त्या वळणावर पाऊस होता
जिथे मी तुला पाहिलं...
आणि तू मला पाहिलं...
त्या गर्तेत चिंब भिजलो...
त्या वळणावर पाऊस होता
तुझ्या माझ्या अनमोल भेटीचा...
दुसरा योग आला होता...
सहवास तुझा हवाहवासा वाटला...
तुझ्या माझ्या अनमोल भेटीचा...
दुसरा योग आला होता...
सहवास तुझा हवाहवासा वाटला...
त्या वळणावर पाऊस होता
पुढच्या वेळी तुझा हात...
हातात आणि न्हाऊन निघालो ...
चकोर चांदण्यात फिरताना...
पुढच्या वेळी तुझा हात...
हातात आणि न्हाऊन निघालो ...
चकोर चांदण्यात फिरताना...
त्या वळणावर पाऊस होता
तुझ्या डोळ्यातल चांदण...
मनात साठवत होतो...
तुझ्या प्रेमात आकंठ बुडालो...
तुझ्या डोळ्यातल चांदण...
मनात साठवत होतो...
तुझ्या प्रेमात आकंठ बुडालो...
त्या वळणावर पाऊस होता...
आणि तू मला सोडून गेली...
त्या पावसात माझे अश्रू...
फक्त त्याला दिसत होते...
आणि तू मला सोडून गेली...
त्या पावसात माझे अश्रू...
फक्त त्याला दिसत होते...
आज ही तो माझ्यासाठी रडत होता...
प्रत्येक वेळी त्या वळणावर पाऊस होता
पण मी मात्र दुर्लक्ष केले...
तो पाऊस नव्हता...
ते मेघाच रुदन होते...
माझ्या निस्सीम प्रेमावर...
प्रत्येक वेळी त्या वळणावर पाऊस होता
पण मी मात्र दुर्लक्ष केले...
तो पाऊस नव्हता...
ते मेघाच रुदन होते...
माझ्या निस्सीम प्रेमावर...