पाऊस वेळा

वळीवाचं येणं नेत्रसुखद आणि आनंद सोहळ्याचं..
एक चिंब सर अशीच
पाऊस वेळ सांभाळणारी

सोसाट्याचा आनंदघन
देहावर फुलवणारी..

नवनिर्मितीचा आकांत
भरगच्च सोसणारी

अलवार हितगुजाचे
मनातले पाझर हळुवार जपणारी

वळीवाचे सोसाटे भरांत असतांना
प्राजक्त सडे केसांत माळणारी

सोनवर्खी सौदामिनीची
तृषार्तता उरांत जागवणारी

झिम्माड पाउस गारा
हिरव्याकच्च पालवीत रुजवणारी..
©® लीना राजीव.