भाग १४
सिदने आशूची फार वाट पाहिली.., ती काय त्याला कॉलेजवळ कुठेच दिसली नाही, तिचा फोनही बंदच होता.., त्याचा फारच मनस्ताप झाला.., त्याच्या डोक्यात रागाची तिडीक गेली.., त्याला हातातला डब्बा, बॅग फेकून देऊशी वाटत होतं.., तेवढ्यात त्याला ऑफीसमधून फोन आला.., खरंतर सिद असा मुलगा होता जो वयाच्या सत्तावीसाव्या वर्षीही आयुष्यात स्थिरावलेला नव्हता.., त्याचं मन एवढं चंचल होतं की मूड बदलेल तसे त्याचे विचार बदलत.., आयुष्यात नक्की काय करायचंय हेही माहित नसलेल्या त्या सिदने मात्रं आत्ता लगेच ऑफीसला जायचे ठरवले.., रागात येऊन कामाला न जाणे, त्रागा करणे अशा स्वभावाचा सिद आता कुणाचीतरी जबाबदारी खांद्यावर घेऊन जगत होता.., ती म्हणजे आशू.....,
***
दुपारी आशू घरी आली.., सिदची आई बेडवर पडली होती.., ती दबकत्या पायानेच आपल्या रूममध्ये गेली.., आधी सगळी दवाखान्यातली कागदपत्रं, औषधं आपल्या कपाटात लपवून ठेवली.., बाहेर आईला कुणीतरी आल्याची चाहूल लागली.., तेवढ्यात आशू रूममधून बाहेर आली..,
“काय गं आशू आलीस तू..?”,
“हो आई..” आशू घाबरतच बोलली..,
“बरं.. जा लवकर फ्रेश होऊन ये.., जेवायला वाढते..”, सिदची आई आपली साडी सावरत उठली..
आशू पण लगेच बाथरूमच्या दिशेने जात म्हणाली.., “हो आई.., फारच भुक लागली..”,
सिदची आई हसतच किचनमध्ये आली..,
आशू फ्रेश होऊन बाहेर आली.., दोघींनी जेवण वाढून घेतलं.., आशू भरभर खाऊ लागली..,
सिदची आई म्हणाली, “काय गं.., डब्बा खाल्लेला दिसत नाहीस तू...”,
आशू खाताखाताच त्यांच्याकडे पाहत म्हणाली, “डब्बा...???”,
“अगं डब्बा दिलेला ना मी तुम्हा दोघांना..”,
आशूला तर प्रश्नं पडला.., ती पुन्हा मान हलवत म्हणाली, “नाही..”,
“अगं बाई.., तुम्हा दोघांना एकाच बॅगेत डब्बा दिलेला मी..”,
“ओहह..., मग ते सिद्धार्थकडेच राहिला असेल..”, आशू खाताखाताच बोलली..
“अस्सं होय.. म्हणूनच तुला एवढी भूक लागली... बरं जेव आता निवांत...”,
***
ईकडे सिदचा लंच ब्रेक झाला होता.., आज तो आणि संकेत दोघंच वेगळ्या टेबलवर जेवायला बसले होते..,
सिदचा टेन्शनवाला चेहरा पाहून संकेत त्याला तो आल्यापासून विचारत होता, अरे काय झालंय.. सांगशील का...
पण हा काही बोलत नव्हता..,
शेवटी जेवताना संकेतने विचारलेच.. “वहिनींशी भांडलास की काय रे....?”
तसा सिद रागाने बोलू लागला, “अरे सकाळी मी तिला कॉलेजला सोडलं.., कॉलेजमध्ये एक्स्ट्रा लेक्चर असल्याचं सांगितलं तिने..”,
“मग..?”, संकेतने विचारले..
“मी तिला सोडून निघालो.., पण तिचा डब्बा माझ्याकडेच राहिला.., म्हणून तिला फोन केला.., आधी बिझी.., मग नॉट रिचेबल.. नंतर तर डायरेक्ट स्विच ऑफच...”
संकेत घास चावतच बोलला, “अरे मग कॉलेजमध्ये जाऊन पाहायचं ना..?”,
“अरे गेलो ना..., तिचा क्लास शोधला.., बंद होता.., बाहेर येऊन पिऊनला विचारलं तर त्यांनी सांगितलं की कसलेच लेक्चर चालू नाहीत.., आणि एक्सटर्नल स्टुडंटचे तर कसलेच नाही...”,
संकेत आता विचारात पडला..,
“तू आत्ता फोन कर बरं वहिनींना..”, संकेत म्हणाला..
“अरे कसलं काय.. स्विच ऑफच आहे...”, सिद हात झटकत म्हणाला..
“मग घरी काकूंना कर ना.., वहिनी घरी आल्यात का वगैरे विचार ना...”,
सिदला हे पटलं.. त्याने पटकन आईला फोन केला...,
आईने जेवता जेवताच जवळच्या सोफ्यावरचा फोन घेत हसत म्हणाली, “हे बघ शंभर वर्षं आयुष्यं ह्याला..”
असं म्हणत आईने फोन उचलला..
“आई आशू आलीय घरी...”,
सिदचा एवढा गंभीर आवाज ऐकून आई हसत म्हणाली, “आली ती एवढ्यातचं.., पण तुला काय झालं रे..?”
सिदने आईला पुढे बोलूच दिले नाही..
“तिला फोन करायला सांग...” तो गंभीर स्वरातच बोलला..
“बरं.., जेवतीय रे ती.., तिचा डब्बा तुझ्याकडच राहिला.., भूक लागली ना पोरीला.”...,
सिदने फोन ठेवलेला होता...,
आशू जरा घाबरली होती..,
“असा कसा गं हा.. ठेवून दिला फोन...”, आई म्हणाल्या..
आशूने घाबरतच विचारले, “माझ्याबद्दल विचारत होता का..?”
“हो..., तुला फोन करायला लावलाय...”
आशू लगेच अस्वस्थ झाली..,
“ए बाळा.. तू जेव निवांत.., जेवण झाला की कर.., जेव जेव..”, आई म्हणाली..
आशूला घाम आलेला होता..,
जेवण होताच ती रूममध्ये आली.., तिचा फोन ऑन केला.., सिदचे भरपूर मिसकॉल आले होते.., ती जराशी बेडवर बसली..तेवढ्यात त्याचा परत फोन आला...,
आशूने फोन उचलला, तिकडून सिद तावातावात बोलणार इतक्यात संकेतने त्याला डोळ्यांनीच इशारा केला फोनवर काही विचारू नको...,
“हॅलो.., सिद्धार्थं...”, आशू बोलली.
“ह्म.., काय गं पोहचलीस का घरी..”,
“हो.., केव्हाच..”, आशू म्हणाली..,
“बरं.., अगं मला फोन कर म्हटलेलो ना.., मी आलो असतो तुला घ्यायला.., लंच ब्रेक तर झालाय आमचा..” सिद उगाच शांतपणे म्हणाला..
“नाही अरे.., तुला कशाला त्रास.., आले मी...”,
“बरं.. झालं का मग लेक्चर...?”, सिदने पुढे विचारले..
आशूला हा नको असलेला प्रश्न वाटला.., ती शांतपणेच म्हणाली, “हो झालं.., का रे...?”,
“नाही असंच विचारलं.., बाकी काही नाही..”,
सिदचा स्वर तिला काही वेगळाच वाटत होता..,
तिने फोन ठेवला.. आणि बेडवर पडून विचार करू लागली...,
संध्याकाळी सिद रागातच घरी आला.., त्याच्या चेहऱ्यावर रागाच्या छटा उमटल्या होत्या..,
तो सरळ रूममध्ये निघून गेला..
जेवतानाही तो कुणाशीच बोलत नव्हता.., रोज घरी आल्या-आल्या घरात इकडून तिकडून थुई-थुई करणार हा सिद आज जरा शांतच होता..,
बाकी सगळ्यांचे त्याच्याकडे लक्षं नव्हते पण आशू मात्रं त्याच्याकडे पाहत होती.., आशूकडे पाहून त्याने चेहरा फिरवला.., इकडे आशूची धडधड वाढू लागली...,
जेवण होऊन सिद परत आपल्या रूममध्ये गेला.., सगळेजण झोपायची तयारी करू लागले..,
आशू पण सगळं काम आवरून रूममध्ये गेली..,
सिद तिची वाटच पाहत होता.., त्याच्या डोक्यात खूप सारे विचार येऊन गेले होते.., पण आपण घरी आहोत आणि आपण ज्या व्यक्तीबाबत हा विचार करतोय ती आशू आहे.. या दोन कारणांमुळे तो गप होता..,
आशू शांतपणे येऊन जवळच्या खुर्चीवर बसली.. तिला काय बोलावे ते सुचत नव्हते..,
सिद तिच्या समोर येऊन स्टुलवर बसला..., तशी आशू घाबरली...,
“बरं वाटतंय का आता..?”, सिदने काळजीने विचारले..
आशू विचारात पडली.., मला कुठं काय झालंय.. असे भाव तिच्या चेहऱ्यावर होते..,
“अगं तुझी कंबर बरीय ना आता..?” त्याने विचारले..,
तसं आशूला आठवलं.., ती चाचरतच बोलली.., “हो बरीय...”
सिद बोलत होता शांतपणे पण त्याचा चेहरा फारच रागाने लाल झाला होता.., आता तिला त्याची भितीच वाटू लागली होती..,
“तुझा डब्बा माझ्याकडे राहिला होता..”,
“अच्छा..”, ती एवढंच बोलली..
त्याच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या होत्या..., त्याला त्याचा राग दाखवत येत नव्हता..,
ती आता उठली आणि बेडवर पडत म्हणाली.., “चल झोपते मी.., गुड नाईट..”.,
इकडे सिद रागाने तडफडत होता.., तो आता तडक उठला आणि तिच्याजवळ येत बोलला..,
“मी आलेलो कॉलेजमध्ये.. तू कुठेच दिसली नाहीस.., नक्की कुठे गेली होतीस तू...?”,
आशू दचकून बेडवरून उठली...,
तो पुन्हा तिच्यावर ओरडत म्हणाला, “मी काय विचारतोय.., तू कुठे गेली होतीस..?”,
आशूला हे ऐकून फारच राग आला..,
म्हणजे तू माझा पाठलाग करत होतास...,
सिद आता आणखी मोठ्याने बोलला.., “तुला मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे...”,
आशूच्या डोळ्यात पाणी आलं होतं.., “तू मला हे असं विचारतोय म्हणजे तू माझा पाठलाग करत होतास का...?”,
“अगं तू कॉलेजमध्येच गेली होतीस ना.., की दुसरीकडे कुठे.., तुझा पाठलाग करायला...”,
“दुसरीकडे कुठे...?”, आशू आता रडत बोलली...,
“मला काय माहित कुठे.., मी पण तेच विचारतोय...” सिद रागानेच बोलला..,
आशू बेडवरून उठली.., “मी कुठे गेली होते ह्यापेक्षा तू माझ्यावर संशय घेतोय ह्याचा जास्तं त्रास होतोय मला...”,
“अरे..., तू मला कॉलेजचं नाव सांगून दुसरीकडे गेलीस.., आणि तू मलाच बोलतीयस की मी संशय घेतोय...”
“अरे मग हे काय आहे.., कुठं गेली होतीस.., का गेली होतीस.., तू तर शेवटी तुझी लायकी दाखवायलाच सुरूवात केली.., जसा मी विचार केला होता तसाच निघलास तू..”,
ती डोळे पुसत खिडकीजवळ येऊन उभी राहिली..,
सिदला हे ऐकून धक्काच बसला.., तो शांतपणे बोलला..., “तू हे काय बोलतीय..., लग्नाला अजून आठवडा पण नाही झालाय आपल्या आणि तू माझी सरळ-सरळ लायकी काढतीयस..., तू हे सगळं असं बोलशील मी स्वप्नातही विचार केला नव्हता...”, तो निराश होऊन तिच्या शेजारी उभा राहिला..,
“तू ही संशयच घेतलास ना माझ्यावर.., माझ्या हातावरची लग्नाची मेहंदीही अजून गेली नाहीये..., लग्नाआधी तर दडपणात होतेच मी.., वाटलं लग्नं झाल्यावर तरी कुणी असे घान संशय घेणार नाहीत माझ्यावर.., पण तू तर.., आज दाखवून दिलंस.., पुरूष हे पुरूषच असतात शेवटी... तुम्हाला नेहमी स्त्रियांवर ताबा मिळवायचा असतो..,कुठे गेली होतीस, का गेली होतीस.., इकडेच का गेली.., तिकडेच का गेली.., ”, ती त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली..
तो निराशतेने शांतपणे म्हणाला, “बरोबर आहे.., तुला प्रश्नं विचारायची माझी लायकी नाही.., शेवटी तू हे बोलूनच दाखवलंस.., माझी खरंतर तुझ्याशी लग्नं करायचीही लायकी नव्हती.. हे मला आज कळलं...”,
ती काहीच न बोलता इकडे बेडवर येऊन बसली..,
तो पण तिच्यामागे येत खुर्चीवर बसत म्हणाला.., “मला नाही वाईट वाटलं.., तू उलट खूप लवकरच सांगितलंस मला.., की तुला माझ्याबद्दल काय वाटतं ते...”,
आशू रागात म्हणाली, “खरंतर तुझ्यासारख्या मुलाशी मी लग्नं केलं हीच खूप मोठी चूक केली मी.., पुरूष हे संशयीच असतात हे माहित होतं मला.., पण इतक्या लवकरच तू असा वागशील माझ्याशी नव्हतं वाटलं मला..,”
सिद डोळे पुसत मिश्किल हसत म्हणाला, “सातच दिवसांतच तुला माझा त्रास व्हायला लागला...., किती छान गोष्टं आहे ना ही...”,
आशू रागातच होती.., ती मनात म्हणाली.., या असल्या मुलाशी मी लग्नं केलंय.. जो साधा माझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही., काळजीने मला विचारू शकत नाही की मी कुठे गेलेले, का गेलेले...,
तेवढ्यात सिद शांतपणे म्हणाला, “तू मला वैतागली असली तरी मला तुझी काळजीच वाटत होती, म्हणून मी एवढ्यावेळ ताटकळत तुझ्या कॉलेजच्या बाहेर उभा होता.., पण तू..., तू तर फोन स्वीच ऑफ करून बसली होतीस.., काय तुझं महत्त्वाचं काम असेल., तू मला का सांगशील.., मी तर तुझ्या लायकीचाच नाही...”,
आशूच्या डोळ्यात पाणी आलं होतं.., दवाखान्यात केबिनमध्ये जाताना तिने फोन ऑफ केला होता.., ती विसरून गेली.., थकून घरी येऊनच तिने फोन ऑन केला.., हे तिला आठवलं.., ती रडतच दुसरीकडे तोंड करून बसली...,
तो शांतपणे म्हणाला, “अजूनही तुला वाटत नाहीए की मला सांगावं की तू कुठं होतीस ते...”,
ती मनात म्हणाली, काय सांगू मी ह्याला.., मी दवाखान्यात का गेले होते, समजून घेणार आहे का हा असला टिपिकल स्वभाव असलेला..., नाही समजू शकणार तो.., कधीच नाही...,
सिद आता रागाने उठला.., तिच्या समोर येऊन बसला.., त्याने तिचे हात घट्टं पकडले आणि म्हणाला, “तू का अशी वागतेयस.., फक्तं तू कुठं गेली होतीस हे विचारलं मी तुला...”, तो नकळत तिचा हात जोरात दाबू लागला.., तिच्या जवळ येऊन रागाने तिला हे विचारू लागला.., आशूचा राग आता मस्तकात गेला.., त्याच्या अशा वागण्याने तिचा उरला सुरलेला स्वाभिमान दुखावला..,
ती त्याचा हात सोडवत म्हणाली, “म्हणजे आता जबरदस्तीही करणार का तू..., का मारणार मला.., काय करणार काय तू सांग मला आधी..”,
सिद वैतागत म्हणाला, “काय बडबडतीय तू..”, त्याने तिचा हात सोडला...,
ती रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाली, “आज माझ्या अंगाला हात लावायला प्रयत्नं केलायस तू.., परत जर जबरदस्ती करायचा प्रयत्न जरी केला ना तर याद राख...”,
सिद आता पूरता खचून गेला.., हे सगळं काय होतंय त्याला कळत नव्हतं..., आशूने अंगावर ब्ल्रॅंकेट घेतले आणि झोपू लागली..,
तो तिच्या हाताचा कोपरा धरत म्हणाला, “तू ती आशू नाहीच.., जिच्या मी प्रेमात आहे....”,
तिला झिडकारत तो रूमच्या बाहेर निघून गेला...,
आशू पुरती कोसळली.. तिच्या डोळ्यातून गंगा जमूना नॉनस्टॉप वाहू लागल्या...,
बाहेर सिदपण अंगणात येऊन डोळे टिपत बसला..,.., आशूचा एक एक शब्दं त्याच्या ह्रदयावर वार करून गेला होता...,
दोघंही आज एकमेकांपासून दुरावले होते.., क्षुल्लक कारणावरून..., सिदने आपल्यावर संशय घेतला अशी आशूची समज झाली होती आणि आशू आपल्याला फसवत आहे असा सिदचा समज झाला होता...,
दोघांच्याही स्वप्नातले राजा-राणी वेगळेच होते.., वेगळीच स्वप्नं होती त्यांची आपल्या साथीदाराकडून.., पण इथं झालेलं मात्रं उलटंच.., दोघांची नको असलेलीच रूपं एकमेकांच्या नजरेस पडली होती..., जी खऱी नव्हती.., पण दोघांना मात्रं खरी वाटत होती..,
असं म्हणतात नव्याचे नऊ दिवस असतात.., पण इकडे तर अजून नऊ दिवसही पूर्ण झाले नव्हते..., की यांच्यामध्ये मतभेद झाले होते.., आता हे मतभेद कधी आणि कसे दूर होतील..., हे पुढच्या भागात नक्की कळेल.....,
क्रमशः
Bhartie “शमिका”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा