पावसाचं रूप

पावसाच्या विविध रुपावरील अति लघु कथा


अलक

पावसाच रूप

आज खूप निवांत वाटत होतं, मंद मंद वारा अंगाला हळुवार स्पर्शून जात होता.बाल्कनीतून पावसाच्या सरी डोकावून पहायच्या. त्यांच्या सोबत लपाछुपीचा खेळ मस्तच रंगलेला. खरच पाऊस हवाहवासा वाटत होता. गरमा गरम भजी वर ताव मारली पाहिजे, अस म्हणत निशा किचनमध्ये गेली. तेव्हड्यात च निखिल चा फोन आला, आणि बाहेरील पाऊस जणू निशाच्या डोळ्यातुन व्हाऊ लागला. सलोनी तिची पुतणी पिकनिक साठी म्हणून सांगलीला गेलेली.तिथल्या रुद्ररूप धारण केलेल्या पावसात पिकनिकची बस पुरात व्हाउन गेल्या मुळे सलोनी ला जागीच जलसमाधी मिळालेली. आता निशाला कळतच नव्हते कोणता पाऊस खरा बाल्कनीतून दिसणारा की सलोनी ला जलसमाधी देणारा. पावसाची ती दोन्ही रुपं खूपच विभिन्न होती, कोणतं खर आणि कोणतं खोट ते कळतच नव्हतं.

#कृष्णवेडी

प्राजक्ता हेदे (बोवलेकर)