शब्दांची वाट..✍️

A Short Poem On Words


चुकता शब्दांची वाट
मनावरी आघात झाले...
वेदनांनी माझे मन
अचानक सुन्न झाले...


शब्द अबोल झाले,की
शब्द माझ्यावर रूसले...
का भावनांचे वस्त्र
पुन्हा एकदा उसले...


का कोण जाणे
कशास मुकले...
शब्दांची वाट पाहून पाहून
माझे पाणावलेले डोळे
आता मात्र सुकले...


क्षणाक्षणाला भेटणारे शब्द
आज वाट चुकले...
कळलेच ना काही मला
माझे काय चुकले...
माझे काय चुकले...?


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे