पत्रलेखन तुझ्यासाठी...

तू प्रत्येक प्रसंगात मला चांगली साथ दिली आहे, लग्नाच्या आधी.... लग्नानंतर ही येणारी प्रत्येक प्रसंगात तू आहेस माझ्या सोबत हे खूप आहे माझ्यासाठी, आपल्या मुलांचा जन्म असो की काही अडचण तू माझ्यासोबत हिमतीने उभा आहेस

पत्रलेखन तुझ्यासाठी...


प्रिय........


हो तू मला अतिप्रिय आहेस, माझं जीवन आहेस, दिवसाची सुरुवात तुझ्यापासून होते, दिवस संपतो तुझ्या पर्यंत,


आठवता आहेत का ते सुरुवातीचे दिवस, एकमेकांशिवाय एक एक क्षण करमत नव्हतं आपल्याला, आजही तीच परिस्थिती आहे ती उत्कटता ते प्रेम तसंच आहे, याचं सगळं श्रेय तुला जात,


बरेच वर्ष झाले आपल्या लग्नाला, बरेच चढ उतार अनुभवले आपण , पण तू मला नेहमी चांगली साथ दिली, खूप शिकायला मिळाले तुझ्या कडून, जोडीदाराला कस सांभाळून घ्यायचं... त्याला गुण दोषा सकट स्वीकारायचं, कसं काय जमतं बाबा तुला?


फक्त मी नाही तर मुलं ही तुझ्या याच गोष्टीवर खूप प्रेम करतात, कुठल्याही परिस्थितीत आपला तोल ढळू द्यायचा नाही,


आठवतंय मला लग्नाच्या आधीचे दिवस..... अतिशय सुरेख आणि आपण दोघे फार भेटायचो, फिरायचो, गप्पा तर संपायच्या नाहीत आपल्या, कुठल्या विषयावर बोलायचो  आपण तेही आता आठवत नाही, पण त्यामुळेच काय हे आपलं नातं एकदम घट्ट झालं, नवरा बायको नंतर आधी आपण मित्र मैत्रीण आहोत,


यामुळेच मला तुझ्याशी कुठलीही गोष्ट शेअर करता येते, तुझ्याशी बोलायला तुझा सल्ला घ्यायला मागेपुढे बघत नाही मी,  त्यावेळी असेल त्या परिस्थिती एकमेकांची साथ द्यायचं ठरलं होतं आपलं आणि आपण आपलं वचन अजून पाळतो आहोत, खूप छान समजूतदार जोडीदार मिळाला आहे मला, टच वूड......


तू प्रत्येक प्रसंगात मला चांगली साथ दिली आहे, लग्नाच्या आधी.... लग्नानंतर ही येणारी प्रत्येक प्रसंगात तू आहेस माझ्या सोबत हे खूप आहे माझ्यासाठी, आपल्या मुलांचा जन्म असो की काही अडचण तू माझ्यासोबत हिमतीने उभा आहेस , माझ्या प्रत्येक निर्णयाला तू पाठींबा दिला नेहमी, तू कर काहीतरी मी आहे हा आधार खूप छान आहे


किती जरी प्रेम असलं तरी जोडीदाराला त्याचा स्वतःचा वेळ हवा असतो, त्याच्या आवडीचं काम त्याला करायचं असतं, हे तुला चांगलं माहिती आहे, मी काहीही करायला घेतलं की तुझं प्रोत्साहन देणं हे ठरलेलंच असतं, एक मागितलं की दहा गोष्टी मिळतात, प्रत्येक विषयाची एवढी चांगली माहिती कशी आहे तुला, तू बरोबर अचूक सल्ला देतो, छान समजून सांगतोस, तुला सांगितलं की सुटला प्रॉब्लेम, खूपच अवलंबून आहे मी तुझ्यावर, आणि मला हे अवलंबून राहणं खूप आवडत आहे


सध्या कामाच्या व्यापात तू बर्‍यापैकी बिझी झाला आहेस, हे सगळं माझ्यासाठी चालल आहे हे मला माहिती आहे, पण तरी तू स्वतःची काळजी घ्यायला हवी, असं मला मनापासून वाटतं, तू तुझ्या आवडीनिवडी जपायला हव्या, तू स्वतःला वेळ दे, तुला आवडतं ते घे,  सगळं फक्त आमच्यासाठी का? स्वतःसाठी काहीही घेत नाही... हे असं असं चालणार नाही,


सध्या मी  बर्‍यापैकी छोट्या छोट्या गोष्टींसाठी हळवी होते, हे असंच का? तसच का? असं सुरू असतं माझं, माझी समजूत काढणे... दरवेळी माझ्याशी व्यवस्थित  वागणे... काय होते हे समजून सांगणे, किती आधार देतोस तू मला दरवेळी, मला तुझे आभार मानायचे नाहीत,  मला तुझ्या प्रेमात ऋणात राहायचा आहे, कायम,


माझी कायम अशीच साथ दे,


दिल कही तेरे बिन लगता नाही है....
वक्त गुजरता नही....
क्या यही प्यार है....
हा यही प्यार है....
Love you so much....

तुझीच प्रिय......