पौष्टिक सूप

पौष्टिक सूप

अॅपल सूप

साहित्य

दोन मध्यम आकाराचे अॅपल, २,३ लवंग, एक कलमी चा लहान तुकडा,  थोडे अद्रक, दोन-तीन काळी मिरी, मीठ व साखर चवीनुसार.

कृती

ॲपल स्वच्छ धुऊन त्याचे काप करा. व मऊ शिजवून घ्या.चांगले कुस्करून, अंदाजाने पाणी घालून गाळून घ्या. आणि गॅसवर उकळून घ्या. त्यात कलमी, अद्रक, लवंग व काळी मिरी थोडी बारीक करून टाका. चवीनुसार साखर व मीठ घालून पुन्हा एक उकळी येऊ द्या.अत्यंत पौष्टिक असे सूप तयार.


२) शेवग्याच्या पानांचे सूप

साहित्य

दोन वाट्या शेवग्याचा पाला, शेवग्याच्या शेंगांचा शिजवून काढलेला गर एक वाटी, थोडा लिंबू रस, साखर व मीठ चवीनुसार. थोडी मिरपूड.

कृती

शेवग्याचा पाला स्वच्छ धुऊन तीन चार वाट्या पाणी घालून चांगला उकळू द्या. पाणी थोडे आटल्यावर गाळून घ्या.त्यात शेवग्याच्या शेंगांचा गर, मिरपूड,मीठ व साखर घालून चांगला उकळू द्या. गॅस बंद केल्यावर  थोडा लिंबू रस पिळून गरम गरम प्यायला घ्या.


३) आवळा, पालक सूप

साहित्य

पालक स्वच्छ धुऊन चिरलेला एक वाटी, तीन ताजे मोठे आवळे, दोन चमचे तांदळाची पावडर, थोडे जिरेपूड व मिरेपूड. मीठ व साखर चवीनुसार.

कृती

प्रथम पालक व आवळे शिजवून घ्या, शिजल्यावर आवळ्याच्या बिया काढून टाका. आणि दोन्ही मिक्सर मधून काढून घ्या. त्यात अंदाजानुसार पाणी व तांदळाचे पीठ टाका. हे सर्व मिश्रण गॅसवर चांगले उकळून घ्या. नंतर जिरेपूड, मिरेपूड व चवीनुसार मीठ व साखर घाला. गरम गरम प्यायला घ्या.

चला तर मग वाट कसली बघतायं

करा की रेसिपी ला सुरुवात

मस्त खा,प्या.

स्वस्थ रहा.