Jan 19, 2021
नारीवादी

पायातली बेडी

Read Later
पायातली बेडी

नमस्कार, आज ईराच्या पेजवर पैंजण या चित्रावरून कथा लिहायची आहे.. त्यावरून मी एक छोटासा प्रयत्न केला आहे.. कसा वाटला ते नक्की सांगा..

सोनाली तिच्या आईबाबांची तिसरी मुलगी.. आधीच्या दोन मुलींनंतर तिसरा मुलगा होईल या त्यांच्या आशेला धक्काच बसला.. आणि त्यामुळे सोनाली आणि तिच्या आईवर सगळे नाराज झाले.. कोणी व्यवस्थित बोलेना की सोनालीला घेईना..

सोनालीच्या आईला खूप वाईट वाटे.. यात त्या दोघींची काय चूक?? पण सोनालीची आई सोनालीचे खूप लाड करायची.. तिचे हट्ट पुरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करायची.. तिला जपायची.. आईचं ती तिला सगळी लेकरं सारखीच.. सोनाली हळूहळू मोठी होत होती..

सोनाली थोडी उनाड होती.. ती चंचल होती.. एका जागी कधी स्थिर बसत नव्हती.. पण कामात खूप हुशार होती.. कोणतेही काम असो ती पुढाकार घ्यायची.. त्यामुळे तिच्या आईला तिचा आधार वाटायचा..

सोनालीचे बाबा कायम सोनालीचा तिरस्कार करत असत.. तिचं तोंडही ते बघत नसतं.. एकदा ते महत्वाच्या कामाला जात असताना सोनाली त्यांच्या पुढ्यात आली.. गडबड असल्याने ते थोडे चिडले आणि लगेच कामाला गेले.. पण दुर्दैवाने त्यांचे ते काम झाले नाही.. त्यांचा राग आणखीनच वाढला.. आणि ते घरी येऊन सोनालीला ओरडले.. पण याबद्दल सोनालीला काही वाटले नाही.. कारण हे नेहमीचेच होते.. सोनालीच्या आईला मात्र खूप वाईट वाटले..

त्यादिवशी सोनालीचे बाबा खूप विचार करतात.. यावर काहीतरी उपाय करायला हवा.. असा विचार त्यांच्या मनात चालू होता.. मग त्यांना एक कल्पना सुचली..

एक दिवस सोनालीचे बाबा एक छोटासा बाॅक्स सोनालीला देतात.. सोनालीला खूप आनंद होतो.. कारण तिच्या बाबांनी तिच्यासाठी पहिल्यांदा काहीतरी दिलेलं असतं.. ती आनंदाने तो बाॅक्स उघडते तर त्यात भरपूर घुंगरू असलेले पैंजण होते.. अहाहा! मग काय स्वारी आणखीनच खूश... तिने लगेच पायात पैंजण घातले आणि आनंदाने उड्या मारू लागली.. तशीच छुमछुम करत ती आईकडे गेली आणि आईला उड्या मारत सांगू लागली..
"आई, बघ ना.. बाबांनी मला किती छान पैंजण आणलं आहे.."

ते बघून सोनालीच्या आईचा जीव झर्र झाला.. ती खूप वाईट वाटले..
"आई, बाबांनी इतके छान पैंजण आणले आहे आणि तू इतकी दुःखी का झाली आहेस ग?? तुला आवडले नाही का??" सोनाली

"अगं बाळा, ते फक्त पैंजण नसून तुझ्या पायातील बेडी आहेत ग.. तू त्यांच्या समोर आलेल त्यांना कळावे म्हणून त्यांनी हे तुला दिलं आहे.." सोनालीची आई

सोनालीला वाईट वाटले.. पण नंतर ती म्हणाली, "आई, निदान बेडी म्हणून का होईना?? त्यांनी मला काहीतरी दिले ग.. बघ ना एक दिवस मीच त्यांची मान उंचावेन.." सोनालीने असे म्हणून बेडीला पण स्विकारले..

हळूहळू ती मोठी झाली आणि अभ्यासाच्या, कष्टाच्या जोरावर ती पी. एस. आय. झाली.. आईबाबांसाठी ती मुलगा बनून मुलाची सगळी कर्तव्य तिने पार पाडले.. लग्न झाल्यावरही तिने सासूसासरे आणि आईबाबांची जबाबदारी स्विकारली.. आयुष्याच्या शेवटी सोनालीच्या बाबांना तिच्यावर केलेल्या अन्यायाचा पश्चात्ताप झाला.. शेवटी त्यांनी तिची माफी मागितली.. आणि मुलगी पी. एस. आय. म्हणून ताठ मानेने चालू लागले..
कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राहतील.. शेअर करायचे असल्यास नावासह करावे..
आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..

Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मी काही प्रोफ़ेशनल लेखिका नाही.. मनात जे काही येतं ते लिहिते..