प्रिय
माझी प्राणप्रिय सखी ,
आता म्हणाल ! प्रिय आणि प्राणप्रिय म्हणजे ... तर प्रिय म्हणजे आपल्या आवडीचा जवळचा असल्यावरच आपण म्हणतो .. प्राणप्रिय म्हणजे स्वतःच्या प्राणांपेक्षा प्रिय असणे म्हणजे प्राणप्रिय ...हे मी माझ्या मैत्रिणीला माझ्या सखीला म्हणतेय ... तीला असं वाटते की मी जे काही बोलले ते असेच बोलण्यापुरती बोलते तर नाही गं माझी येडू..
हे बघ तुलाच म्हटलं आहे मी ... म्हणाली होतीस, की मी कोणाची प्राणप्रिय होईल एवढी माझी पात्रता नाही गं राणी ! ... तुझी पात्रता तुला कसं कळणार नं , ओळखलसं नाही तू स्वतःला पण तुझी प्रात्रता मला चांगलीच माहिती आहे गं ..
आपले नाते फक्त लेखिका आणि वाचक म्हणून नाहिय . आपले नातं हे मैत्रीच ही आहे. तुझ्या सारखी जीव लावणारी सखी लाभली मला हेच माझे पुण्य आहे गं ... माहिती आहे का तुला, मी माझ्या जीवनात खूप कमी जीवलग मैत्रीणी केल्या आहेत .. त्यातच मला मिळालेली जीवलग आहेस तू .. तू मला जीवलग मानतेस की नाही माहिती नाही गं पण माझी तू जीवलग आहेस आणि कायम राहशील यात कोणतीच शंका नाही ... आधी का नाही भेटलीस गं? असा प्रश्न नेहमी पडतो मला ... कदाचित आपली भेटण्याची वेळ आली नसेल म्हणून ... खरं आहे आज गरजेपुरती मैत्री राहिलय गं ... गरज संपली की मैत्री तुटली पण तू माझी कोणतीही गरज नाहीस गं ..
तू लेखक तर आहेस पण तू एक चांगल्या विचाराची व्यक्ती आहेस ..
माझी प्रिय सखी , सहेली , थोडी येडी पण स्वीट अशी प्राणप्रिय तुझ्यासारखं अलंकारित लिहता येत नाही गं राणी , पण लिहते कोणाला दाखवायला किंवा सांगायला नाही गं तुलाच सांगायला कि तु अन तुझी मैत्री माझ्यासाठी किती महत्वाची आहे . मी आज वाचक नाही तर तुझी मैत्रीण आहे . अशी सखी की तू तिच्यासोबत मनातलं सांगू शकतेस बोलू शकतेस .
तू म्हणजे मैत्रीचा निर्मळ स्वच्छ झरा
मैत्री म्हणजे सागराची अथांग रांग
मैत्री म्हणजे मी आहे असा विश्वास
मैत्री म्हणजे फुलांचा दरवळत राहणारा सुवास
मैत्री म्हणजे तुझी माझी साथ ...
माहिती आहे मला तुझ्यासारखी कविता नाही करता येत मला ... तू कवितांमध्ये तर एकदम टॉपवर आहेस . काय भारी लिहितेस नं की मी पुन्हा पुन्हा वाचते ... कसं काय जमत गं तुला इतक्या सुंदर अप्रतिम कविता ...
आपण कश्या भेटलो आहोत नं..इथेच म्हणजे ईरावरच आपली भेट झाली . काय भारी नंबर शोधून काढला नं मी तुझा .. आपण नवीन आहोत एकमेकिंसाठी मूळीच असं कधीच वाटले नाही ... एकदम जुन्या मैत्रीण असल्यासारखे आहे . प्रत्यक्ष आपण भेटलेलो नाही. तु माझ्या मनाच्या आतल्या वर्तृळात आहे . तिथून तुझी सुटका होणे नाही .. मग तू जायचं जरी म्हटलं तरी तुला जाता येणार नाही . आणि आज काही मैत्री दिवस ही नाही आणि माझ्या मैत्रीला सांगण्यासाठी मला मैत्री दिवसाची गरज भासत नाही. माझ्यासाठी दरदिवस मैत्री दिवस आहे राणी ... तुझ्या मॉर्निंगच्या मॅसेज शिवाय माझी सकाळ गोड होत नाही . त्यात तर जर क्यूट सिम्बॉल नसेल तर सकाळ आशी फिकी फिकी वाटते .. आणि मला फिकी नाही गोड आवडते . भले मला डायबेटिस झाला तरी चालेल . राधाकृष्ण ची किती मोठी दिवानी आहेत .. बाई बाई काय म्हणावं तुला .. आणि खरे सांगू का? तर मला कृष्ण तुझ्या रुपात दिसतो राधा तुझ्यात दिसते.
कृष्णाची वेडी राधा तू , कृष्णाची मीरा तू, कृष्णाची बासरी तू, कृष्णाच्या बासरी तून निघालेले मंत्रमुग्ध करणारे सुर तू , कृष्णाची प्रेम दिवानी तू .. तुझ्या मनात कृष्ण , तुझ्या लिखाणात कृष्ण , तुझ्या शरिरात कृष्ण, तुझ्या विचारात कृष्ण , तुझ्या प्रत्येक शब्दांत कृष्ण जाणवतो.
खरे सांगू का? तर मला कृष्ण तुझ्या रुपात दिसतो राधा तुझ्यात दिसते. मला कोणत्याही मृतीत राधाकृष्णाला पाहण्याची गरज पडत नाही गं . कारण डोळे बंद करून श्रीरंग मला तुझ्या दिसतो . तुझ्यासारखी वेडी मी अजूनपर्यंत पाहिलेली नाही ... तूच मला राधाकृष्णाच्या प्रेमाची ओळख करू दिली आहे .
माझी राधा ...लवकरच तुझ्या आयुष्यात तुझा कृष्णा यावा आणि तू त्याची अर्धांगिनी व्हावी अशी माझी मनोकामना आहे .. ती लवकरच पूर्ण व्हावी ...
काय तलवारसारखी धार आहे गं तुझ्या आवाजाला ... त्यातील शब्द न शब्द स्पष्ट ऐकू येतात. किती ती लयबद्धता आहे त्यातील चढ उतार ...बापरेबाप .. मला काय वाटलं होत की माहिती आहे का ? तू व्यवसायाने वकिल असणार, शिक्षका असेल नाहितर रिडीओ जॉकी असणार ... तुझं स्पष्ट रोखठोक बोलणं फार आवडतं मला ... सगळ्यांना मदत करते .. ज्यांच्याकडून ही . ऐकले ते तुझेच नाव ऐकले . आम्हाला हिनेच म्हणजे तू सपोर्ट केला .. सगळ्यांना सपोर्ट करते .. तुझ्यामुळेच स्पर्धेत सहभागी झाले असे बोलतात .. मला हाच स्वभाव तुझा लईच भारी आवडला गं .. यु कॅन डू इट .. हा जो विश्वास तू दाखवते नं समोरील व्यक्तीला कदाचित त्यांनाही त्याबद्दल माहित नसावेत ... तुझं प्रोत्साहन करणं म्हणजे अस आहे नं की त्यांच्यात आत्मविश्वासाच जागृत करणं आहे ... सलाम आहे तुझ्या कर्तृत्वाला ....
एक चांगल पुस्तक शंभर मित्रांच्या बरोबर असते पण एक खरा सत्य बोलणारा मित्र पूर्णच पूर्ण पुस्तकालय असतो . तुझ्यासारखी सखी लाभने म्हणजे कोळश्याच्या खाणीत हिरा सापडणे आहे. आणि तो तू ‘अनमोल हिरा’ आहेस .. कधी मला असे वाटते की, मी तुला मॅसेज करून बोरं करत असणार .. पण सॉरी हं मी मॅसेज तर करणारच मग त्याशिवाय कसं कळणारं आणि छळणार तुला ... तू कशी आहेस हे कळण्यासाठी तुला मॅसेज करून विचारणं माझा हक्क आहे नं . .. आहे नं गं राणी माझा हक्क? माहिती आहे तू जॉब करतेस थकून घरी येतेस आणि नंतर मी बोर करते . पण तुझ्याशी बोलल्या शिवाय मला करमत नाही गं सखे
माहिती आहे तुझं नाव मी कुठेही या पत्रात लिहले नाही . ना तुझ्या कथांच उल्लेख ही केलेला नाही ... कारण उत्कृष्ट लेखिका तर तू आहेच .. सत्य परिस्थितीवर असणाऱ्या तुझ्या कथा ... आता तर नुकतीच एक कथा सुरु झाली तीला ही खूप छान प्रतिसाद मिळत आहे ... मागच्या कथात किती रडवले गं बाई तू ..
मला एक गाणं आठवलं तुझ्यासाठी
तेरे जैसा यार कहाँ
कहां ऐसा याराना आ आ
याद करेगी दुनिया
तेरा मेरा अफ़साना
मेरी ज़िन्दगी सवारी
मुझको गले लगाके
बैठा दिया फलक पे
मुझे खाक से उठाके
यारा तेरी यारी को
मैंने तो खुदा माना
याद करेगी दुनिया
तेरा मेरा अफ़साना
मेरे दिल की यह दुआ है
कभी दूर तू न जाए
तेरे बिना हो जीना
वह दिन कभी न आये
तेरे संग जीना यहाँ
तेरे संग मर जाना
याद करेगी दुनिया
तेरा मेरा अफ़साना
तेरे जैसा यार कहाँ
कहां ऐसा याराना
याद करेगी दुनिया
तेरा मेरा अफ़साना
हे स्पेशल गाणं स्पेशल राधासाठी ..
ये मला माहिती आहे आता खूप बिझी आहे सारखी लिहत असते आणि लिहत असतांना दुसरं काही सुचतं नाही तुला ... मला तर टेंशन आलं गं की तू हे पत्र वाचशील की नाही? हल्ली तू वाचत नाहीस गं ... आणि वाचल्यावर तुला लगेच कळेल हे पत्र कोणासाठी आहे ते ... तुझ्यासाठी
अप्रतिम लिखाणं आहे तुझं..किती मोठा शब्दभांडारांचा साठा आहे .. तुझ्या लिखाणात हरवून जातो .. आणि मी तर तुझ्या कथेत एवढी हरवते की परत येवून ही त्या कथेचा विचार करते .. असचं तुझं लिखाण सदैव फुलत जावो बहरत जावो . आणि त्यापेक्षा ही चांगलेच लिहित आली आहे त्यात कोणतीच शंका नाही .. दुःखाच्या प्रत्येक वाटेवर मी तुझा सोबत आहे हे लक्षात ठेव .. उदास व्हायचं नाही ... तुझं गप्प राहणं आवडत नाही गं मला ... कधी कधी तर तुझ्या मॅसेजमध्येच मला कळते की तुला बरं वाटत नाही ... तुझा मुड चांगला नाही ... माहिती नाही कसं कळते पण कळते की तू टेंशन मध्ये आहेस ... तू न बोलता मला आता कळायला लागली आहे .. आणि समोर आल्यावर तर मी तुला संपूर्ण वाचू शकतेस ..
हे पत्र वाचून तुला सुखाचा क्षण आठवण देण्याचा प्रयत्न केला आहे ... तुझ्याइतपत माझ्याकडे शब्द साठा नाहिय तरीही मी माझ्या भावना मांडल्या आहेत ... मी यापुढे तुझ्यासोबत आहे ... विश्वास आहे ना? . म्हणशील येडे विचारतेच काय आहेच नं .. खात्री केली गं मी !...
I am with you till my last breath ..
हे मी आधीही म्हटलं होते आणि आताही म्हणते . .. आणि हो , सगळ करत जा पण जेवणाचं स्किप नको करत जाऊ बाई ... मला सांग रात्री अकरा वाजता कोण जेवत गं .. लवकर जेवण आणि तेही वेळेवर करत जा ... खूपच विचार करत बसते .. तुझं नाव तर लिहले नाहीय पण माझ्या भावना तुझ्या पर्यंत पोहचता कि नाही? आणि पोहचल्यात म्हणजे मी गड जिंकला ... तुझं मन जिंकण म्हणजे माझ्यासाठी गड जिंकण्याइतकचं आहे. ...
मी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे तुझ्यासोबत आहे . ते ही कायम ... आणि मी एकदा जीव लावला तर त्यासाठी जीव द्यायला ही तयार असते .. तेरी एक आवाज पें धावत धावत येईल ! अस म्हणणारं नाही मी , ट्रेन जरी आले तरी माझ्या इथून चार ते पाच तास लागतात गं .. तेही सुपर फास्ट ट्रेन असली तर नाहितर आठ ते नऊ तास कुठेच गेले नाही बाई ... तुला थोडी वाट पाहावी लागेल .. पण मी येईल हं ..तु जेव्हा हाक देशील तेव्हा मी हजर राहील तुझ्यासमोर ...
कदाचित मी नसल्यावर तुझ्या आठवणीत तरी राहिल की अमुक तमुक नावाची तुझी वाचक कम मैत्रिण होती ..
‘ क्या पता कल हो ना हो ।‘ उद्याच मरणार नाहीय बरं का मी ..असं म्हटल्यावर तू तर मला शिव्यांची लाखोली देणार आहे आणि मी ते खायला ही तयार आहे ... म्हणून हसत खेळत राहायचे .. आणि माझे पांचट जोक सहन करायचे .. तुला खूप खूप शुभेच्छा डिअर .. तसं पाहिलं तर माझ्या शुभेच्छा सतत तुझ्या सोबत आहे ...
तुझ्या चेहर्यावर आनंद सतत ओसंडून वहात राहावा .. तुझ्या जीवनात कोणतेच दुःख येवू नये . .. अशीच तुझी प्रगती व्हावी ... प्रत्येक कार्यात तुला यश मिळावे ... तू नेहमी खुश राहावी आणि निरोगी राहावी ... तू आनंदात खुश असली की मी ही आनंदात राहिलं ..
तसे तर या पत्राल मी तुला हिंट दिल्या आहेत . मुद्दामच तुझं नाव मी लिहलेल नाहीय .बघू ओळखतेस का? ओळखलं तर खूपच आनंद होईल मला ..
काळजी घे ..
लव यु डिअर?
तुझीच
दिप्स
( तू दिलेलं नवीन नाव )
