप्पाला पेढ्यांचा प्रसाद दाखवायचाय... तर आपण घरीच बनवू पेढे.... आज तीच रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे...

माझ्या लग्नाला आता दहा वर्ष होतील,त्यामुळे मी एवढी काही सुगरण आहे असे मला यातून दाखवायच आहे असे काही नाही... काही चूक झाली तर आधीच सर्वांची माफी मागते....कोणताही पदार्थ मन लावुन केला कि छान होतोच....असे मला वाट्ते... अन मला नवीन नवीन रेसिपी करायला खूप आवडतात फक्त त्या झटपट होणाऱ्या असल्या की मज्जा येते....

बरेच जण खूप नवीन पदार्थ करत असतात...पण आपण जेव्हा पहिल्यांदा करतो..तेव्हा वाटणार कौतुक थोडे वेगळेच असते नाही का??? चला तर मग् ही बघा माझी रेसिपी....फोटो आहेच...

दुधाचे पेढे....रेसिपी -

Ingredients list (साहित्य)
Milk (दूध) - ½ cup
Sugar Powder (पिठी साखर) - ½ cup
Melted Ghee (वितळलेले तूप) - 2 tbsp
Milk Powder (दूध पावडर) - 2 cup
Elaichi Powder (वेलची पावडर) - ½ tsp
Almonds (बदाम)
Saffron (केशर)
दुधाचा पेढा हा एक प्रसिद्ध गोड पदार्थ आहे.कसा करायचा तें बघूया.....
प्रथम कढईत दूध घ्या. गॅस चालू करू नका. त्यात पिठी साखर आणि वितळलेले तूप टाका. ते चांगले एकत्र करा आणि साखर विरघळू द्या. त्यात दुधाची पावडर टाका आणि एकत्र करा.
आता गॅस कमी आचेवर चालू करा. हे मिश्रण एकत्र करत रहा. त्यात कोणतीही गठ्ठे राहू नयेत. थोड्या वेळाने तुम्हाला दिसेल की त्या वेळी मिश्रण थोडे घट्ट होईल, त्यात वेलची पावडर टाका आणि हे मिश्रण एकत्र करत रहा.
थोड्या वेळानंतर आपल्याला दिसेल की मिश्रण आकार घेत आहे (घट्ट होत आहे). हातात मिश्रणाचा छोटासा भाग घ्या आणि गोल आकार बनवण्याचा प्रयत्न करा, जर ते आपल्या बोटाला चिकटत नसेल तर मिश्रण तयार झाले आहे.
एक प्लेट घ्या आणि त्यावर थोडे तूप लावा आणि हे मिश्रण त्या प्लेटवर मळून घ्या. आता हे मिश्रण सपाट करा आणि थोडे जाडसर बनवा.  वाटी घ्या आणि त्या मिश्रणावर पेढ्याचा आकार द्या.
पिस्ता किंवा बदाम आणि केसरसह दुधाचे पेढे सजवा. तुमचा दूध पेडा खाण्यास तयार आहे.

जर तुमच्या कडे केसर काडी नसेल तर तुम्ही केसरचे सिरप नक्की टाकू शकता...मिल्क पावडर टाकली की गुठळ्या मोडेपर्यंत हलवायचे अन 2-3 चमचे केसर सिरप टाकायचे....शॉर्टकट मारायचा असेल तर अजून एक छान रेसिपी सांगते.... खवा....

त्यापासून पेढा ,गुलाबजामुन ,बर्फी, सारखे सगळे पदार्थ आपण तयार करू शकतो(पाणी आणि मिल्क पावडर समप्रमाणात घेऊन थोडं थोडं पाणी घालत मिश्रण तयार करा ,त्यात गुठळ्या नको रहायला.. आणि कूकर ला खाली पाणी टाका आणि दोन शिट्या घ्यायच्या) हा खवा तयार होईल त्यानंतर पेढा करायचा असेल किंवा अजून काही तेव्हा तुम्ही 1 चमचाभर तूप घालून नॉनस्टिक कढई मध्ये लालसर करू शकता अजून मस्त टेस्ट येईल...


आवडली का तुम्हाला नक्की सांगा... अन करून बघा नक्की....

© अनुजा धारिया शेठ

Circle Image

Anuja Dhariya-Sheth

housewife n Phonics Teacher

लेखनाची आवड होतीच... पण आता खूप छान प्लॅटफॉर्म मिळाला... आयुष्यात अनेक गोष्टी घडत गेल्या आणि लेखणी बनून कागदावर उतरत गेल्या...