पत्रिका

Ptrika
अनघा ,अग आज काय स्वारी खुश दिसते, काय झालं इतकी गालात काय ग हसतेस ,आता कळू तरी दे तुझ्या आनंदाचे गुपित, काय लॉटरी वैगरे लागली की काय. बरं मी जरा दमून आलो आहे मला आलं घालून चहा टाक ,आणि चहा टाकता टाकता कारण पण कळू दे तुझ्या आनंदच. " प्रवीण अनघाला आज हे विचारत होता .

अनघा प्रविण यांचे काही महिन्यापूर्वीच लग्न झाले होते.
तिला सासरी येऊन 6 महिने झाले होते तरी माहेरी जाण्याची तिला सवड मिळत नव्हती,खरे तर प्रवीण च्या जॉब मुळे तिला माहेरी जाता येत नव्हते. ती ही खूप बहाणे करत होती पण कोणतीच संधी सापडत नव्हती तिला.

आज नेमके माहेरून काका आले होते, ते ही तिच्या भावाच्या लग्नाची बोलणी करून direct तिच्या घरी आले होते, तिला खूप आंनद झाला होता काकाला पाहिल्यावर, तसे तर तीच आणि काकांच कधीच पटलं नाही. पण आज सासरी आलेल्या तिच्या माहेरच्या आपल्या माणसाची किंमत कळत होती,मग हे काका का असेना, परक्या शहरात आपलं कोणी तरी आपल्याला भेटायला आले हे पाहून ती आज खूप खुश होती,आणि काका ही खूप जिवाभावणे तिची विचार पूस करत होते.मन भरून आले होते जेव्हा काकांनी तिच्या डोक्यावर हात फिरवला ,आणि ते ही खूप भावुक झाले होते.

काका आले ते तिला भावाचे लग्न जमल्याचा निरोप द्यायला, आणि सगळ्यात आधी तिला निरोप दिला ह्यात तिला खूप समाधान वाटलं, ती ही खास आहे हे तिला पटलं ,सासरी हा मान कोणी देऊ अगर ना देऊ पण माहेरचे अजून ही आपली किंमत ठेवतात ह्याने ती सुखावली.

तिला काका म्हणून गेला की, मी तुला महिनाभर आधी लग्नासाठी घ्यायला येईल ,मी तुझे काही ही एक ऐकणार नाही. तुला यावंच लागणार, तू आमची लाडकी लेक आहेस, तुलाच ननंद म्हणून मिरवावं लागणार, पहिल्या पत्रिका तुला देणार .

काका चा हा बदलता स्वभाव याआधी ही असाच होता पण तिला ते कधीच कळले नाही,ना त्यांचे प्रेम ना नाते, पण आज तिला आपण तेव्हा चुकलो होतो हे समजायला लागले होते, काकासाठी अधिक प्रेम उमळून आले होते.

प्रविणला तिने सगळं सांगून झाले, मग तो मध्ये म्हणाला तेच का ते काका जे तुझ्याशी भांडत असत, आता का इतका पुळका आला ग त्यांना तुझा, दिखावा करत असतील तुला मान देण्याचा.

अनघाला प्रवीणच्या बोलण्याचा खूप राग आला, आता तिच्या माहेरच्या माणसाविषयी कोणी असे बोलले तर आवडणार नाही हे ऐकवले, त्यात ती म्हणाली तुझे तर लोक कसे ही असो मी तर कोणा विषयी वाईट बोलत नाही आणि तू ही ऐकून घेत नाही मग तू ही लक्षात ठेव ,हे तुझं बोलणं पहिले आणि शेवटचे.

प्रवीण गप्पच झाला,त्याला अनघाचे बोलणे पटले.


काही महिन्यांनी अनघाला काकांनी whatsapp वर पत्रिका पाठवली आणि पुण्याला येण्यासाठी गाडी पाठवतो सांगितले, पण प्रवीण म्हणाला काकांनी तुला प्रत्रिका पाठवली पण माझं नाव ही घेतले नाही,निदान तुझ्या ऐवजी जावयाला पाठवायची, आणि ह्या वरून दोघांचे वाद झाले.

अनघा म्हणाली,मग काय आता दुसरे आमंत्रण पाठवायला सांगू का तुझ्या नावाचे, म्हणजे अस झालं आहे की तुझ्या नावाची असतील तरच तू लग्नाला येणार ,नाहींतर नाही.

प्रवीण, " अग तसे नाही ग,जावयाचा मान तर द्यायला हवाच ना मला "

अनघा अजूनच चिडली ,आणि तिने काही दिवसांपूर्वी त्यांच्या मामाच्या मुलीच्या लग्नाचे किस्से सांगायला सुरुवात केली, " तुझ्या मामाच्या मुलीच्या लग्नात फक्त तुलाच बोलवले होते रे, आणि पत्रिका तर सोड तुला call ही केला नाही आणि तुझ्या mummy ने कळवले आणि तसाच तू निघाला आणि मग लग्नाच्या दिवशी तुला कळवले की तुला सांगायचं विसरून गेला तुझा मामा, आणि तरी मी हा अपमान कमी की काय ,मला ही आन सोबत हे ही नाही सांगितले ,त्यात ही मी बिन बोलवता तिथे गेले, का तर तुझा मान मी ठेवणे गरजेचे आहे म्हणून, मग तुला का इतका अपमान वाटावा की तुझ्या नावाने पत्रिका दिली नाही म्हणून "

प्रवीण समजून गेला,आता मुद्दा correct होता, सून म्हणून तिला ही तो मान हवा जो मला जावई म्हणून हवा आहे.?