पावसाचे दान

पावसाचे दान
शिर्षक- पावसाचे दान*

कडाडून गगनात
वीज गेली चमकून,
लख्ख प्रकाशाची झोत
जाई नयन दिपून.

बरसल्या मेघधारा
दिले पावसाने दान,
तृप्त भिजली धरणी
ओलेचिंब झाले रान.

चिंब भिजता धरणी
आनंदला शेतकरी,
हाती धरूनी नांगर
कसू लागे शेतसरी.

गंध सुगंधित छान
पसरला दरवळ,
झाली मृदू वसुंधरा
दाटे गर्द हिरवळ.

शालू नेसून हिरवा
बहरला हा निसर्ग,
घेता सौंदर्य आस्वाद
जणू भासतो हा स्वर्ग.
-----------------------------
©®सौ. वनिता गणेश शिंदे

🎭 Series Post

View all