पावसाळा-त्वचेची आणि केसांची काळजी

Pavsala suru zala ki sarvatra kichad, panyache dabke, sandpani sagal sachayala suruvat hote . Pavsalyat majahi asate, pan kadhi kadhi to nakosa pan vatato

# लेख 

# पावसाळा:-  त्वचेची आणि केसांची काळजी #

✍ऋतुजा वैरागडकर

????☂️पावसाळा सुरू झाला कि सर्वत्र किचड, पाण्याचे डबके, साडंपाणी सगळं साचायला सुरूवात होते . पावसाळ्यात मजाही असतें, पण कधी कधी तो नकोसा पण वाटतो.
पावसाळ्यात आपल्या त्वचेचे आणि आपल्या केसांचे हाल होतात... आपण स्वत:साठी थोडा वेळ काढायला हवा.आपल्या केसांची आणि त्वचेची काळजी घ्यायला हवी.या ऋतू मध्ये आपण विशेष काळजी घ्यायला हवी. 

 या काळामध्ये झालेल्या हवामान बदलाचा थेट परिणाम आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर होत असतो. खासकरुन केस आणि त्वचेसंबंधित समस्या निर्माण होताना दिसतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये केसांची आणि त्वचेची काळजी घेतली पाहिजे. मी जे करते तेच आज तुमच्याशी शेअर करत आहे....

 जास्तीत जास्त  पाणी प्या : पावसाळ्यामध्ये अनेक वेळा वातावरणातील बदलाचा परिणाम त्वचेवर होत असतो. अशात शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण मुबलक असेल तर त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो आणि चेहऱ्यावर विशेष ग्लो येतो. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
 
 मेकअप टाळा : आजकाल मेकअप म्हणजे एक फॅशन झालंय. ते थोडं कमी करायला हवा. वातावरणात आदृतेचे प्रमाण वाढल्यामुळे त्वचेवरील रोमछिद्रे बंद होतात. ही बंद झाल्यामुळे चेहऱ्यावर मुरुम, पुटकळ्या येतात... त्यातच जर मेकअप केला असेल तर त्वचेरील रोमछिद्रे बंद होतात. 
परिणामी त्वचेला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही.त्यामुळे या दिवसांमध्ये कमीत कमी किंवा शक्यतो मेकअप करणे टाळावे. 

तेलकट पदार्थ नकोच: पाऊस पडला की आपल्याला काही तरी चमचमीत तळलेले पदार्थ खायची इच्छा होते.    
           
 पावसाळ्यात विशेषतः तेलकट-तुपकट खाण्याचा मोह टाळला पाहिजे. शरीरामध्ये स्निग्धतेचे प्रमाण वाढले तर अनेक वेळा स्थूलतेसारख्या समस्या निर्माण होतात. त्यासोबतच तेलयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे त्याचा परिणाम त्वचेवर होऊ शकतो. त्यामुळे ते टाळाच.

  केसांची काळजी : पावसाळ्यात अनेकदा आपल डोकं  भिजतं ,डोक्यात खाज येणे, कोंडा होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. यापासून सुटका करायची असेल तर केस शक्यतो कोरडे ठेवावेत. त्यासोबतच केसांना केवळ नारळाचेच तेल लावावे.
कोंडा जास्त प्रमाणात वाढलेला असेल तर कांद्याचा रस आठवडयातुन दोनद लावणे..आपण दहि आणि लिंबू चा वापर देखिल करु शकतो. त्याच्यानी  केस मुलायम होतात...

त्वचेची काळजी: आठवडयातुन दोनदा आपण घरगुती फेसपॅक चेह-याला लावु शकतो....त्यामुळे चेह-यावरची  डेड स्कीन निघुन जाते...आणि चेहरा तजेलदार दिसतो..... चेह-यावर चमक येते. 

तुम्हाला माझा लेख आवडला असेल तर लाईक, कंमेट आणि शेअर नक्की करा...