पतीचे अनपेक्षित वागणे

Every husband and wife have strong communication,, between to each other...

अनपेक्षित....पतीचे वागणे...

राशी आणि तिचा पती सोहम दोघेही एकमेकांसोबत खूप छान वागत,नेहमी एकमेकांना समजून घेत असे,...अगदी कोणालाही त्यांचा हेवा यावा असे ते वागत असे,सोहम राशी ची खूप काळजी घ्यायचा..तिला नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा,...आणि राशी देखील सोहम च्या मना विरुद् कोणतेच काम करत नव्हती...

खर तर सोहम हा राशी पेक्षा वयाने जरा जास्त मोठा होता,पण तो तिला समजून घेण्यात कुठेच कमी पडत नव्हता,...राशीला वाटायचे यापेक्षा दुसरा चांगला जोडीदार आपल्याला मिळाला नसता,,सुरवातीला राशी ला सोहम अजिबात आवडला नव्हता...पण कालांतराने ती समजली होती की सोहम पेक्षा चांगला जोडीदार दुसरा कोणताच नाही....

असा दोघांचा राजा राणी चा संसार सुखाचा होता,सोहम हा इंजिनिअर असून त्याच्या जॉब चांगल्या मोठ्या शहरात होता,आणि म्हणूनच त्याने सोबत राशी ला सुध्धा आणले होते,,म्हणजेच दोघेच राहायचे,,ना कुणाची रोकटोक ना कुणाची पाबंदी...अगदी मनमोकळे पणाने दोघेही राहत होते,,दोघांकडे एकमेकांच्या तक्रारी करायला काहीच नव्हते,..मोठ्या गुण्या गोविंदाने दोघे नांदत होते....


राशी खूप आनंदी होती,तिला जणू स्वप्नातला राजकुमार मिळाला होता,.....एक दिवस राशिने सोहम ला सरप्राइज देण्याचे ठरविले,तिने एक मस्त प्लॅन सोहम साठी केला होता,त्या दिवशी तिने सोहम चा कॉल उचलायचा नाही असे ठरविले म्हणजे सोहम काळजी ने घरी येईल व नंतर आपल्याला सरप्राइज देता येईल असा विचार मनात करून ती सोहम च्या कॉल ची मन लाऊन वाट पहात होती,,आता येईल आणि आपण उचलला नाही की खूप गम्मत येईल...असे विचार करत ती फोन ची वाट पहात होती....

दिवसातून पंधरा वीस फोन करणारा सोहम मात्र त्या दिवशी त्याने एकही फोन केला नाही...राशी बिचारी फोन ची वाट पाहून पाहून थकून गेली पण एकही फोन आला नाही,,शेवटी असे का झाले असावे म्हणून तिने च त्याला फोन केला तर तो फोन उचलत देखील नव्हता...आता मात्र राशीला खूप काळजी वाटायला लागली..म्हणून तिने त्याच्या ऑफिस मध्ये विचारपूस केली असता तिला कळले की सोहम आज लगेच ऑफिस मधून गेला...सोहम घरी न येता नेमका कुठे गेला तिला काहीच कळायला मार्ग नव्हता...

ती फक्त आता त्याची वाट पाहत होती,...अन् काही वेळाने एक फोन आला अंनोन नंबर वरून,,तिने लगेच उचलला आणि हॅलो म्हणताच तिकडून सोहम चा आवाज आला की आई ची तब्येत बिघिडली होती म्हणून आई कडे आलो आहे,,तिला बरे वाटले की लगेच येतो...बस येवढे बोलून त्याने फोन ठेऊन दिला....

राशीला वाटले असे काय झाले असावे सासूबाईंना की सोहम अचानक च गेला..बर असो ,,लवकर बऱ्या होवो ..असे म्हणत ती काळजी करत होती...दुसऱ्या दिवशी सोहम घरी परतला,,थोडा त्याचा मूड ऑफ होता,राशीला वाटले आईच्या तब्येती मुळे असेल कदाचित...तिने त्याला विचारले,,

राशी: कशी आहे आई आता...

सोहम:हो बरी आहे,,...काय करणार बिचारी या उतरत्या वयात देखील तिला कामच करावे लागतं आहे,त्यामुळे खूपच अशक्त झाली आहे...

राशी:अरे मग आपल्या कडे आणायचे का...आपण..

सोहम:नाही,ती येणार नाही...कारण तिची इच्छा आहे की तू तिची काळजी घ्यायला जावे...

राशी:मी पण .... कसं शक्य आहे..म्हणजे इकडे तुमचे पण जेवणासाठी प्रोब्लेम होतील...

सोहम:मी माझं बघून घेईल,तू जा आईकडे...शेवटी आई खूप महत्वाची....

राशी:बर मग तू ही चल...

सोहम:तू बहाणे नको शोधू,,तुला माहित आहे की मी नाही जाऊ शकत...तुझी इच्छा च नाही आई ची सेवा करायची...आई जे बोलली ते च खरे..

आणि सोहम निघून गेला....

राशीला मात्र खूप विचार येत होता की येवढं माझा नवरा प्रेमळ अन् अस कसं काय वागतोय....एका रात्री असे काय घडले असावे...लगेच सोहम चा फोन येतो आणि तो म्हणतो की राशी तू विचार केलास ना आईजवळ जाण्याचा ....तू तयारी करून ठेव मी घरी आलो की तुला सोडतो.... अन् फोन कट...

आता सोहम राशी सोबत चांगला बोलत देखील नव्हता...दर दोन दिवसांनी दोघं मध्ये भांडणे व्हायची....असे सोहम चे वागणे राशीला अगदीच अनपेक्षित होते....याचे कारण शोधण्ासाठी तिने आई कडे जाण्याची कबुली दिली ....

गेल्यानंतर सासूबाई दिसल्या,चांगल्या ठणठणीत बऱ्या होत्या...राशीला वाटले इतक्या लवकर बरी पण झाली,, राशिणे बॅग ठेवली व सासूबाई ला नमस्कार केला...सासूबाई स्वभाव नुसार नमस्कार असा नसतो करायचा असे म्हणून खोटं काढली...आणि नंतर हळूहळू राशीला सगळे समजले की सासूबाईंना कश ही करून मुलगा म्हणजेच सोहम जवळ हवा,आणि म्हणूनच हे सर्व नाटक ....पण सोहम तर आता राशी सोबत चांगला बोलत सुध्धा नव्हता ...

न बोलण्याचे कारण म्हणजेच सासूबाई चे सोहम ला राशी विरूद्ध कान भरून देणे...
राशीला या गोष्टीत काहीच नवल वाटले नाही,तिला नवल वाटले तर ते फक्त सोहम च्या वागण्याचे,,,तिने कधी कल्पना देखील केली नव्हती की सोहम असा वागेल...तिच्या साठी सोहम चे हे वागणे खूप अनपेक्षित होते...

कालांतराने सोहम ही आला अन् मग काय राशी ने आता सोहम कडून कुठलीच आशा ठेवली नाही....फक्त एक विचार तिच्या मनात कायम घर होता,,जर आई वर येवढं प्रेम तर अशा मुलांनी स्वतःच आई ची काळजी घ्यायची व ज्या आईंना मुलांच्या चांगल्या नोकरी पेक्षा स्वतःच्या स्वार्थ चे जास्त महत्त्व असते अशा आईंनी कायम मुलांचे लग्न च करू नये....त्यांना स्वतः च्य हाताशी ठेवावे...

Ashwini Galwe Pund