Login

सुकून

The story is about lockdown situation of women's. Which encourage family members to support & take some responsibility of home making. Thank you

"बापरे ! किती दिवसांनी भेटतोय आपण?" मेघा प्रियाला घरात घेत म्हणाली. 

"कशी आहेस तु?"

"छान ! तु?"

"मी पण छानच आहे."

"मुलगा कुठे आहे?"

"घरी त्याच्या पप्पा सोबत.''

"मला वाटलं तु मुलाला घेऊन येशील."

"अरे मी फक्त एक तासासाठीच आली तुझ्याकडे."

"इतक्या दूर."

"घरी बसून बसून बोर झाली. म्हणजे कामं असतात भरपूर पण त्यात मन नाही लागत. म्हणून म्हटलं UPSC चा अभ्यास करते सुरु परत. नोट्स घ्यायला किरणकडे आली ती इकडेच राहते. मी पोहोचली तिच्याकडे अन ती पेपर द्यायला निघून गेली. 12 वाजता तिचा पेपर संपेल तेव्हा पावणे बाराला जाईल मी."

"ओके ! बाकी ठीक सगळं."

"हा म्हणजे ठीकच पण तु पाणी तरी दे मला कि गप्पाच मारत बसशील."

"ईईईई सॉरी. आणते."

दोघीही किचन मधे जातात.

"खायला काय बनवू?" मेघाने विचारलं. 

"मॅग्गी. एकदम सिम्पल साधी. नूडल्स आणि मसाला जे पाकिटात येतं तितकंच टाक. इतर काहीच नको."

"तु घरीही खाऊ शकते गं मॅग्गी. मी काहीतरी छान बनवते."

"नाही गं ! मला मॅग्गीच हवी. घरी बनवते पण मुलाला आणि नवऱ्याला, दोघांनाही कांदा, टमाटर, कोथिंबीर आणि मिरची टाकलेली फोडणी देऊन मॅग्गी आवडते. म्हणून मग एकटीसाठी साधी बनवत नाही. मला काही कोणी नको खाऊ साधी मॅग्गी असं म्हणत नाही. मीच करणारी पण बायकांचा स्वभावच असतो तसा. एकटीच्या आवडीचं एकटीसाठी बनवायला कंटाळा येतो."

"तु पण ना ! बनवते मी पटकन. पण असं इच्छा मारायची नाही स्वतःची."

"बाईला स्वतःच्या इच्छा असूच नये मेघा."

"तु असं वेड्यागत काय बोलतेय?"

"भाऊजी सोबत बिनसलं का काही?"

"नाही गं ! ठीक आहे सगळं. पण बघ ना आई बाबा गेले तेव्हापासून भावांनी विचारणं सोडलं. मी फोन केला तर हो नाही पलीकडे बोलणं नसतं. म्हणून इच्छा असतांना भीती वाटते माहेरी जायची. पण आठवण येते गं त्या घराची."

"सॉरी यार !"

"तु कशाला सॉरी म्हणतेय? तुझ्याकडे येऊन तर खूप छान वाटलं मला. चल गरम गरम मॅग्गी खाऊ."

पोटभर मॅग्गी आणि मस्त आरामात चहा पिऊन प्रियाला अगदी तृप्ती मिळाली. एव्हाना 11:40 झाले.

"मेघा चल येते मी."

"येत जा गं."

"हो येत जाईल आता. ते सुकून कि काय म्हणतात ना, तो भेटला मला आज तूझ्या घरी."

"प्रिया खरंच ठीक आहे ना सगळं? "

"अगं हो सगळं अगदी व्यवस्थित आहे. नवराही चांगला आहे  पण एक वर्ष झालं  24 तास 4-5 वर्षाच्या मुलासोबत आणि ऑनलाईन काम करणाऱ्या नवऱ्यासोबत घरी राहून कंटाळा आला गं." प्रियाने मेघाचा हात हातात घेतला, "सकाळ झाल्यापासून चहापाणी, नाश्ता, जेवण, उष्टी खरकटी भांडी धुवा, मांडा, वाढा, नवऱ्याला झोप येऊ नये म्हणून चहा चहा, पोरानं त्याला डिस्टरब करू नये म्हणून पोराच्या मागे धावा धावा त्याचं मनोरंजन करा. ना कुठे जाणं येणं. रात्री बिछाण्यात पडेल तरीही चैन नसतो. कधी कधी वाटतं हे काय करून बसलो आपण आपल्या लाईफ सोबत? आज कितीतरी दिवसांनी तुझ्याकडे असं शांत बसून आरामात मी माझ्या आवडीचं काहीतरी खाल्लं. खूप बरं वाटलं."

"सर्वांचे असेच आहे बघ. पण हे दिवस जातील गं!"

"हो गं. आता मुलालाही कसं एंगेज ठेवायचं बऱ्यापैकी शिकले.  म्हणूनच म्हटलं स्वतःला अभ्यासात गुंतवते. Cu take care."

"Take care dear!"

.......

एक वर्ष वर झालं आपल्या आई बहिणी आणि डार्लिंग आपल्यासाठी अविरत झटत आहेत. त्यांना पगार, बोनस कधी मिळत नसतो. तरीही त्या कधी प्रेमापोटी तर कधी जबाबदारी म्हणून आपलं सगळं करतात. त्यांना थोडा आराम देता आला तर किती छान वाटेल त्यांनाही. एखादी सकाळ नाहीतर संध्याकाळ त्यांना त्यांच्या मनासारखी जगू दिलं, थोडा कामाचा भार आपल्यावर घेतला तरीही भरपूर आहे त्यांच्यासाठी. काय वाटतं तुम्हाला? 

धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार