प्रिय अहो... बिछड के भी मुझसे जुदा तू नही.....

पत्र माझ्या प्रिय नवऱ्याला...
प्रिय अहो,

      हाती लेखणी घेतली नि मनाशी काहूर दाटला ... काय लिहावं कळेनास झालं.. एरवी खणखणीत वाजणारी माझी लेखणी आज गळून पडली. अगदी निशब्द होऊन मलाच बघू लागली.. अंतरीचे भाव मनातच दिपू लागली. मनाच्या हळव्या कोपऱ्यात साठवलेलं हळूहळू उलगाव.... म्हणून अलगद अंतरी डोकावू लागली. ओठांवर शिवलेले भाव मुक्त व्हावेत म्हणून मलाच छळू लागली. हृदयातील गुपित ओळखण्याचा वारंवार प्रयत्न करू लागली. हवं नको ते सगळं सांगायचं होतं तिला मिळालेल्या संधीच सोन जे करायच होतं तिला. किती गोष्टी साचल्या होत्या तळाशी... त्यांना अलवार काढयच होतं...
मग अगदीच गच्च भरलेल्या आभाळातुन धो धो वाहणाऱ्या सरीन सारख पाझरत होतं माझं मन ... निशिगंधाच्या फुलांचा सुवास चोहीकडे पसरल्याप्रमाणे माझ्या आजूबाजूचा परिसर सुगंधित झाला होता. हवेत आकस्मित गारवा शिरला होता... श्वासांचा वेग वाढत चालला होता.... 
       कसं आहे ना...! आपण तसेच जवळ खूप कमी असतो... मग सोबत आहोत त्या क्षणांना वेचून घ्यायला फार आवडतं मला. तू नसलास कि मनसोक्त त्यात हरवायचं. स्वप्नांचं आपल एक वेगळेच विश्व निर्माण करायचं. कधी तुझ्याशी मनमानात गुज करायचं तर कधी तुझी फोटो बघून मनसोक्त आठवणीत अश्रू गाळीत बसायचं .बस्स्स्स एवढीच असते तुझ्या पाठीशी उरलेली मी...
  एक सांगू तू टांगून ठेवलेल्या शर्टाचा सुगंध येता जाता तुझा गंधाळलेला स्पर्श करून जातो. लोक वेडी म्हणतात पण तुला माहिती आहे तू जातांना काढून ठेवलेल शर्ट मी तू येईस्तोर सांभाळून ठेवते. भरल्या घरात कुणालाही न दिसावं म्हणून सगळ्यांच्या नजरे आड ठेवते. तसेही लोक वेडीच म्हणतात रे मला... काही लोक तुझ्या प्रेमात रंगलेली राधा ही म्हणतात...
     आठवते काय तुला तुझी नि माझी पहिली भेट....? आत्म्याचं मिलन तसं आधीच झालं होतं नजरे पार एकमेकांला न बघता प्रेमात हरवलो होतो आपण ...ती भेट फक्त्त नयनांची होती तुझ्या स्वाधीन तर स्वतःला मी न भेटताच केलं होतं. सगळं अजूनही डोळ्यांसमोर आहे... तो क्षण आयुष्यातील अविस्मरणीय आहे.
   बघ ना कसं आहे... दिवसांन मागून दिस निघत जातात पण ते क्षण परत परत जगावेसे वाटतात.
    खरं सांगावं तर माझी मागे सुटलेली सवय परत तुझ्या मुळेच रंगायला लागली. तुझ्या प्रेमात तुझ्या आठवणीत मी परत लिहायला लागली. तसं तुला वाचून लिहिणं फार अवघड आहे रे!तरीही माझ्या प्रयत्नांना तू नेहमीच साथ दिलीस. 
   तुझं मन ओळखायला फार काही लागत नाही पण ते ओळखून वाचायला फार कठीण आहे.. फार अवघड वाटतं तुझ्या मनाप्रमाणे वागणं. तुला हवं तसं जगणं. माझं कसं आहे.... मला चार लोकांसाठी जगायला अजिबात आवडत नाही.... मला माझं विश्व फार आवडतं... त्यात सहजासहजी बदल करणं जरा अवघडच आहे माझ्यासाठी... पण तरीही नेहमीच हा प्रयत्न असतो तुझं मन राखायचा तुला आवडतं तसं जगायचा...
      तुझं मन पक्क आहे माझं तेवढंच हळव... तू तितकाच शिष्टाचारी आणि मी तितकीच वेंधळी.... तू सगळ्यांना बोलक करणारा आपला वेगळाच औरा वातावरणात पसरवणारा आणि मी तेवढीच सहज बोलणारी नको तिथे हसणारी, रागावणारी मनातील गुपित सहज उलगडणारी सगळ्यांना आपलंच समजणारी. तू गंभीर समुद्र आणि मी खळखळती नदी, 
 तू मात्र जपून जपून पावलं टाकणारा आणि हा हा हा मी चटकण न विचार करता बोलणारी. हम्म्म्म मी मूर्ख तू एकदम परफेक्ट. हो नाअअअअअअअअ...!!!!!
   किती रे आपण वेगळे अगदीच समुद्राचे दोन किनारे... पण म्हणतात ना रेशीम गाठी तर स्वर्गात जुळतात.. तशीच आपलीही गाठ... दोन जीव पण आत्मा एकरूप... आपलं मिलन जणू देवाने विचार करून घातलेला घात... 
      मला सांभाळणारा... माझ्या कपाळावर ओठ माखवत... मायेच्या स्पर्शाने डोक्यावरून हात फिरवणारा, माझं मन जाणणारा... डोळ्यातूनी मनातलं ओळखणारा.. हवं नको त्याची काळजी घेणारा, तोंडभरून माझं कौतुक करणारा... नेहमीच पाठीवर थपकी देत कौतुकाच बूस्टर देणारा , माझं प्रेरणास्रोत.., माझ्या पंखाना बळ देत... उचं भरारी घालतं.. गगनाला वळसा घालवणारा... माझी स्वप्न पूर्ण करणारा, अगदीच सगळं विश्व् माझ्या पायाखाली आणून टाकणारा.. अक्ख्या जगाची सैर करवणारा... समुद्राशी मैत्री आणि वाऱ्याला आपलस करवणारा ... माझा अल्लादिनचा चिराग, माझ्या स्वप्नांचा राजकुमार...
     देवानी तुझ्या स्वरूपात दोन्ही हातांनी भरभरून दिलंय मला. आता काहीच नको फक्त्त तू हवासा वाटतो मला नेहमी साठी.... माझ्या जवळ... तू दृष्टी आड गेलास कि वाटतं सगळं जग मुकल माझं... नकोसा वाटतो शोरगुल... फक्त्त ओढ असते तुझी..वाटतं थांबवावं वेळेला मूठ बांधून 
    कठीण जात तुझ्याविना सगळं सांभाळणं... एकटीनेच सगळं मॅनेज करणं... कित्येक दिवस तुला न बघणं... तुझ्या आवाजा साठीही तरसन... तुझ्याशिवाय नुसतंच शून्यात उरण... कधी कधी वाटतं काय अंत पाहत असावा ना देव आपल्या प्रेमाचा...
    पण जवळ नसलो तरी तू नेहमी माझ्या हृदयाच्या जवळ असतो... माझ्या श्वासात तुझा गंध सतत दरवळतो... अजाण गारवा आकस्मित आठवतो.. पावसाचा थेंबनथेंब मला छळतो...
   जन्मोजन्मी मलाच तुझीच अर्धांगिनी म्हणून जन्माला यायचं आहे... तुझ्या प्रेमात परत परत रंगायचं आहे... I hope माझ्या भावना तुला कळल्या असतील...
   आता खूप लाडोबा झालाय... आज के लिये बस इतना ही...


                             तुझीचं प्रेमावेडी...
                             तुझी बायको...