Nov 29, 2022
// rablogging.com_GGINT //
कथामालिका

पवित्र बंधन : भाग १६

Read Later
पवित्र बंधन : भाग १६


अखिल जेव्हा मायराला ती तिच्या निर्णयाविषयी शुअर आहे का असे विचारतो, तेव्हा मायरा शून्यात नजर हरवून फक्त, "ह्म्म...", एवढेच म्हणते.

" बडी तु का हा निर्णय घेतला आहेस हे मला ठाऊक आहे पण बिलिव्ह मी.. तु लग्न नाही जरी केले तरी तुझ्या त्या निर्णयामुळे मी किंवा शिरीश तुझ्यावर नाराज नाही होणार आहे.. सो उगीच.. घाईगडबडीत निर्णय नको घेऊस..." अखिल मायराला पुन्हा समजावतो.

" मी घाईगडबडीत निर्णय घेत नाही आहे.. खूप विचार करून मी हा निर्णय घेतला आहे.. मला माहितं आहे तु आणि पार्टनर नाराज नाही होणार पण तरीही विशेषतः पार्टनर ची मनातील इच्छा कायम तीच असेल..
जी मगाशी त्याने तुला बोलवून दाखवली..

अरे जर भाई आणि पार्टनर नसते तर कुठे असते मी..?? कोणी मला सांभाळून घेतले असते सांग ना..??

बडी तुला वेगळे सांगायची गरज नाही आहे की मला लग्न का नाही करायचे ते पण जर नानूंची ( म्हणजे शिरीश चे वडील, भाई) ही शेवटची इच्छा होती आणि पार्टनरची सुद्धा इच्छा असेल तशी तर मी विचार करायला काही हरकत नाही..


आजपर्यंत नानू आणि पार्टनर ने मला काही चं कमी नाही पडू दिले.. पार्टनर तर एक सेकंदही मला इकडे तिकडे जाऊ द्यायचा नाही.. त्या दोघांनी खूप काही दिले आहे मला..

मी नानूंसाठी नाही करू शकले ते जिवंत असताना पण मला आता पार्टनर साठी, त्याच्या आनंदासाठी काही करायचे आहे मगं ते लग्न का असेना..

जन्म झाल्यापासून सगळ्यांना आनंद कुठे दिला आहे मी.. कायम सगळ्यांना दुःख देत आली आहे पण आता मला फक्त आनंद द्यायचा आहे.. ", मायरा बोलत असते, तसा अखिल तिच्या गालावर एक चापट मारतो आणि तिला म्हणतो,

" कोणं म्हटलं तु दुःख दिलं आहेस ते.. कितीवेळा सांगायचे. बघं पुन्हा तसे बोलली तर... मी.. मी ना तुझ्याशी बोलणार चं नाही.. "

" तुझ्याशिवाय आहे तरी कोणं माझं.. तु बोलला नाहीस ना तर मी.. कशी जगू...??"

"चूप वेडपट.. मी चेष्टा केली.. तुझ्याशिवाय मी राहू शकेल का..?? ", मायरा बोलते तेव्हा अखिल तिचे बोलणे अडवतं तो तिच्यापासून कधीही दूर जाणार नाही असे सांगतो.

" ते सगळं ठीक आहे बडी पण तुला वाटते का तु पार्टनरला लग्न करायचा निर्णय सांगितला तर त्याला संशय येईल वगैरे.. ", अखिल मायराला प्रश्न विचारतो.

" ह्म्म.. येईल खरं.. पण मगाशी पार्टनर तुला म्हटला ना की.. तु मला तयार कर, माझी समजूत घाल असे मगं मी तेच सांगेन की मला तु जे काही सांगितले ते पटले वगैरे.. आणि बडी पार्टनर ला माहितं आहे की मी तुझे बोलणे ऐकले नाही असे आजपर्यंत कधीच घडले नाही..", मायरा उत्तर देते तसा अखिल तिच्याकडे पाहतो आणि
" ह्म्म.. ", एवढेच म्हणतो.

" बडी मला सगळ्यात आधी उद्या पार्टनर च्या डॉक्टरांशी बोलायचे आहे?? नक्की कायं  ट्रीटमेंट सुरू आहे?? कुठल्या गोळ्या वगैरे..?? ", मायरा अखिलला बोलते.

" ओके बडी.. मी ही येतो तुझ्यासोबत उद्या.. आपण जाऊया..", अखिल मायराला आपण दोघेही जाऊ असे म्हणतो आणि पुन्हा तिला बोलतो,


" बडी.. चल आता शिरीश च्या रूममध्ये जाऊया आपण.. त्याने मला तुला उठव म्हणून पाठवले होते.. बराच वेळ झाला आहे मी इथे येऊन तसा ही.. उगाचंच शिरीशला संशय यायला नको.. "

मायराला अखिलचे बोलणे पटते, तसे ती त्याच्या सोबत शिरीश च्या रूममध्ये जाते.

शिरीश हातामध्ये पुस्तक घेऊन वाचत बसलेला असतो, मायरा पाहते आणि अखिलला म्हणते,

" बडी.. बघितले का तु..?? मी इथे याला आराम करायला सांगितले होते आणि हा बघ हातामध्ये पुस्तक घेऊन बसला आहे.."

मायराचा आवाज येतो तसे शिरीशचे लक्ष तिच्याकडे जाते आणि अखिलला मात्र मायराचे ते परिस्थिती सांभाळून घेऊन, काही चं माहित नसल्याच्या आविर्भावात वावरणे खूप कौतुकास्पद वाटते.

" अरे अखिल.. तुझ्या बडीला सांग.. मी आत्ता चं पुस्तक घेऊन बसलो आहे म्हणावं.. ", शिरीश देखील मायराला बोलताना मुद्दाम अखिलला मध्ये घेतो.

"ये शिरीश.. मला काय मध्ये घेतं आहातं तुम्ही दोघे..?? तुमचं तुम्ही बघा बरं..", अखिल मिश्किल हसतं बोलतो तेव्हा मायरा आणि शिरीश दोघेही एकमेकांकडे पाहतात.

मायरा शिरीश जवळ जाऊन बसते..
" भूक लागली आहे की नाही..?? मला खूप भूक लागली आहे.. आपण जेऊया का पार्टनर..?? ", मायरा शिरीशला आपण जेवण करूया का, असे विचारते.

" कायं रे अखिल.. तिला खाऊ घालं असे बजावले होते ना मगं..??", शिरीश अखिलला दटावून विचारतो.

"मगं कायं.. तुझ्या सारखीच हट्टी आहे तुझी माऊ.. मी म्हटलं तर बोलते कशी की मी आज पार्टनर सोबत चं जेवण करणार.. ", अखिल शिरीशला बोलतो, तेव्हा मायरा अखिलला डोळ्यांनी च "थँक्स ", असे खुणावते.

तिघे मिळून जेवण करतात आणि पुन्हा गप्पा मारू लागतात.

गप्पा मारत असताना, मायराला शिरीशकडे पाहून मध्येच भरून येते खूप आणि डोळ्यातील अश्रू लपवण्यासाठी ती पटकन शिरीश च्या मांडीवर झोपते.

"माऊ काय झालं गं..?? तब्येत बरी नाही आहे का माझ्या बाळाची..??", अचानक मायराला असे मांडीवर झोपलेले पाहून शिरीश विचारतो.

"पार्टनर.. कायं होणारं आहे मला.. दमले आहे थोडीशी म्हणून..", मायरा कसेबसे उत्तर देते तसा शिरीश तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहतो.

अखिल गप्पा मारत असताना त्या दोघांकडे पाहंत असतो.

थोड्या वेळाने शिरीशला आराम करायला सांगून अखिल आणि मायरा त्याच्या रूममधून बाहेर येतात.

" चल बडी.. मी ही घरी जातो आता.. ", अखिल मायराला तो घरी जात आहे असे सांगतो.

"ह्म्म.. उद्या लवकर ये.. मी मिटींग आहे असे सांगते पार्टनर ला.. आपण जाऊन येऊ डॉक्टरांकडे.. असेही उद्यापासून ऑफिसमध्ये ही जावे लागेल.. गेले दोन दिवस जरा दुर्लक्ष चं झाले आहे...", मायरा अखिलला म्हणते.

" ह्म्म.. येस बडी मी येतो.. काळजी घे..", असे म्हणून अखिल तिथून निघतो.

मायरा त्याला सोडायला येते.. अखिलची गाडी जशी कंपाऊंड मधून बाहेर पडते तशी मायरा तिथेच थांबते काही वेळ लॉनवर..

ती बसते तिथे खाली आणि एकटक आकाशाकडे पाहू लागते, तिला राहून राहून आज नानूंची खूप आठवण येत असते.

ती वर आकाशाकडे पाहते.. ते लख्ख तार्‍यांनी सजलेले आकाश आणि तो मधेच असलेला एक तारा जणू तिला पाहत आहे असेच तिला वाटते.

मायरा आकाशाकडे पाहून बोलू लागते,

"नानू.. आठवतंय का..?? तुम्ही मला लहानपणी म्हणायचे की जे लोक देवाघरी जातातं ना ते तारे होऊन कायम आपल्या सोबत असतात असे.. आज तो तारा माझ्याकडे पाहत आहे असे वाटत आहे मला.. तुम्ही चं आहातं ना नानू..??

मला माफ करा.. तुमची शेवटची इच्छा सुद्धा मी पूर्ण नाही करू शकले तुम्ही असताना.. म्हणून च तुम्ही नाराज होऊन मला सोडून गेला ना??

नानू.. मी तुमची आणि पार्टनरची इच्छा नक्की पूर्ण करेल.. तुम्हाला खूप खूप आनंद देईल.. नानू तुम्ही असेच माझ्यासोबत रहाल ना कायम सोबत..?? ",

खरेतरं कोणीच उत्तर देणार नाही आहे, हे ठाऊक असते मायराला तरीही ती एकटीच बडबड रहाते त्या आकाशाकडे पाहून.

ती कदाचित स्वतः च्या मनावरच ओझं हलकं करू पाहंत होती.. मायरा त्या आकाशाकडे पाहून पुन्हा आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देते.

क्रमशः

मायराचा लग्नाचा निर्णय ऐकून शिरीशची प्रतिक्रिया कायं असेल..?? कायं होईल उद्या..?? डॉक्टर कायं सांगतील शिरीश च्या तब्येती बद्दल, हे सर्व पुढील भागात कळेल चं

तोपर्यंत कथा वाचत रहा..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Rutuja Kulkarni(kavyarutu)

लेखिका

Follow Me On Instagram @kavyarutu17 ?.लिखना सिर्फ शौक नहीं है मेरा.. मेरी कलम से निकला हुआ हर अल्फाज़ मुझें सुकून देता है।#Cozywriyer #PoetryGirl #Storyteller