पाठलाग..
नेहमीप्रमाणे काकू त्याही दिवशी दुपारीच तिच्याकडे हेअर कट करायला आलेल्या..नुकतचं फेशिअलचं कस्टमर करून ती जरा वेळ पहुडली होती..दारावरची बेल वाजताच तिने थोडे नाराजीनेच दार उघडले.
काकूला बघताच विचारले , काय करायचे होते काकू ?
अग ! परवा लग्नाला जायचे आहे , केस कापायचे होते "
ती - काकू मग उद्या या ना..मला थोडा आराम करायचा आहे..आज फार दमले.
ठीके उद्या येते - काकू
काकू प्रसन्न चेहऱ्याने तशाच माघारी फिरल्या.
आणि तिही मग जरा वेळ पडली.
दुसऱ्या दिवशी पहाटेच तिला समजले काकू रात्रीचं हार्ट अटॅक येऊन देवाघरी गेल्या..
काकूंचा दुसरा दिवस निघालाच नाही..
ती जेव्हाही दुपारी झोपायचा प्रयत्न करते तेव्हा तेव्हा काकूंचा प्रसन्न चेहरा तिचा पाठलाग करतो..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा