पसंत आहे मुलगी भाग 25

सगळेजण हॉटेलवर निघून आले. सिद-आशू सुध्दा सर्व मित्रमैत्रीणींसोबत हॉटेलवर आले. गोव्यासारख्या ?

भाग २५

सगळेजण हॉटेलवर निघून आले. सिद-आशू सुध्दा सर्व मित्रमैत्रीणींसोबत हॉटेलवर आले.

गोव्यासारख्या ठिकाणी गेलोय आणि फिश खाल्ला नाही असं होणार नाही. सर्वांनी फिशची ऑर्डर दिली. आणि फिशसोबतच सर्वांसाठी ड्रिंकही रेडी होती. सिदच्या ग्रुपमधली अशी एकही मुलगी नव्हती ती ड्रिंक घेत नव्हती, सगळ्या मैत्रिणींनी आपापल्यासाठी आपापला ब्रँड मागावला.

आशू हे सगळं पाहून, प्रत्येकीच्या तोंडात विचित्रं विचित्रं ड्रींक्सची नावं ऐकून चक्रावून गेली होती. त्यात भर म्हणून, अभ्याने सिदला विचारले, सिध्द्या, तू कोणती घेणार...,

तेवढ्यात सिदने पहिले आशूकडे पाहिले...,

चैतू त्या दोघांकडे पाहत हसत म्हणाली, अभ्या... हे तू त्याला विचारतोय हे पाहूनच मला खूप हसू येतंय.. पूर्वी कसं ना रे, सिदचं सगळी ही एरेंजमेंट करायचा.. पण आता त्यालाच आपल्याला विचारावं लागतंय....

सिद शांतच होता.. तो उगाच ग्लासातलं पाणी पित म्हणाला, ए.. मी दारू घेत नाही हं...,

तेवढ्यात सगळेजण जोरजोरात हसू लागले...

दारूला दारू नाही तर त्या त्या ब्रँडच्या नावाने बोलायचं असं कोण बोलायचं..., रिया भुँवया उडवत म्हणाली..,

ए गपे.., मी तुमच्यासारखा बेवडा नाहीये.., अभ्या मला सॉफ्ट ड्रिंकच आण रे.., दारू वगैरे सोडली आपण.. असं बोलत बोलत त्याने शेजारी बसलेल्या आशूकडे पाहिले...

आशू गालातल्या गालात हसली.., सिदही हसला..

ती हलकेच त्याच्या बाजूने वाकत म्हणाली, नॉर्मल घेऊ शकतोस तू.., न घेण्यामागचं कारण काय आहे...

तो म्हणाला, नाही.., असंच.. मी नाही घेत अगं..., त्यादिवशी....

तो पुढे बोलणार इतक्यात ती म्हणाली, इट्स ओके.., मला एवढं स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये.., मी तुझी नावापुरती बायको आहे हे विसरू नकोस..., तुला हवं ते तू कर.. फक्तं.. त्यादिवशी जशी हालत करून घेतली होतीस तसं काही करू नकोस..., ती हसत म्हणाली..

तो मात्रं तिच्याकडे एकटक पाहत होता...,

ती हसत होती... तो पाहत होता..,

तेवढ्यात डॉली म्हणाली, वहिनी, तुम्ही घेत नाही ड्रिंक्स...

हे ऐकून सिदला ठसकाच लागला...

आशू पुन्हा गालातल्या गालात हसली आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला पाण्याचा ग्लास दिला...,

बाकी सगळेजण हसू लागले...,

आशू शांतपणे म्हणाली, तुम्हाला वाटतं का माझ्याकडे पाहून मी घेत असेल म्हणून...,

रिया म्हणाली, १०० टक्के नाही...,

आशू हसत म्हणाली, घ्यायचं तसं काही नाही.. पण त्यानंतर होणाऱ्या परिणामांचा विचार करून नको वाटतं..., ती सिदकडं पाहून म्हणाली...

तेवढ्यात सिद म्हणाला, काही परिणाम होत नाहीत...,

ती त्यालाच प्रश्न विचारत म्हणाली, हो...,

तो हसतच म्हणाला, यार तू त्यादिवशीच्या त्या मॅटर पासून मला बेवडाच समजायला लागली आहेस का.., मी नाही घेत दारू यार.., एक दिवस दारू पिल्याने कुणी...

ती त्याला थांबवत म्हणाली, इट्स ओके रे... किती ते स्पष्टीकरण.. आणि का...

तेवढ्यात तो म्हणाला, तू माझी बायको...

तो थांबला..., ती पण इकडे तिकडे पाहू लागली...

चैतू त्या दोघांकडेच पाहत होती. बाकीचे आपापल्या खाण्यात, ड्रिंक्स घेण्यात आणि सेल्फी काढण्यात गुंग होते...,

सिदने शेवटी ड्रिंक्स नाहीच घेतली.

सगळ्यांचं जेवण झालं आणि सगळेजण हॉटेलमधल्या लॉन्सवर सतरंज्या अंथरून बसले..,

आशूला हे काही कळेनाच.., सिदला मात्रं माहित होतं इथं काय होणार ते..

तो लगेच म्हणाला, ए मित्रांनो.. चला मी भरपूर जेवलो आहे.. मी झोपतो जाऊन.. चल आशू...

त्याच्या ह्या वाक्यावर सगळे त्याचा अक्षरशः ओढून ताणून अंथरलेल्या सतरंजीवर बसवू लागले..

अरे यार नको ना... सिद त्यांना विनवणी करू लागला...,

असं कसं.. गेम टाईम आहे.. आणि पिकनिकला आल्यावर हा गेम आपण खेळतोच..., आता तर हनिमून आहे, त्यात तुझी बायकोही तुझ्या समोर आहे.. मग आता तर तू हा गेम खेळलाच पाहिजे..., तेज्या सिदजवळ जात बोलला...

सगळेजण सिद-आशूला बसायची विनवणी करू लागले.. आशूला नक्की कोणता गेम आहे हे देखील माहित नव्हते. ती त्या गोल राउंडमध्ये सिदच्या शेजारी मांडी घालून बसली..

आणि गेम सुरू झाला...,

अगदी तोच गेम जो सगळेच बॅचलर्स नेहमीच नाईट पार्टीला खेळत असणार...

सगळेजण गोलाकार बसून मध्ये बॉटल गोल फिरवायची आणि ज्याच्यावर त्या बाटलीचे तोंड स्थिर होईल त्याने मित्रांनी सांगितलेली एखादी गोष्ट करायची.., हे फार चॅलेंजिंग असतं..

सिदला ही गेम कधीच आवडत नसे..., तो त्याच्यावर टर्न आला की तिथून पळ काढत असे.. कारण त्याचे मित्रं त्याला असं काही तरी करायला सांगायचे की जे त्याला जमत नसे.. आणि तो तिथून पळ काढत..पण आज त्याला पळता येत नव्हतं...,

आशू मात्रं फार इंटरेस्टिंगली ते सगळं पाहत होती.., एक जण गाणं म्हणत होते तर कुणीतरी कुणाची तरी अँक्टिंग.., कुणीतरी डान्स करून दाखवत तर एकाला तिथल्याच लॉन्सवरच्या एकाचा प्रॅँक करायला लावला...,

हे पाहून आशूला खूप भारी वाटत होते.., असा पण एन्जॉय असतो हे तिला कळत होतं.. हळूहळू सगळ्यांना दारू चढत होती आणि सगळ्यांची चालणारी मस्ती पाहून आशू हसून हसून वेडी झाली होती..

आणि सिद मात्रं हसणाऱ्या आशूकडे पाहून मनात म्हणत होता.., माझे दलिंदर मित्रं मला काय करायला लावणार आहेत देव जाणे.. देवा काहीतरी कर मला वाचव...,

तेवढ्यात रियावर टर्न आली..,

रिया.. रिया असे करत सगळेजण ओरडू लागले..,

संकेत लगेच बोलला.. तर रिया काय करणार तू..,

रियाचा बॉयफ्रेंड पुढे बोलला, मला काय वाटतं आता तिने काही न केलेलं बरंय.. कारण तिला जरा जास्तंच चढत चालली आहे.., ती काय करेल याचा नेम नाही..

असं कसं असं कसं.. गेम इज गेम..,  तू गप रे.., संक्या, तेज्या सांगा मी काय करायचंय.. ती तिच्या बॉयफ्रेंडच्या अंगावर रेलून बोलू लागली...,

तेज्या, अभ्या, संक्या.. ठरल्याप्रमाणे म्हणाले, ऑब्विअसली... द किस...

सगळेजण हसू लागले..

आशूने मात्रं आश्चर्याने डोळेच मोठे केले.., बापरे आता ही खरोखर करेल का किस त्याला सर्वांसमोर असा ती विचार करू लागली...

सिद मात्रं फक्तं आशूकडेच पाहत होता.., ती हसतानाही किती गोड दिसत होती, तिच्या गालावरची खळी पाहून तो इथे उगाच लाजत होता..

रियाने क्षणाचाही विलंब न करता तिच्या बॉयफ्रेंडची किस घेतली..,

आशूने तर डोळेच झाकले.., ती सिदकडे पाहत म्हणाली, खतरनाक आहेत तुझे फ्रेंड्स..

सिद तिच्याकडे तसाच पाहत म्हणाला, फार खतरनाक आहेत.., आणि आत्ता तर फुल टल्ली होत आहेत ते, माहित नाही माझं काय होणार आहे ते..,

आशू मात्रं आता पुढे कुणावर टर्न येतीये हे पाहू लागली..,

त्यानंतर चैतूच्या नवऱ्याची टर्न आली..,

त्याला सर्वांनी चैतूला सर्वांसमोर प्रपोज करायला लावले.. त्याने शांतपणे उठून एकदमच नॉर्मल तिला प्रपोज केलं..,

सिद मात्रं जोरजोरात हसू लागला..,

चैतू त्याच्याकडे रागाने पाहू लागली...

काय मॅडम.. गुडघ्यावर बसून, हातात गुलाब धरून तुला प्रपोज करणारा नवरा तुला शोधायचा होता ना..., सिद मुद्दाम तिची खेचू लागला....

तिचा नवरा लगेच बोलला, इथे खालचे खडे टोचायला लागले आहेत... आणि आधीच माझं अर्धवट काम सोडून मी आलो आहे, चैतू काय हा पोरखेळपणा.., मी जातो आहे, तू तुझं झालं की ये.., युवर फ्रेंड्स आर नॉट लाईक माय टाईप...

सिद हसत हसत उठला.. चैतूच्या खांद्यावर हात ठेवत मोठमोठ्याने हसत म्हणाला, राव चैतू.. आत्तापर्यंत इंग्लिश ढोसेपर्यंत आम्ही तुझ्या नवऱ्याच्या टाईपचे फ्रेंड होतो आणि आता मात्रं बघ काय बोलून गेला तुझा हबी..

जस्ट शटअप का सिध्द्या... कार्तिकला नाही आवडत हे असले गेम्स वगैरे., आणि तुला लय भारी प्रपोज करता येतं का.. दाखव जरा कसं करतोस तू प्रपोज.., कधी केलंस आशूला की...,

सिद पुन्हा गंभीर मोडवर आला..,

आशू शांत बसली होती..,

चल चल.., आता माझ्यावर सगळा राग काढू नकोस.., त्यासाठी सांगतो, पार्टनर असा शोधावा जो आपल्याला नाही आपल्या वेडेपणाला सांभाळू शकेल.., हा असा नाही.. माझी मिटींग नि माझी कॉन्फरन्स करणारा...,

सिद नेहमीप्रमाणे चैतूला चिडवत होता.. ती मात्रं चिडत होती..

म्हणजे आशू तुझा सगळा वेडेपणा झेलते वाटतं..

तो हसत म्हणाला, मी काही वेडेपणा करतच नाही.. विचार तिला किती सभ्य असतो मी घरी..

ते दिसतंयच.., दारू पिला नाहीस तू.. यावरूनच समजलं...,

काय.. सिदने हसत विचारले..,

तेच.. तू तुझ्या बायकोचा चेला झाला आहेस..., चैतू त्याच्या कानात बोलली, आणि तेवढ्यात म्युजिक सुरू झालं आणि ती लगेच खाली बसली आणि सगळ्यांच्या मस्तीत मिसळली..

सिद मात्रं जरासा चिडला.. तो तिच्याशेजारी बसला आणि पुन्हा तिला सांगू लागला, मी काही बायकोचा चेला वगैरे नाही झालोय हं...

ती लगेच म्हणाली, अस्सं.. मग दारू का नाही घेतली..,

तो चिडूनच म्हणाला, सज्जन झालोय मी आता...,

दारू पिणं म्हणजे सज्जन नाही असं नाही होतं.. चैतू हसत म्हणाली...

आणि तेवढ्यात आशूसमोर बाटली येऊन थांबली...

हे पाहून सिद जागेवर उभाच राहिला..,

आशू इकडे तिकडे पाहू लागली..

सगळेजण ओरडू लागले, आशू वहिनी आशू वहिनी..

आशूला आता काही कळेना, हे काय सांगतील.. ती फारच टेन्शनने सिदकडे पाहू लागली..

सिद तिच्या शेजारी येऊन म्हणाला, आशू हे बघ तुझ्या बाबांचा फोन आलाय.. जा जा दूर जाऊन बोलून ये जा.. मी पण आलोच..,

आशूने त्याच्या हातातला फोन घेतला आणि म्हणाली, कुठेय फोन...,

तेवढ्यात सगळेजण जोरजोरात ओरडू लागले, ए गप चिटर कुणाचा फोन नाही आलाय..

तर चला वहिनी.. आम्ही सांगू ते तुम्हाला करायला लागेल.. संकेत म्हणाला..

नाही नाही, मला नाही जमणार.. कुणाची खोड वगैरे काढायला तर बिल्कुल नाही हं.., माझ्यावरचा डाव या सिध्दार्थला द्या.. ती गालातल्या गालात हसत त्याच्याकडे पाहत म्हणाली..

तो तिच्याकडे लटक्या रागाने पाहू लागला..

चैतू म्हणाली, असं नाही हं आशू.. गेम आहे आणि गेममध्ये तूही सामील आहेस.. तुला आम्ही जे सांगू ते करावं लागेल.. तुला नाही जमलं तर सिद करेल ते..

हो चालेल.. आशूला हे पटलं.. ती आनंदाने म्हणाली..

चैतू पुढच्या क्षणाला म्हणाली, सो... किस युवर हजबंड.. मिन्स आमचा सिध्द्या, सिध्दू... सिद...

सगळेजण ओरडू लागले...

आशू जागेवरच थबकली..

आशू आश्चर्याने म्हणाली, काय..

अगं काय काय.. तुझ्या नवऱ्याची किस घे..,

आशू सिदकडे पाहू लागली.. सिद बारीक चेहरा करून तिच्याकडे पाहत होता..

तिच्या चेहऱ्यावरचे रंगच बदलले..,

संकेत म्हणाला, वहिनी.. तुमचा नवराच आहे हो आमचा सिद... घेऊन टाका.. आम्ही डोळे मिटतो हवं तर..

हो हो.. वहिनी होऊन जाऊदे.. रिया म्हणाली..

सिद मात्रं केसांवरून हात फिरवत खाली मान घालून उभा होता..

चैतूला या गोष्टीचं फार आश्चर्य वाटत होतं.. ती म्हणाली, कम ऑन यार... मुली आजकाल कुणालाही किस करायला पुढे मागे पाहत नाही.. तुला तर आम्ही तुझ्या नवऱ्यालाच करायला सांगितले आहे..

आशू पूर्ण गंभीरपणे सिदकडे पाहत होती..,

ठिके ठिके.. आशू वहिनी नाहीतर सिद.. असं ठरलं होतं ना आपलं... तर सिध्द्या.. तू घे.. शेवटी आपल्याला काय, तुम्ही दोघं एक येणं महत्त्वाचं आहे.... शेवटचं वाक्य हळूच म्हणत तेजसने सिदला आशूच्या दिशने ढकलले आणि तो तिच्या अंगावर आदळला..,

दोघांनी एकमेकांकडे पाहिले..,

ती रात्रं त्याच्यासमोरून जाऊ लागली.. सिदचे ते किंचाळणे आशूच्या कानात घुमू लागले..

सिद हळूच म्हणाला, काही कुणी फोर्स करणार नाहीये.. टेन्शन नको घेऊस..,

चला चला कम ऑन.. चैतू आशूला सिदच्या दिशेने ढकलत म्हणाली..,

आशूला आता खूप टेन्शन आले.. तिला काय बोलावे सुचत नव्हते..

एक काम करू का आम्ही.. आम्ही आमच्या खोलीत जाऊन करू का हे सगळं.. चल आशू..., सिद आशूच्या चेहऱ्यावरचं टेन्शन पाहून म्हणाला..

सगळेजण हसायला लागले..

संकेत म्हणाला, आम्ही काय बघायला येणार आहोत का तुम्ही रूममध्ये काय करणार ते.., जेवढं चॅलेंज दिलं आहे ते करा आणि मग जा करायचं ते करा.., नाहीतर सिध्द्या.., बघ हा..,

लग्नाआधी म्हणाला होता, जेव्हा माझं लग्नं होईल तेव्हा याच गेममध्ये तुम्हा सगळ्यांसमोर माझ्या झालेल्या बायकोची मी किस घेईल पण आता कोणत्या इतर मुलीची घेणार नाही.. आठवतंय का हे तूच बोलला होतास ना.. रिया म्हणाली...

मग आता घेऊन टाक ना यार सिद.. चैतू वैतागून म्हणाली...,

ते..., सिदला आता मित्रांच्या टोमण्याला कसं सामोरे जायचं कळत नव्हतं..,

चैतू तर आश्चर्याने त्या दोघांकडे पाहत होती.

सिद आशूकडे पाहू लागला...,

आशू त्याला हळूच म्हणाली, मला वाटतंय आपण तुझ्या मित्रांना सांगून टाकावं.., आमचं नात काय इतर कपल्स सारखं नाहीये.., लवकरच आपण वेगळे होणार आहोत हे सगळ्यांना सांगून टाकलं ना की कुणीच आपल्याला हे असले फोर्स करणार नाहीत.. तुला काय वाटतं..,

सिद म्हणाला, नॉर्मल किस..,

हे ऐकूनच आशू त्याच्याकडे रागाने पाहत त्याच्यापासून लांब झाली...,

सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे पाहूल लागले...,

एक रागाने कटाक्ष सिदवर टाकत ती तिथून निघून गेली...,

सिद मात्रं बैचेन होऊन म्हणाला, अगं पूर्ण ऐकून तर घे...,

पण ती निघून गेली.. तिने मागे वळून पाहिले नाही...,

त्याचे सगळे मित्रं उठले आणि त्याला विचारू लागले काय झालं..,

सिदने तेज्याच्या हातातलं ग्लास घेतलं आणि जोरात जमीनीवर आपटत म्हणाला, म्हणून म्हणत होतो, मी गोव्याला येत नाय, मी या असल्या फालतू गेममध्ये भाग घेत नाय.. पण तुम्ही मित्रं ना.., तुम्ही माझी वाट लावल्याशिवाय राहणार नाय.. सांगितलंय मी तुम्हाला सगळं तरी तुम्ही काय ही नाटकं लावलीत..,

रिया पुढे येत म्हणाली, सिद हे तुमच्या चांगल्यासाठीच..

आमचं चांगलं वाईट आम्ही पाहून घेऊ ना.., तुम्ही का हे असले फालतू प्लॅन करताय..,

सिद फारच चिडला होता..

चैतूला काही कळत नव्हतं... अरे सिद हा काही प्लॅन नव्हता..

तू गप, तुला काही माहित नाहीये.. सिद तिच्यावर ओरडत म्हणाला..

ती शांत बसली..,

त्याला खूप काही बोलायचं होतं पण त्याचे सगळे मित्रं तोंड पाडून उभे होते.. त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि खाली भरून ठेवलेला दारूचा ग्लास तोंडाला लावला..,

आणि रागा-रागाने बोलला.. जा यार तुम्ही सर्वांनी इथून.. थोडावेळ मला निवांत बसू द्या.. निघा आता तुम्ही, तुमचं एन्जॉय करून झालं असेल तर या आता तुम्ही...,

संकेत, अभ्या, तेज्या सिदचा राग पाहूनच तिथून निघाले.. रियाही निघाली..

चैतू तशीच उभी होती..,

आता तू का थांबली आहेस.. काय झालं कसं झालं हे विचारायला की माझ्या दुःखावर मीठ चोळायला..,

चैतू पुन्हा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली..,

अरे सिद काय बोलतोय तू...,

काही नाही, जा तू..., चल गुड नाईट...

काय झालंय हे मला कळेल का...,

चैतू जा बोललो ना तुला.. त्याने दारुचा दुसरा घोट घेतला..,

अरे... या सगळ्यांना काहीतरी माहित आहे जे मला माहित नाही.., सांग तू काय झालं आहे..,

यार का डोकं खातेय गं तू...जा म्हटलं तर समजत नाही का.. तो तिच्यावर आणखी ओरडत म्हणाला..,

ती त्याच्या शेजारी येऊन बसली आणि म्हणाली, शांतपणे काय झालं आहे हे सांगशील का.. तिने त्याच्या हातातला ग्लास खाली ठेवला..,

त्याने पुन्हा तो ग्लास उचलला..,

अरे.. मगाशी तर म्हणालास ना मी दारू सोडली...

तो रागाने तिच्याकडे पाहत म्हणाला, विसरून जा ते.., दारू म्हणजे काय माहिती का तुला.. दळिंद्री असते दारू म्हणजे.. आणि ती काय माझ्या मागून सुटत नाहीये..,

तिने पुन्हा त्याच्या हातून दारूचा ग्लास घेतला आणि म्हणाली, दारू एन्जॉय म्हणून प्यायची असते असं तूच म्हणायचास ना रे.. मग आता अचानक हे असं काय झालं तुला की तू टेन्शनमध्ये दारू पितोय... ,नक्की प्रॉब्लेम काय आहे...,

त्याने पुन्हा तिच्या हातातला ग्लास ओढला, त्यातली दारू संपवली आणि म्हणाला, तुझा नवरा तुझी वाट पाहत असेल ना गं..

नाही, आज त्याला भरपूर काम आहे.., आणि मला आज कारण ऐकल्याशिवाय इथून जायचं नाहीये...,

कसलं कारण.. त्याने तिच्याकडे पाहत विचारले...,

तूझी बायको अशी निघून का गेली...,

सिद हसू लागला..., आता ती अशी निघून का गेली हे तिला विचारायचं सोडून तू मला काय विचारते...

मग किस घे म्हटलं तर तिला एवढं ऑकवर्ड व्हायला काय झालं..

सिदने काय माहित असं तोंड केलं..,

त्याने आणखीन ग्लासमध्ये दारू ओतली आणि ग्लास तोंडाला लावले...,

काही प्रॉब्लेम आहे का सिद..,

नाही.. त्याने नकारार्थी मान हलवली.. कारण त्याला हळूहळू दारूची नशा होऊ लागली होती...,

मी काय विचारतीये.. काही प्रॉब्लेम आहे का की तुम्ही दोघं.., चैतूला नीट विचारला आले नाही..,

सिद तसाच एकटक जवळच्या स्विमिंग टॅंकमधल्या पाण्याकडे पाहत बसला होता..,

दहा-पंधरा मिनिटे दोघेही काहीच बोलले नाहीत..,

थोड्यावेळाने सिदची दारू संपली आणि तो म्हणाला, चला जाऊया आता.., चल चल.. उठ.. तुझा हबी यायचा तुझ्या नावाने ओरडत.., आपल्या दोघांनाच इथे बघून माझ्यावरच संशय घ्यायचा.., तो हसत दारूच्या नशेत बोलत होता..

तू सांगणार आहेस की नाही.. चैतूने विचारले..

काय अगं.., काय विचारते आहेस हे पण मी विसरून गेलो... तो हसत म्हणाला..,

चैतूला आता राग आला..,

तिने रागाने विचारले.., तुझ्या बायकोमध्ये आणि तुझ्यात अजून काही झाले नाहीये का...,

हा प्रश्न विचारल्यावर सिद शांत झाला.. त्याने एकटक तिच्याकडे पाहिले..,

**

इकडे आशू बैचेन होऊन रूममधून फिरत होती.. तिला झोप येत नव्हती..,

सिद नक्कीच दारू पित असणार आता. झाल्या प्रकरणात त्याची काही चूक नव्हती.. पण त्याने त्याच्या मित्रांना सांगून ठेवायला पाहिजे होतं, हा असला फाजीलपणा माझ्यासोबत करू नका म्हणून.. पण त्याने नाही सांगितलं..,

आशू स्वतःशीच बडबडत होती..

त्याने दारू खूप प्यायली की त्याला त्रास होतो.. त्याला अडवलं पाहिजे.. कुणी त्याच्या सोबत असेल की नसेल.. मी जाऊ की नको खाली.. तो मित्रांसोबत बसला असेल का..., काय करू ...

असे ना-ना प्रश्न तिच्या डोक्यात येत होते.

क्रमशः

🎭 Series Post

View all