Feb 26, 2024
नारीवादी

पाठवणी /२)

Read Later
पाठवणी /२)सासरी रीतसर संपदाचा गृह प्रवेश झाला.मोठा टोलेजंग वाडा ,घरातील उंची साज समान भारदस्त पना तिथल्या प्रत्येक वस्तुतून जाणवत होती.गालिचे, झुंबरे ,उंची काच सामान ,शो पीस, रेखीव शोभेच्या मुर्त्या.तिचे डोळे दिपले .थोडी अभिमानाने मान ताठ झाली.त्या मोठ्या घराची ती एकुलती एक सून तिचे पदोपदी कौतुक केले जात होते.सर्व वस्तू नोकर तिच्या हातात आणून द्यायचे.

अखेर ती मिलनाची रात्र आली. तिने किती स्वप्ने सजवली होती.सर्व मातीमोल झाली.अबोल आणि तिच्याकडे कायम वखवखलेल्या नजरेने पाहणारा श्याम तिला प्रेमातुर आणि संयमी वाटायचा.पण कुठले काय.त्याला प्रेमाचा गंधही नव्हता.वेलीवरचे फुल क्रूरतेने कुस्करावे तशी तिची अवस्था करून टाकली तिची पहिल्या रात्री.  प्रेम या भावनेला घाबरून त्या प्रकाराची भीती तिच्या मनात कायमची बसली.त्यात भरीला तो दारू पिवून तर्र होता.कार्यभाग अधाशीपणे ओरबाडून त्याने साधला.आणि तो कुस बदलून घोरू लागला.ही मात्र घायाळ पक्षिनी सारखी विध्द होवून विव्हळत जखमा बघत राहिली. सकाळी तिच्या त्या अवस्थेवरून पूर्ण वाड्याला रात्रीचा प्रकार  न सांगता कळला. नोकर माणसे हळहळत दबक्या आवाजात कुजबुजत होती.

श्याम च्या आईवडिलांना काही फरक पडला नाही .बडे घराणे माज असणारच. हळूहळू श्याम च्या इतरही भानगडी तिच्या कानावर पडू लागल्या.पट्टीचा व्यसनी , वाईट असलेले सारे नाद अगदी बाई चा पण त्याला होते.उर्मट वागणे, दारू पिऊन धिंगाणा घालणं, बाई बाटलीचा नाद, मटका खेळणे.,पोरीची छेड काढत पारावर बसून चकाट्या पिटने.एक न अनेक ढीगभर अवगुण..... तिला अलीकडे सारखे बरे वाटत नसे.अशक्तपणा आला होता.एकदा श्यामच्या खिशात कसल्याश्या गोळ्या सापडल्या.तिने विचारताच त्याने तिच्या  श्रीमुखात भडकावली.दोन दिवस ती तापानं फणफणली.तिचा ताप काही उतरेना.dr नी तपासले.तिच्या नवऱ्याला व सासऱ्याला बोलावून काहीतरी सांगितले.तिला गोळ्या औषध चालु केले.पण काही गुण पडेना.तिला दाखवून आणले तेंव्हा पासून श्याम तिच्या जवळ जाणे टाळायचा.तिला मोठे आश्चर्य वाटायचे.स्त्री देहाला भुकवलेला हा नराधम असा का वागतोय?.

शेवटी तिची दया येवून वाड्यात कामाला असलेल्या रखमेन तिला एड्स झाल्याचं व धाकले मालकांना हा रोग लग्नाआधीच होता हे गुपित सांगितले.ते ऐकून चिडलेल्या संपदाने अकांड तांडव केले.पूर्ण घराला तिच्या केलेल्या फसवणुकीचा जाब विचारला.माहेरी निघून जायला ती चौकटी बाहेर पडणार तेव्हड्यात श्याम ची लाथ तिला एवढ्या जोरात बसली की तिचे डोके उंबऱ्यावर आदळून ती गतप्राण झाली.लगेच dr ना बोलावले .....ती मृत झाली आहे  व पोलिस केस होईल.म्हणून त्यांनी लगेच भरमसाठ पैसे घेवून death certificate दिले.गडबडीने अंत्यसंस्कार उरकायला सांगून ते निघून गेले.

विलासरावांना सांगावा धाडला गेला .मुलगी दिल्या घरी सुखी आहे म्हणून फोन करीत नाही ह्या गैर समजात ते होते.लेकीच्या घरी तसही खेडेगावात सारखे कुणी जात नाही .

कावेरी बाई ,तनय यांना घेवून ते धावत आले.तोपर्यंत सर्व पुरावे मिटवून तिला शृंगार करून तिरडी वर घालून फक्त यांच्या येण्याची वाट श्यामचे आईवडील बघत होते.ते आल्यावर चेहरा दाखवून गडबडीने तिची तिरडी उचलली.अनय ने हुंदके देत लाडक्या बहिणीला खांदा दिला .विलासराव व कावेरी बाई यांना  लोक सावरत होते.ते आपल्या लाडक्या लेकीची परत एकदा पाठवणी होताना पाहत होते.एक इसम कुजबुजला...  पावण चौकशी केली नव्हती का पूर्ण? सोन्यासारख्या पोरीचा इस्टेटीला भुलून हकनाक जीव गेला .

पहिल्यांदा नांदायला जाताना सुखी हो म्हणून भरल्या कंठाने पण लेक सासरी चालली म्हणून समाधानी मनाने निरोप दिला.तिची पाठवणी केली.आणिआता दुसऱ्यांदा तिच्या निष्प्राण कलेवराला पोटच्या पोरीला कायमच मातीत घालायला तिची सवाष्णी रुपात अखेरची पाठवणी करीत होते.तिची चर्या बघुंन त्याना एकंदरीत काहीतरी आक्रित घडल्याची शंका आली पण त्यांचा आवाज त्या मोठया वाड्याच्या मोठेपणात दडपून टाकण्यात  आला ....ह्या गदारोळात कावेरी च्या कानात रखमा कुजबुज करून सद्य परिस्थिती सागून रिकामी झाली.ते ऐकून कावेरीचा दगड झाला.हिरव्यागार साडीत सवाष्ण लेणे लेवून सजलेल्या लाडक्या लेकीला त्यांच्या स्तब्ध डोळ्यांनी कायमचा निरोप दिला .लेकीच्या गेलेल्या वाटेवर घातलेल्या कुंकवाच्या सड्याचा विलासरावांच्या कपड्यांवर छाप उठले होते.त्या लालभडक हाता कडे डागा कडे विलासराव गलीत गात्र होवून पाहत राहिले.आज दुसऱ्यांदा त्यांनी लेकीची पाठवणी केली होती..,..


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Seema Jugale

Housewife

Writing Own Emotions With The Help Of Words

//