Login

तुझ्या पल्याडची वाट...♥️

A Poem On Love


तुझ्या पल्याडची वाट.....
नेत्रांना पहायची
नासिकेला अनुभवायची
तुझ्या पल्याडची वाट....
कर्णांना ऐकायची
जीभेस चाखायची
तुझ्या पल्याडची वाट....
हातांना कवेत घ्यायची
पावलांना चालायची
तुझ्या पल्याडची वाट....
मनाला गवसायची
रे अजूनी या हृदयाला जगायची आहे ती
तुझ्या पल्याडची वाट....!!

कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे