Nov 30, 2020
कथामालिका

पसंत आहे मुलगी भाग 13

Read Later
पसंत आहे मुलगी भाग 13

 

पसंत आहे मुलगी

 

भाग १३

 

सिदने आशूच्या हातातली गिटार बेडवर मागे फेकून दिली.., आणि अधीर होऊन तिला जवळ घेऊ लागला.., आशू मात्रं त्याला अजूनही दूरच सारत होती.., तिचा चेहरा पूर्ण घामाने भरला होता.., तिला खरोखरंच आता गुदमुरू लागलं होतं.., पण सिद तिला सोडायचं काही नाव घेत नव्हता..,

तो आता पूर्णपणे तिच्यावर झोकला जात होता.., त्याचे ओठ तिच्या ओठांना भिडण्यासाठी आसुसलेले होते.., त्याने पूर्ण ताकदीने तिला त्याच्याजवळ घेतले आणि त्याच्या एका हाताने तिच्या खांद्यावरची ओढणी बाजूला सारू लागला.., तेवढ्यात आशूने त्याला जोरात दूर केले.., ती बेडवरून उठून बाजूला उभी राहिली..,

सिदला वाटले ही लाजत आहे..., तो पुन्हा मागून येऊन तिला बिलगला.., तिच्या ओढणीशी खेळू लागला.., पुन्हा तिच्या मानेवर त्याने ओठ टेकवले...,

आशू ओढणी सावरत म्हणाली, “एक वाजून गेलेत..., प्लीज, मला झोप आलीय..”,

सिदने तिला त्याच्याकडे वळविले आणि हसत म्हणाला, “तुझ्या मिठीत खूप ऊब मिळतेय गं.., नको ना दूर करू...”, असं म्हणत तो आणखीनच तिला बिलगू लागला..,

सिद आता ऐकणार नव्हता.., त्याच्या ताकदीसमोर तिची ताकद कमीच पडत होती.., त्याने पुन्हा तिला बेडवर ढकलले तिच्याजवळ येत तो स्वतःच्या शर्टाची बटणं खोलू लागला..,

तशी आशू घाबरली.., तिचे पूर्ण अंग थरथरू लागले.., ती पुन्हा ओढणी जवळ घेत म्हणाली, “सिद्धार्थं...”,

आशूचा एवढा गंभीर चेहरा बघत तो हसत म्हणाला, “किती घाबरलीयस गं तू.., वेडी कुठची.., काय खाणार थोडीच आहे मी तुला..?”, असं म्हणत तो बेडवर आला..., आणि तिच्या अंगावर झोकला गेला..,.,

पुढे काय होणार याची कल्पना आशूला आली.., ती जरा घाबरतच त्याला दूर करत म्हणाली.., “सिध्दार्थं मला काहीतरी सांगायचं आहे...”,

सिदला आताही हसूच आलं... तो म्हणाला, “ही काय चर्चा करायची वेळ आहे का आशू बाळा...”, तो फारच लाडीवाळपणे तिच्या गालांवरून हात फिरवत बोलला...,

आशू अजून दूर होत म्हणाली.., “खूप सिरियस आहे..”,

तो आता काळजीने बोलला, “काय झालं..?, काही होतंय का..?”,

आशू चाचरत बोलली.., “हो .. ते .., मला आज बरं वाटत नाहीये..., आय मिन.., त्रास होतोय...”,

सिद आता तिच्यापासून थोडा लांब झाला आणि तिच्या डोक्याला हात लावत बोलला.., “काय गं.. काय होतंय..?”

ती चाचरतच बोलली..., “ते.., हो.., ते कंबर पाठ दुखतीय फारच..”, असं म्हणत ती खाली नजर घालून बसली..,

सिद आता जरा चेष्टेत बोलला, “दाबून देऊ का कंबर...”, असं म्हणत तो परत तिच्या जवळ आला..,

आशू जरा रडवेली होत म्हणाली, “दाबून काही होत नाही..., महिन्यातले असे काही दिवस असतातच.., खूप त्रास होतो आम्हा मुलींना..., तुला नाही समजायचं..”, असं बोलत ती त्याच्यापासून दूर झाली..

आता सिदला समजलं.., तो काळजीने म्हणाला, “सॉरी.., मला नव्हतं माहित..”, असं म्हणत तो तिच्यापासून लांब झाला आणि आपलं शर्ट अंगात घातलं..,

ती डोळे पुसत म्हणाली, “इट्स ओके.., तुला कसं माहित असणार...”,

तो तिच्या शेजारी येऊन बसला.., शर्टची बटणं लावत म्हणाला, “खूप त्रास होतो का.., काही गोळी वगैरे नाही का त्याच्यावर...?”,

ती त्याची नजर चोरत म्हणाली, “नाही.., फक्तं आराम करायचा असतो.., बाकी नाही काही..”,

तो लगेच बेडवरचे बेडशीट नीट करत म्हणाला.., “झोप ना मग.., चल..”, तिला धरून त्याने बेडवर झोपवले.., तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, “आधी सांगायचं ना.., उगाच तुला आणखीन त्रास झाला असता.., माझं चुकलं.., झोप आता तू शांत...”,

तिला झोपवत तो त्या बाजूने बेडवर येऊन पडला.., आशूने याबाजूला तोंड वळवले..,

सिदने ब्लॅकेट अंगावर घेतले आणि शून्यं नजरेत रूममधल्या फॅनकडे पाहत बसला...,

 

***

सकाळी सिद उठला तर आशू बेडवर नव्हती.., त्याने घड्याळ्यात पाहिले तर साडेआठ वाजले होते.., तो उठून बाहेर हॉलमध्ये आला.., सगळेजण त्याच्याकडे पाहून हसत होते..,

सिद रागात म्हणाला, “असं हसताय काय.., रात्रंभर तुम्ही सगळेजण झोपलात की असेच बसून होतात..?”,

संदिप त्याला समजावत म्हणाला, “असा चीडचीड काय करतो रे उठल्या उठल्या...”,

“चल.., जा लवकर अंघोळ करून घे..”, त्याची आई म्हणाली..,

तो तसाच नाराज चेहरा घेऊन फ्रेश व्हायला गेला..,

सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडं पाहत बसले..,

“काल यांची पहिली रात्रं होतीं.., दोघांच्याही चेहऱ्यावर कसलंच कसं तेज नाहीये..”, वहीनी तिचं आवरत म्हणाली..,

“हो ना.., ती आशूपण सकाळ सकाळ रडत होती किचनमध्ये.., मी आले तर दचकलीच.., विचारतेय मी तिला तर म्हणतेय कांदा कापताना आलं डोळ्यात पाणी..”,

“आपला सिध्द्या काही बोलला नसेल ना, पहिल्याच रात्री भांडणं नसेल ना केली याने..?”,संदिप म्हणाला.

“अरे काल तर छान गाणं वगैरे गाऊन दाखवलं तिला.., छान रोमॅंटिक वातावरणात कसली आलीय भांडणं..,नका टेन्शन घेऊ रे तुम्ही लहान सहान गोष्टीवरून..”, सिदचे बाबा म्हणाले...,

 

थोड्यावेळाने सिद आवरून हॉलमध्ये आला.., त्याला ऑफीसला जायचे होते.., तो आईला म्हणाला, “आई नाष्टा दे..”,

आई लगेच आत किचनमध्ये गेली..,

संदिप आणि वहिनी कामाला निघाले होते.., पण सिदचा पडका चेहरा पाहून ते थांबले...,

“काय सिध्दू.., एवरीथिंग इज ओके ना..?”, संदिपने विचारले..

आता हा कशाबद्दंल विचारतोय हे सिदला समजलं तो हसत म्हणाला, “अरे दादा.., रात्रंभर झोप झाली नाहीये.., डोळ्यावर अजूनही तंद्री आहे.., आणि तू काय विचारतोय, एवरीथींग इज ओके ना..,”

हे ऐकून सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.., तेवढ्यात आशू किचनमधून बाहेर आली..,  सिद खोटं बोलला हे तिने ऐकले..,

“ए आशू चल बस नाष्टा करायला.., चल..”, सिद आशूकडे पाहत म्हणाला..,

आशू चाचरत म्हणाली, “नको मी चहा घेतलाय.. तू कर नाष्टा.”..,

सिदच्या आईने सिदला नाष्टा दिला..,.., तोपर्यंत संदिप-वहिनी कामावर निघून गेले.., आईपण किचनमध्ये निघून गेली..,

आशूने पटकन रूममध्ये जाऊन आवरले आणि ती बॅग घेऊन बाहेर निघाली..

तेवढ्यात सिद म्हणाला, “अगं कॉलेजला चाललीस का..?, थांब मी ड्रॉप करतो..”,

“नाही नको.., तू निवांत नाष्टा कर.., मी जाते..”, आशू चाचरत बोलली..,

“अगं झाला माझा नाष्टा.., थांब..”, सिद भरभर खात म्हणाला.., “एकतर आधीच तुला बरं वाटत नाहीये.., कुठं बसने जातेस...”,

आशूकडे थांबण्यापलीकडे काही पर्याय नव्हता.., तिने फोन पाहिला आईचा फोन येत होता.., तिने सायलेंट केला.., घड्याळ्यात नऊ वाजून गेले होते.., ती मनाशीच बोलली, या आईनेपण आजचीच का अपॉईंटमेंट घेतली कोण जाणे.., डॉक्टर पळून जाणार आहेत का मी...,

तोपर्यंत सिदचा नाष्टा झाला.., तो म्हणाला “चल..”, तशी आशू दचकली..,

सिदने डब्बा घेतला आणि ते दोघं आईला नमस्कार करून निघाले..,

आशूला आता टेन्शन आलं होतं.., तिला नऊपर्यंत तिच्या नेहमीच्या दवाखान्यात जायचं होतं.., आणि आता सिद तिला कॉलेजला सोडणार होता.., तिला त्याला सगळं खरं-खरं सांगायचं होतं..,

सिदने तिला गाडीवर बसायला सांगितलं..,

आशू गाडीवर बसली आणि म्हणाली, “सिद्धार्थ तुझ्याशी बोलायचं आहे..”, सिदने हेल्मेट घातलं होतं.., रस्त्यावर ट्रॅफीकमुळे त्याला काहीच आवाज येत नव्हता..,

आशूने त्याला हलवले.., त्याने लगेच गाडी बाजूला घेतली, “काय गं आशू काही होतंय का..?”,

त्याच्या चेहऱ्यावरची ही काळजी पाहिली की तिला त्याला काही सांगूच वाटत नव्हतं.., तो कसा रिएक्ट होईल त्याला काय वाटेल.., तो हे सगळं स्विकारेल का.., आशूच्या बाबांनी त्याचा विश्वासघात केला, फसवलं असे विचार त्याच्या मनात येतील का., असा विचार आशू करत..,

ती म्हणाली, “काही नाही.., थोडी हळू गाडी चालव असं म्हणायचं होतं...”,

सिद हसत म्हणाला, “मॅडमजी.., उलट आज फारच कमी स्पीडमध्ये चालवतोय मी गाडी.., नाहीतर रोज मी गाडी चालवत नाही पळवतो..”,

आशू हसली पण तिच्या चेहऱ्यावर टेन्शन होतं...,

 सिदने तिला कॉलेजवळ सोडलं..., त्याने आशूला विचारलं की घरी कधी जाणार म्हणून...,

ती म्हणाली,.., “आज सर आम्हाला काही एक्झामचे टिप्स देणार आहेत.., तर त्यांचे स्पेशल लेक्चर होणार आहेत.., दुपारपर्यंत जाईल घरी..”,

सिद म्हणाला, “ओके.., नीट जा.., बाय...”,

तो पुढे जाताच आशूने तोंडावरचा घाम पुसला.., आणि ती तो पूर्णपणे जाण्याची वाट पाहू लागली.., तेवढ्यात तो परत मागे वळला..,

“अगं.., तुझा नंबर तरी दे मला.., तुला फोन कसा करू मी..”,

आशूने गडबडतच त्याला नंबर दिला...,

“चल बाय.., फोन कर निघाली की..”, असं म्हणून सिद निघून गेला...,

 

तो जाताच आशूने आईला फोन केला..,

“अगं आशू ये गं लवकर.., डॉक्टर जातील बघ.., त्यांना इथून दुसऱ्या दवाखान्यात पण जायचंय.. लवकर ये तुझ्यासाठीच थांबलेत बघ..”,

आशू रिक्षाला हात करत म्हणाली, “आई निघालेय बघ.. येतेच...”,

असं म्हणत आशू रिक्षात बसली आणि निघाली...,

तेवढ्यात सिद परत गेटसमोर आला.., तिचा डब्बा त्याच्याकडेच राहिला होता.., त्याने आशूला कॉल केला.., पण तिचा फोन बिझी येत होता..,

तिचा फोन बिझी म्हणून तोच गेटमधून आत आला.., सिक्युरीट गार्डने त्याला अडवले.., पण त्याने डब्ब्याचे कारण सांगितल्यामुळे त्याला आत सोडले..,

तो तिचा वर्ग शोधत शोधत आला.., पण वर्गात कुणीच नव्हतं.., परिक्षा काही आठवड्यांवर आल्या असल्यामुळे लेक्चर होत नव्हते..., आणि आजही कोणतेच स्पेशल लेक्चर वगैरे नाही.., असं तिथल्या शिपायाने सांगितलं..,

सिदला जरा प्रश्नं पडला.., आशू गेली कुठे मग.., असा विचार करत तो पूर्ण कॉलेजमध्ये तिला शोधू लागला.., त्याने परत तिला फोन केला तर तिचा फोन आऊट ऑफ रिचेबल येत होता..., त्याला आता आशूचा राग आला होता.., तो वारंवार आशूला फोन करत होता आणि तिचा फोन आउट ऑफ रिचेबल येत होता.., तो अर्धातास तिथंच गाडी घेऊन बसला.., थोड्यावेळाने त्याने परत फोन केला तर आता तिचा फोन स्विच ऑफ लागला..., आता त्याच्या डोक्यात एक तिडीक गेली.., त्याला आज पहिल्यांदा कुणावर तरी एवढा राग आला होता.., तो डोक्याला हात लावत इकडून तिकडे तिच्या कॉलेजसमोरून फेऱ्या मारत बसला...,

 

क्रमशः

 

Bhartie “शमिका”