Dec 03, 2020
प्रेम

पावसात भिजलेली Romantic Love story

Read Later
पावसात भिजलेली Romantic Love story

नुकताच सुरु झालेला वर्षा ऋतु .....काळ्याभोर ढगांनी जरा जराशी जवळीक साधलेली .... केव्हां वाऱ्याची प्रेमळ झुळूक स्पर्शून जातेय ... आणि मी तरल कणाकणात बरसतोय ... हेच असेल जणूकाही त्या ढगांच्या मनात ....  उनाड वारा हसत हसतंच स्पर्शून गेला आपल्या सख्याला ... त्यानेही अलगद कवेत घेतलं तिला .. एवढी उनाड असूनही ... बरसला तो मुक्तपणे ... आपल्या प्रेयसी संगे....
अशाच मुक्तपणे बरसनाऱ्या त्या प्रियकराच्या संगे... अजून खूपशा प्रेमळ कहाण्या तयार होतात ... बरसतात ... आणि साक्षीला असतो हा ... बरसणारा प्रियकर आणि त्याची उनाड ,चंचल प्रेयसी ......
त्या रात्री असाच हा बरसत होता ,कुणाचं भान नव्हतं याला ... बस तिच्या प्रेमात वाहुन जायचं माहीत होतं त्याला ... अशाच त्या रात्री .. ती ही चालली होती रस्त्याने ... एकटीच बिचारी ... हॉस्टेल रूम पासून कॉलेज तसं खूप लांब ... एक्सट्रा कलासेस मुळे हिला एकटीलाचं उशीर व्हायचा रूम वर जायला....
या आधी हा बरसणारा वेडा प्रियकर नव्हता , त्यामुळे कितीही वाजता निघालं ,थोडा उशीर झाला तरी चालायचं ... आता याच आगमन झाल्यामुळे बसं सगळी काम आपल्या जागी पडून राहायची ... तसं तिला ही हा बरसणारा प्रियकर खूप आवडायचा... जवळ छत्री असली तरी ही मुद्दामहून ती बॅग मधेच ठेवायची ...  कारण त्याचा स्पर्श व्हायचा ना तिला... अंगावर थेंब पडतांच... अंग शहारून जायचं ... "जसं ,खूप दिवसांनी भेटलेला प्रियकर आपल्या प्रेयसीला ओढून आपल्या बाहुपाशात घेत आहे ,तसं "....
अशीच ती निघाली होती.... ती .... ती .... "मुग्धा..."  मुग्धा.... नावाप्रमाणेच नाजूक... गोरीपान ... गोड ... कोणालाही पहिल्या भेटीत आवडेल अशी .... आपलंस करेल अशी..   ती  ... गोड ... मुग्धा ....
त्या रात्रीही निघाली होती ती एकटीची... त्या बरसनाऱ्याच्या प्रेमात न्हात.... आपल्याचं धुंदीत .... मदमस्त होत .... जशी कोणी हरिणीचं आहे ... जी निघालेय स्वैरपणे आपली कस्तुरी उधळत..... त्या पावसात ... चिंब भिजलेली ....
आपल्याच नादात होती मुग्धा .... अचानक थांबली ... तिला हालचाल जाणवली काहीतरी... तिला माहीत होतं ... या धुंद , मन चिंब भिजवणाऱ्या पावसात कोणीतरी तिचा पाठलाग करतंय... कोणीतरी तिच्यावर लक्ष ठेवून आहे हे ती जाणून होती ... फक्त ती या क्षणाची वाट बघत होती की .. ती पाठलाग करणारी .. लक्ष ठेवणारी जी कोणी व्यक्ती आहे ती स्वतःहून समोर यावी ....
तीन चार दिवस झाले .. मुग्धा वाट बघत होती ... ती व्यक्ती स्वतःहून पुढे यावी पण येत नव्हती या विचारात असतानाच तिचा पाय अडघळला ... आणि ती खाली पडली ... आदीच चिंब भिजली होती ती पावसात ... वरून प्रेमवेडा बरसतच होता ... जणूकाही त्याने ठरवलं होत ... सर्व प्रेम आताच करून घ्यायचं... मनसोक्त बरसून .....
मुग्धा खाली पडते न पडते ,तोच कोणीतरी घट्ट पकडलं तिच्या कमरेला ....  त्या राकट स्पर्शाने मोहरली ती ... तिने ओळखले हा स्पर्श पुरुषी आहे ...  यासाठीचं तर तीच नाटक होत हे सगळं, खाली चिखलात पडण्याचं .... निदान अशी तरी ती व्यक्ती बाहेर येईल आणि कोण   आहे ते कळेल...
त्याने तिला अलगद पकडून उभं केलं .... त्याचे हाथ अजून तिच्या कमरेभोवतीच होते ... तिने आपला नाजूक चेहरा हळुवारपणे वरती करून पाहिलं की कोण आहे हा ?
अरे! हा तर तोच आहे जो लायब्ररीत आपल्यासमोर बसलेला असतो ... आपण जे पुस्तक घेवू वाचायला त्यालाही हेच हवं असतं... वाचन कमी आणि आणि आपल्याकडेच हा जास्त बघत असतो ...   खूप दिवस झाले याचे हे खेळ चालू होते.... आता तर हा पाठलागही करायला लागला आहे आपला..  कोण ?.. कोण समजतो  कोण हा स्वतःला .....
काही बोलायला तोंड उघडणार तेवढ्यात त्याने मुग्धाच्या ओठांवरती आपलं बोट ठेवलं त्याचं ..... खूप छान होता तो दिसायला ... उंचा पुरा ..  गोरापान ... लांब नाक ... काळेभोर डोळे . .... कमावलेली शरीरयष्टी ,अगदी मजबूत अशी ....तो मोहित ... खरंच नावाप्रमाणे मोहित होता तो सर्वांना ..." जसा श्री कृष्ण आपल्या गोपिकांना मोहवायचा ना .. अगदी तसं .".
खरंतर मुग्धालाही खूप आवडायचा तो ... पण मुग्धा स्वतःहून यात पडणं टाळायची ... ती घाबरायची या सर्वाला. .. प्रेम वगैरे या प्रकरणाला . त्यामुळे ती दोन हाथ लांबच असायची या सर्वापासून....  आणि तो या क्षणी एवढा जवळ होता तिच्या .... अजूनही त्याचे दोनी बाहु तिच्या कमरेभोवती घट्ट विळखा घालून होते . जणू काही नव्याने उगवलेल्या वेली ,जस आधार मिळालेल्या मोठ्या झाडाला बिलगून असतात ... आणि बहरत जातात पुन्हा आपल्याच नादात ,अगदी तस .....
वरून तो प्रियकर बरसत होता ... वातावरणात खूप सारा गारठा होता , तरी त्या दोघांना आपले गरम श्वास जाणवत होते ...  हृदय जोरजोरात धडधडत होतं.... ती वेळच अशी होती ... दोघेही शांत कोणी काही बोलायच्या मनःस्थिती नव्हतं ... निरव शांतता ... बस तो वरून बरसणारा मेघराज , आणि या दोघांचे जलदगतीने चालणारे श्वासोच्छ्वास.. याचाच काही आवाज होत असेल तर ....
इकडे मुग्धाची हलचाल वाढली ... ती स्वतःला मोहितच्या पकडेतून सोडवू पाहत होती ... पण त्याची पकड एवढी घट्ट होती नाही सोडवू शकली ती ... कळत नकळत तिलाही हे हवं होतं ... पण ती ते बोलून दाखवू शकत नव्हती ... आणि हे मोहितला माहीत होतं ... न जाणे कस पण तीही त्याच्या प्रेमात पडली होती .. एवढे दिवस सारख हा तिच्या अवतीभोवती.. मागे पुढे ... असायचा त्याचाच हा परिणाम होता ....
तिच्या कमरेवरचे हाथ हळू हळू त्याने तिच्या खांद्यावर आणले आणि तिला अजून आपल्या जवळ ओढुन घेतली ... दोघांनाही हा स्पर्श नवा नवाच होता ... अंगावर रोमांच उभे राहिले ... ती शहारली ... लाजली .... हळूच ...अलगद ... शिरली त्याच्या बाहुपाशात .... ती ऐकू शकत होती त्याच्या हृदयाची धडधड....  तिचीही अवस्था काही अशीच होती ...
त्याने हळुवारपणे तिचा कोमल चेहरा वरती केला ... नजर तिची लाजतच होती अजून ... बघायला ही तयार नव्हती ती त्याच्याकडे... त्या बरसनाऱ्या वेड्या प्रियकराच्या पाण्याचे थेंब हलकेच चेहऱ्यावरून ओघळत होते तिच्या ... त्यांना बघून हा अधिकच मोहित झाला ...
हळूच बोलला ... वरती बघ मुग्धा ... नको लाजू ...  अस प्रेम नाही माझं जे तुला अर्ध्यावरती सोडून जाईल.. पूर्ण जन्माची साथ हवेय मला तुझी ...
देशील मला तू साथ ... ? होशील का तू माझा उनाड ,चंचल वारा.. मग मीही बरसेन वेड्यासारखा.. तूझ्या प्रेमात ....
क्षणभर थांबली मुग्धा ... आणि मोहितकडे बघत हळूच मान हलवली ... होकार दिला तिने मोहितला ...
मोहित आनंदाने जोर जोरात ओरडू लागला... " हे बघ बरसणाऱ्या मेघा..  आता मी ही एकटा नाहीये   .. माझ्याकडे ही एक अवघळ वारा आहे ... बरसून घे तू बेभान ... आणि हो साक्षी आमच्या प्रेमाचा "... अस म्हणतच त्याने आपले ओठ मुग्धाच्या ओठांवर टेकवले...... ती शहारली ... बावरली .... आणि मोहित वरची तिची पकड अजून घट्ट झाली...
दोघेही धुंद होते एकमेकांच्या नशेत .. नजरेत नजर..गरम श्वास... ओठात ओठ... हातात हात... कधीही न सुटण्यासाठी  आणि वरून बरसणारा तो ...जस काही अमृत वर्षा करत होता मोहित मुग्धा च्या प्रेमावर....बेधुंद बरसत होता आज  ... साक्षीदार होता ना तो अजून कोणाच्यातरी सुरेख प्रेमाचा ......


©vaishu patil 
(
लाइफ मे कुछ तोह रोमँटीक होना मंगता हे बॉस ....☺????)