पाठवणी/१)

पाठवणी

कावेरीबाईना आठवण येत होती मुलीची ....कालच त्यांच्या लाडक्या  मुलीचे संपदा ची पाठवणी केली त्यांनी आणि विलासरावांनी.. लग्नाची धामधूम महिनाभर चालू होती .एकुलती एक कन्या लग्नानंतर बारा वर्षांनी नवसानी झाल्या सारखीच  नाजुकशी गोरीपान छोट्या जिवणीची जणू काडीन रेखलीय.... तिच्या नंतर एक मुलगा  अनय.

सगळ्यांची लाडकी घरभर पायात पैजण घालून दुडूदुडू धावणारी..... बोबडे बोल बोलणारी थोडीशी अबोल. स्वप्नात रमणारी. दोघानाही तिचे भारी कौतुक तोंडातून शब्द यायचा अवकाश वस्तू हजर असायची. तशी ती हट्टी नव्हतीच मुळात समंजसच म्हणाना .....

शिक्षण पूर्ण होताच लग्नाचे वय आले तसे वर संशोधन चालू झाले. विलासरावांना मोठ्या स्थळाची आस लागली होती.जास्त उत्पन्न भरमसाठ पैसा शेती यादृष्टीने त्यांची वर संशोधनाची वाटचाल चालू होती.मुलगा कमी शिकलेला असला तरी चालेल. पण घरात लक्ष्मी पाणी भरत असायला पाहिजे एकूण काय बडे प्रस्थ पाहिजे होते.

संपदाची अल्लड बुद्धी तिने वडिलांनी बोट करून दाखवले त्यालाच वरले....नवीन साड्या खूप सारे दागिने सजणे नटने......हेच सुख वाटायचे तिला.तिचा नवरा श्याम बड्या घराचा लेक .एकुलता एक बंगला गाड्या वीस एकर शेती.अंगाने थोडा किरकोळ.पण श्रीमंतांचे चार अवगुण ही खपतात.होईल उद्या अंगाने धड.... हळदीचे पाणी लागले की.....ही विलास रावांची धारणा.



रीतसर बोलणी झाली. बडे घराणे जास्त चौकशी करण्याची गरज वाटली नाही.जेवढी केली त्यात सर्व चागलेच दर्शविण्यात आले.पाहुण्यांना थोडी गडबड असल्यासारखे जाणवले.पण तरुण मुले गुढग्याला बाशिंग बांधून तयार असतात अशी बतावणी करीत पाहुण्यांनी महिन्याभरात सोहळा साजरा करण्यात आला.दागिन्यांनी लगडलेली भारीची लुगडी नेसलेली सपंदा खूप देखणी दिसत होती.....तिच्या सर्व मैत्रीणीना तिचा हेवा वाटत होता.

जाताना दोघांच्या गळ्यात पडून खूप रडली. दोघांचे दुधाने पाय धुवून भावाने आशीर्वाद घेतला. साखर पाणी देण्यात आले.इतके दिवस गोकुळी नांदलेली लेक आज भरल्या डोळ्यांनी सारखी पाठी वळून पाहत होती.कावेरी बाईंच्या  विलासरावांच्या आणि अनयच्या डोळ्याचे पाणी सरत नव्हते.शेवटी माहेरची बुत्ती देवून जड अंतःकरणाने संपदा माहेरी गेली.घर सुने सुने झाले....एक जबाबदारी पार पाडल्याचे समाधान..... लेकीला गडगंज सासर मिळाल्याचा अभिमान.... आई वडिलांना दुसरे काय पाहिजे असते अजुन.....

त्यामुळे थकवा आला असला लग्नाच्या धावपळीतून तरी सुद्धा मन समाधानाने तृप्त झाले होते.आणि थकव्या पेक्षा तेच चेहऱ्यावरून जास्त ओसंडत होते.




पाठवणी तर झाली संपदाचि आता. फुडे काय झाले ते वाचा दुसऱ्या भागात लवकरच..... माझा लेख आवडला असल्यास लाईक करा .कमेंट करा आणि  मला follow जरूर करा.