पाठवणी

Mom's thought when she is parting with her child

‘पाठवणी’ म्हटलं की डोळ्यासमोर हमखास उभं रहातं ते लग्नघर(सिरियल किंवा मुव्ही मधील म्हणूया हवं तर)! सासरी निघालेली मुलगी, भावूक झालेले जवळचे नातलगं, ती हुरहुर, भरुन आलेले डोळे! आता अगदी एकाच शहरात आणि आधुनिक काळात असलो तरी पाठवणी शब्दाबरोबर येतेच हुर हुर.
आता थोडे संदर्भ बदलतायत तशी पाठवणी पण. पूर्वी लग्नाच्या वेळी केली जायची पाठवणी आता थोडी अलिकडे म्हणजे शिक्षणासाठी बाहेरदेशी जाताना होते. आणि मुलिचीच नाही तर मुलाची पण होते. पापड, लोणची, मेतकूटापासून ते forex सगळ्याची तयारी केली जाते. आई, आजी, मावशी, काकू, आत्या लाडू, चकल्या , चिवडा इ. फराळाचे डबे तयार करतात. तिकडे गेल्यावर काय करावं , काय करु नये , कसं वागावं ह्याच्या येता जाता सुचना दिल्या जातात.  Consulate chya dates, visa appointments, documents, ticketing , तिकडचं housing arrangements हे सगळं  लगीनघाईच्या तोडीस तोड असतं. मग जायच्या दिवसाची अजुनच धांदल. Packing, बॅगांच (२२ किलो) वजन, गाडीचं बुकींग, विमानाची वेळ, सोडायला येणारे नातेवाईक! बाहेर देशी निघालेली मुलगी/ मुलगा, भरुन आलेले डोळे, तीच भावुकता तीच  हुरहुर!आता आपलं मुल परत कधी भेटेल, सगळं नीट जमेल ना, तब्बेतीची नीट काळजी घेईल ना हजारो प्रश्नांची जाळी आईबापाच्या चेहर्यावर.
संदर्भ अजुन थोडे बदलले. आपला लेक गेला की दहावीला. अजुन दोन वर्षांनी बारावी, मग तो college साठी कुठल्या  University /State मधे जाईल, किती लांब जाईल, एकटा कसं manage करेल, सगळं नीट होईल ना,  असंख्य प्रश्न , तीच हुरहुर. येवढ्या छोट्या (?) माझ्या लेकराची पाठवणी आलीच की तोंडावर!