Login

पसंत आहे मुलगी भाग 12

Siddhartha a chocolate boy and a cool boy, who is don't tense about his future and he don't have dreams.. and he don't want to marry anywhere. but when he meets ashwing, his thought changes strangely, ashwini, his bride to be.. he loved her at a fir

भाग १२

सिद नेहमीप्रमाणे ऑफीसला गेला.., आज दुपारी आशूला घ्यायला जायचे म्हणून तो जरा जास्तंच खूश होता.., त्याने ऑफीसमध्ये हाफ डे सांगितला होता..,

आशूपण आज सकाळपासूनच सिदची वाट पाहत होती.., पण जेवढी ती वाट पाहत होती तेवढीच ती अस्वस्थपण होती.., तिची अस्वस्थता पाहून तिच्या आईने तिला महत्त्वाचा प्रश्न विचारला, काय गं आशू.., जावईबापूंना खरं काय ते..,

तेवढ्यात आधीच अस्वस्थ असलेली आशू म्हणाली, नाही अजून...,

तिची आई तेवढ्याच चिंतेत म्हणाली, टेन्शनच आहे बाई हे एक..., त्यांना कळेपर्यंत, ते ते स्वीकारेपर्यंत.., माझ्या जीवाला घोर लागून राहणार.., या आधीची कित्येक स्थळं त्या एका कारणामुळं तुला नाकारून गेली..,पण आता बाई लग्नं झालंय.., लग्नानंतरच्या सगळ्याच गोष्टी अवघड असतात...

आईने थोडा पॉज घेतला आणि पुढे म्हणाली,  पण तुझा नवरा त्या लोकांमधला वाटत नाही मला.., तो नक्कीच समजून घेईल...,

होप सो.., आशू शांतपणे म्हणाली..,

***

त्यादिवशी सिदची वहिनीपण लवकरच घरी आली.., आपल्या लाडक्या दिराची बाकी काही हौस झाली नाही पण त्याची पहिली रात्रं मात्र मस्तं झाली पाहिजे असा तिने विचार केला.., त्याबद्दलचीच तयारी करण्यासाठी ती लवकर घरी आली..,

दुपारी सिद आशूला घेऊन आला.., आशूला तर पुन्हा तिचा गृहप्रवेश झाल्यासारखे वाटत होते.., कारण आज तिच्यामध्ये फारच बदल जाणवत होता.., त्यादिवशी रडत रडत येणारी आशू आज हसत घरात येत होती.., हे पाहून सिदपण मनोमन खूश होता..,

संध्याकाळचा स्वयंपाक आशूने केला.., पनीरची भाजी, व्हेज पुलाव, पुऱ्या आणि श्रीखंड असा तिने बेत आखला, हे सगळं तिच्या हातचं खाताना सिद हरवून गेला होता.., आपल्याला बायको मात्र सुगरण भेटली असं तो मनातच म्हणाला..,

जेवण होताच संदीप म्हणाला, चला.., चला.., आज खूप जेवण झालंय.., आज छान टेरेसवर अंताक्षरी खेळूया.., काय बाबा..,?” त्याने बाबांना विचारले..

हो तर.., चला चला.., सरिता.. छान हळद दूध घेऊन ये गं.., बाबा सहज म्हणाले पण संदीप आणि वहिनी त्याचा संदर्भ सिदशी लावत हसू लागले.., सिद पण गालातल्या गालात हसला.., पण आशू मात्रं लाजतही होती आणि तेवढीच अस्वस्थंही होती..,

सिदने घड्याळ्यात पाहिले तर दहा वाजले होते.., आता यावेळेला काय ह्यांना अंताक्षरी सुचली असे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते.. पण दादा-वहिनी उगाच त्याला छळत आहे हे त्याला समजलं..,

तो म्हणाला.., नाही, नाही.., आज भरपूर जेवण झालंय.. आता मी तर झोपणार..,

बाबा लगेच म्हणाले, झोप मग.., अंथरूण टाकून देऊ का.., बाबा हॉलमधल्या बेडकडे बोट दाखवत म्हणाले.., तसे सगळेजण हसू लागले..,

सिदला राग आला.., त्याला समजलं हे सगळेजण त्याची आता खेचणार आहे.., त्याने वहिनीकडे रागाने पाहिले.., पण संदीप- वहीनी हसत हसत चटया, पाण्याचे तांबे घेऊन टेरेसवर पळाले.., शेवटी सिदचे बाबा आशूला आणि त्यालापण घेऊन वर गेले.,

आईने पण थोडाफार किचनओटा आवरला आणि तीपण टेरेसवर गेली..,

सिद रूसून बसला होता.., तो दादा- वहीनी आणि बाबांकडे खुनसी नजरेने पाहत होता.., आशूला तिथे बरे वाटत होते.., ती आता कोणताच विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हती.., जे चाललंय ते चालूदे असं तिचं मन सांगत होतं..,

ती अशीच सून्न बसली असतांना अचानक सिद तिच्याजवळ येऊन बसला आणि त्याचा तिला धक्का लागताच ती भानावर आली, ती जरा बाजूला सरकून बसली..,

इथे सिद, आशू आणि आई.., तर दुसऱ्या टिममध्ये संदिप- वहिनी आणि बाबा.., असे प्लेयर्सं बसले.., आणि त्यांची अंताक्षरी सुरू झाली..,

सगळेजण आळीपाळीने गाणे म्हणत होते.., पण आशूच्या मात्रं ह्रदयात धडधडत होतं.., तिला घाम आला होता..,टेरेसवर मस्तं गार वारा वाहत होता.., पण ही मात्रं घामानं डबडबली होती..,

सिद अजूनही चोरट्या नजरेने तिच्याकडे पाहत होता आणि तिने पाहिले की लगेच नजर चुकवत होता..,

सर्वजण गाण्यामध्ये गुंग असतांना तो हळूच तिच्या बाजूने झुकला आणि म्हणाला, ये.., रडूबाई.., जरा हसत पण जा कधीतरी...,

सिद पूर्ण फ्रेंडली तिच्याशी बोलला.., पण आशूला काही समजलेच नाही.., ती जरा त्याच्यापासून लांब झाली..,

तो परत तिच्या जवळ सरकला.., काय गं तू.., गाण्यांच्या भेंड्या खेळतांना पण एवढी कशी तू टेन्शनमध्ये..., अगं मी असतांना का टेन्शन घेतेस.., एकसो एक गाणी पाठ आहेत आपली.., अगदी मोहम्मद, रफी, किशोर कुमार, लता दिदी ते आत्ताचा आपला अर्जित.., तू टेन्शन घेऊ नकोस.., तो तिला नॉर्मल करण्यासाठी हे बोलत होता..,

तशी आशू हलकेसे हसत म्हणाली.., नाही नाही टेन्शन नाही घेतेय.. ते उकडतंय ना खूप म्हणून...,

तो आता आणखीणच खट्याळ मश्करी करत म्हणाला, तुला एसी कारमध्ये गुदमरतं, टेरेसवर थंड हवेत पण उकडतं.., बापरे मला माझ्या पहिल्या पगारातच घरात एसी बसवावा लागतोय की काय..,

आशूला यावर थोडंसं हसू आलं.., तिचा हसरा चेहरा पाहून सिदपण हसला..,

दोघांचं काहीतरी खुसरपुसर चाललेलं पाहून दादा-वहिनी एकमेकांना खुणवत होते.., बाबांनीपण त्यांच्याकडे पाहिले आणि हसले..

तेवढ्यात संदिप मोठ्याने गाण गाऊ लागला, दो दिल, मिल रहे हैं...,

वहिनी पुढे म्हणाली.., मगर चुपकें चुपकें...,

तसे सिद-आशू थोडे एकमेकांपासून दूर झाले.., सगळेजण आता मोठ-मोठ्याने ते गाणं म्हणू लागले.., सिद लगेच तिथून उठला आणि दादा-वहिनीच्या टिममध्ये जाऊन त्यांच्या या गाण्यात मिसळला..,

आता सगळ्यांच्या नजरा आशूवर होत्या.., सिद तर तिच्या समोरच बसला होता.., आशू पूर्ण लाजेने लालबुंद झाली..,

अशाच यांच्या भेंड्या रात्री अकरापर्यंत झाल्या.., आईने सर्वांना दूध आणलं.., पण आईने सिदला दूध दिलेच नाही..,

तो आईवर हलकासा लटका चिडत बोलला, सरिताबाई.., मला कोण दूध देणार हों...,

आई त्याच्या डोक्यात टपली मारत म्हणाली, सिध्दार्थ राव, तुमची बायको आलीय ना आता.., ती देईल की..,

तसे सगळेजण परत मोठमोठ्याने हसू लागले...,

आशू लगेच बावचळत उठली.., आणू का लगेच..?”,

आता परत सगळेजण हसू लागले.., सिदला समजलं.., तो पण गालातल्या गालात हसला..,

वहिनी म्हणाली, अगं इथे कुठे सर्वांसमोर..?, ते तुम्ही..,

ती पुढे काही म्हणणार इतक्यात सिद म्हणाला.., पुरे.. पुरे.. कळलं.., चल आशू.. आपण खाली जाऊन घेऊया दुध..., तो तिला घेऊन खाली निघाला.., पण आशूला मात्रं काही कळालं नव्हतं..,

आशू जिन्यावरून खाली गेली.., तेवढ्यात वहिनी हळूच पळत येऊन सिदच्या कानात म्हणाली, देवरजी.., आज तुमची पहिली रात्रं आहे.. विसरू नका.., नाहीतर विसरताल.., ..,

तो तिच्याकडे पाहत एक भुँवयी उंचावत म्हणाला, भाभी जी.., ये कोई विसरनें की बात हुँई...?”,

वहिनी हसली.., तो पण हसतच खाली आला..,

आशू किचनमध्ये होती.., तिने सिदसाठी ग्लासात दूध भरले..,

सिदपण तिच्या मागोमाग किचनमध्ये आला.., आता सर्वजण टेरेसवर होते.., खाली फक्त ते दोघंच होते..,

सिदला खूप वाटत होते हिला घट्टं मिठी मारावी, तिला आपल्या जवळ घ्यावे.., पण त्याने तसे केले नाही.., त्याला आधी तिच्याशी बोलायचे होते..,

त्याने पाहिले तिने एक ग्लास दुध भरले होते..,

तो किचनमध्ये आला आणि म्हणाला, हे काय.., एकच ग्लास.., तू नाही पित का दूध..?”,

ती म्हणाली, नाही.., मला नाही आवडत दूध..,

हे असं नाही हां.., आता आम्ही सर्वांनी दूध घेतलं ना.., तुला पण प्यावं लागेल.., त्याने लगेच दुसरा एक ग्लास घेतला..,

अरे खरंच नको.., ती पुढे म्हणाली..,

गप गं.., अर्धं तू, अर्धं मी.., मला एकट्याला काही खायचं मन होत नाही.., धरं..,

त्याने अर्धा भरलेला ग्लास तिला दिला आणि अर्धा स्वतः घेतला..,

तो पुढे गाण गुणगुणत म्हणाला, थोडा सा तेरा भी होगा, थोडा मेरा भी होगा.. अपना ये आशियाँ....

चिअर्स..., त्याने ग्लास पुढे केले..,

आशू हलकीच हसली..,

दोघांनी एकमेकांकडे पाहतच दुध संपवले.., आणि दुध संपल्यावर सिदला वहिनीचे बोलणे आठवले.., त्याने डोक्यालाच हात लावला.., हे दूध बेडरूममध्ये प्यायचं होतं., आणि मी तर इथंच पिऊन टाकलं.., तो स्वत-वरच हसला..,

बेडरूमचा विचार त्याच्या डोक्यात येताच तो शहारला.., म्हणाला, चल.., सव्वा अकरा होत आले आहेत.., उद्या मलाही जॉबला जायचंय.., तुलाही कॉलेजला जायचं असेल ना..?”,

आशू लगेच म्हणाली, नाही.., असं काही नाहीये.., मी एक्सटर्नल करते कॉलेज.., सो..

अगं बरं ठिके.., सकाळी लवकर तर उठायचं असेल ना तुला..., चल मग.., तो चाचरत बोलला..,

ती पण पुढे म्हणाली, नाही असं पण काही नाहीये.., मी कितीही उशिरा झोपले ना, तरी लवकरच उठते..,

तो मनात म्हणाला.., चल ना मग बेडरूममध्ये जागत बसुया.., इथं काये...,

तो शांतपणे म्हणाला, चल मग गप्पा मारत बसूया..., तो बेडरूमकडे बोट दाखवत म्हणाला..,

तिला काही सुचेना.., ती चेहऱ्यावरचा घाम पुसत उभी राहिली होती..,

सिदला वाटत होते हिला उचलावे आणि आत घेऊन जावे.., किती तरसवतीये यार ही.., तो असे भाव चेहऱ्यावर आणून किचनमधली भांडी पाहत उभा होता..,

नंतर टेरेसवरून कुणीतरी खाली येत आहे असा आवाज आला.., आणि सिदने तिच्या हाताला पकडले आणि म्हणाला, चल चल.., आले सर्वजण खाली.., आता झोपुया.., साडे अकरा वाजले..,

ती दिर्घ श्वास घेत म्हणाली, हो दमलेय खूप आज.., झोपायलाच हवं.., असं म्हणत ती त्याच्यासोबत निघाली..,

सिदने जारोत दार उघडले आणि आशू आत येताच कडी लावून घेतली..,

आता आशूची धडधड तर वाढलीच होती पण सिदपण बिथरला होता.., तो धडपडतच बेडवर बसला..,

आशू उभीच होती..,

अगं बस ना.., तो चाचरतच बोलला..,

ती बसली..,

तो एका कडेला तर ती एका कडेला होती..,

दोघंही काहीवेळ उगाच बेडरूममधलं सामान वगैरे पाहत बसली.., आशूचे तर हात पाय थरथरायला लागले होते.., तिला वाटत होते आधी याला सांगावे खरे काय ते.., पण तिला त्या विषयावर बोलता पण येत नव्हते..,

सिद आता अचानक उठला आणि तिच्या शेजारी येऊन बसला.., आशू दचकली.., तिने टक्कं त्याच्याकडे पाहिले..,

ती त्यापासून लांब होऊ लागली..,

तो मात्र तिच्या जवळ यायचा प्रयत्नं करू लागला..,

त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि तिच्याकडे पाहून एक स्मित दिले.., ती मात्रं घाबरलेलीच होती..,

तो तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलू लागला.., किती सुंदर आहेस गं तू.., तुझे स्वच्छं बोलके डोळे., असं वाटतं त्या डोळ्यात नुसतं पाहातचं बसावं...,  तू जे मनात विचार करते ना.., ते सगळं मला तुझ्या डोळ्यांवरून समजतं.., त्याने तिच्या पूर्ण हालचालींवर एक नजर टाकली..,

तिचे पाय खाली लटलट उडत होते.., हात थरथरत होते.., ओढणीशी तिचे बोट खेळत होते..,

तो हलकासा हसत म्हणाला, आता पण तू फार घाबरली आहे.., आणि तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे.., राईट..?”, असं म्हणत तो हसत हसत तिच्या पासून थोडासा लांब झाला.,

आशूने उसासा सोडला.., ती पुन्हा ओढणीने चेहऱ्यावरचा घाम पुसू लागली.., सिद मात्र आणखीन नोंटंकी करत तिच्या चेहऱ्यावर तोंडाने हवा मारू लागला..,

आशू परत घाबरली..,

तिची हालत पाहून सिद उठला आणि जोरजोरात हसू लागला...,

तिला काही समजले नाही.., ती प्रश्नार्थक त्याच्याकडे पाहू लागली..,

त्याने जवळचा स्टूल घेतला आणि त्यावर बसला.., तिच्या अगदी समोर...,

तिची नजर अलगद खाली गेली...,

तो तिचे दोन्ही खांदे पकडत तिच्याकडे वळवत तिला म्हणाला..,., किती घाबरतेस गं.., तुला काय वाटतं..?, मी बाकीच्या नवऱ्यांसारखं तुझ्या मनाचा विचार न करता माझ्या मनाचा आधी विचार करेल...??”,

आशूने नजर वर केली..,

तो हसत म्हणाला, यार अजून तू माझं नावही धड घेत नाहीयेस.., आपली नाही धड मैत्री झालीय..., प्रेम झालंय ते ही मलाच.. तुझं तर काही माहितच नाही.., मग कसं गं आपण नवरा-बायको आहे हे समजायचं..,नवरा बायको म्हणजे फक्त एक नातं नसतं.., त्यामध्ये सगळी नाती मिक्सं असतात...,

तिने कपाळावर प्रश्नंचिन्हं पाडत त्याच्याकडे पाहिले..,

तो आता तिच्या थोडा जवळ आला.., आणि बोलू लागला..,

 हे बघ नवरा-बायको हे केवळ नवरा बायको नसतात.., ते सर्वप्रथम एकमेकांचे चांगले मित्रं मैत्रीण असावे लागतात, नवऱ्याला कधी-कधी बायकोच्या वडिलांची जागा घ्यायची असते तर कधी भावाची..., बायकोही नवऱ्याची कधी-कधी आई होत असते तर वेळ पडेल तेव्हा प्रेमाने, लाडाने समजावणारी बहिण...,ही सगळी नाती धरून नवरा-बायकोचं एक वेगळं नात असतं.., ते म्हणजे प्रेमाचं.., समर्पणाचं..., एकमेकांच्या सुख-दुखःत खंबीर उभं राहण्याचं..., रूसवे, फुगवे करत गरज पडेल तेव्हा हक्कानं दोन कानाखाली देण्याचं.., आणि पुन्हा मायेने जवळ घेण्याचं...,

आशू हे शांतपणे ऐकत होती.., नवरा कसा असतो.., नवरा या संकल्पनेची तिने काही वेगळीच व्याख्या आजपर्यंत केली होती.., पण सिदने मात्रं ती व्याख्या मोडून काढली होती..,

आशू आनंदी चेहऱ्याने त्याच्याकडे पाहू लागली..,

सिदने हसतच हात पुढे केला आणि म्हणाला, फ्रेंड्स..?”

आशूने हसतच त्याच्या हातात हात दिला..., काहीक्षण दोघं फक्तं एकमेकांकडे पाहत बसली..., सिदने हात सोडायचा प्रयत्नं केला तर आशूनेच त्याचा हात घट्टं पकडला होता.., सिदने पण मग तसाच तिच्या हातात हात ठेवला आणि दोघं काहीवेळ तसेच एकमेकांकडे पाहत बसले..,

काहीवेळाने आशूच भानावर आली आणि तिने तिचा हात त्याच्या हातातून सोडवला.., तिला अवघडल्यासारखे झाले..,

पण सिद मात्र हसत उठला., बेडवर मांडी घालून बसला आणि बोलू लागला.., चल.., आता रिलॅक्स बस.., आपण फ्रेंड आहोत आता.., आणि फ्रेंडसमोर काही लाजायचं वगैरे नाही..,

सिदच्या ह्या अशा वागण्याने आशू खरंच रिलॅक्सं झाली होती.., ती पण त्याच्यासमोर तोंड करून बसली..,

सो.., आपण लग्नाआधी बोलूच शकलो नाही.., बट डोन्ट वरी.., आजची पूर्णं रात्रं आपण गप्पा मारू.., एज अ नवरा बायको नाही.., तर एज अ फ्रेंड..,

आशूच्या चेहऱ्यावर एक वेगळेच चैतन्यं दिसत होते..,

पण आशू काहीच बोलत नव्हती.., फक्त सिदच मगापासून बोलत होता..,

सिद तिच्याकडे पाहत म्हणाला.., अगं मी एकटाच बोलतोय.. तू पण बोल ना..., का आता तू बोल म्हणून मला रिक्वेस्ट वगैरे करावी लागेल की काय..?”

आशू हसली..

बरं तसं असेल तरी चालेल.., आय कॅन डू दॅट..., तो कॉलर उडवत म्हणाला..

आशू हळूच म्हणाली, अस्सं...?”,

सिद लगेच मोठ्या जोमाने म्हणाला, हो खरंच..., बोल कशी करू तुला रिक्वेस्ट.., गानं बोलून, डान्स करून की आणखी काही...?”,

ती आधी मोठ्याने हसली.., मग म्हणाली, नाचताना पाहिलंय तुला.., ती हसतच होती..,

तो पण हसू लागला.., हमम्..., तू लग्नातला खेकडा नाही तरी बगळा डान्स पाहिला असशील.., तो हसतच म्हणाला..

आशूला ते आठवून फारच हसू आली.., ती आज मनमोकळेपणाने हसत होती.., सिद हसता हसता उगाच तिच्या या नवीन रूपाकडे पाहत होता.., त्याला स्वतःवर कंट्रोल होत नव्हते.., तो तिच्याकडे झोकला जात होता.., पण त्याला त्यांच्या प्रेमात काही कृत्रिमपणा नको होता.., त्याला सर्व नॅचरलच हवं होतं.., कारण नॅचरलच कायम टिकतं..., असं तो मानत.., म्हणून त्याने त्याचा पुरूषी अहंकार जरा बाजूला ठेवला.., आणि आपण नवरा-बायको आहे हे नातं विसरून आता आपण आपल्या मैत्रीणीसोबत बोलत आहोत.., असं मनात फिट्टं केलं..,

तू डान्सं पाहिलास.., आता म्हणजे गाणं गाऊ असं म्हणायचं का तुला..,?”

ती हसतच होती..,

तो उठला.. आणि तडक रूमच्या बाहेर गेला.. तिला काही समजलेच नाही..,

बाहेर सगळेजणं सोफ्यावर बसून गप्पा मारत बसले होते..,

त्याने डोक्यालाच हात लावला.., हळूच पुटपुटला.., अंताक्षरी लवकर संपली यांची..,

सगळ्यांनी त्याला पाहिले आणि त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले.., हा असा का आला असावा बाहेर असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते..,

तो म्हणाला, अरे बारा वाजत आलेत.., झोपा येतात की नाही तुम्हाला.., झोपा की आता... असं म्हणत तो हॉलमधल्या बेडखाली वाकला..,

का रे.. तुला काही डिस्टर्बं वगैरे होत आहे का...?” संदिप म्हणाला..

छे.. छे मला कसलं डिस्टर्बं.., उगाच तुम्हालाच डिस्टर्बं होईल.., असं म्हणत त्याने बेडखालून डोकं वर काढलं आणि त्याच्या हातातली गिटार पाहून सगळ्यांना आश्चर्यंच वाटलं..,

तो गिटार घेऊन हसत हसत बेडरूममध्ये गेला..,

या सगळ्यांनी डोक्यालाच हात लावला.., आई गालातल्या गालात हसत होती.., तर हे तिघं एकमेकांकडे पाहत बसले..,

आता सिद भावोजी आशूला गाणं वगैरे म्हणून दाखवत आहे वाटतं.., असं वहिनी म्हणाली आणि बाबा व संदिप मोठ्याने हसले.,

कठिण आहे या पोराचं.., असं म्हणत बाबांनी पण डोक्याला हात लावला..,

सिद रूममध्ये गिटार घेऊन आला.., आशूला पण जरा नवल वाटले..,

सिद स्टूलवर बसला आणि आशूकडे पाहत म्हणाला, बोलो मॅडम आपकी फर्माईश...,

आशू फक्त हसली..,

अगं हसतेस काय.. तू फर्माईश कर मी गातो..,

नको रे असं काही.., तुला जे आवडेल ते गा...,

तो म्हणाला, च्च्.., बरं.., गातो..,

ती कान देऊन ऐकू लागली..,

त्याने गिटारीच्या तारा छेडायला सुरूवात केली.., तसे बाहेरही सगळेजण कान देऊन ऐकू लागले..,

इतनी मोहब्बत करो ना
मैं डूब ना जाऊँ कहीं
वापस किनारे पे आना
मैं भूल ना जाऊँ कहीं
देखा जबसे चेहरा तेरा
मैं तो हफ़्तों से सोया नहीं

बोल दो ना ज़रा, दिल में जो है छिपा
मैं किसी से कहूँगा नहीं
बोल दो ना ज़रा, दिल में जो है छिपा
मैं किसी से कहूँगा नहीं
मैं किसी से कहूँगा नहीं

मुझे नींद आती नहीं है अकेले
ख़्वाबों में आया करो
नही चल सकूँगा तुम्हारे बिना मैं
मेरा तुम सहारा बनो
इक तुम्हें चाहने के अलावा
और कुछ हमसे होगा नहीं

बोल दो ना ज़रा, दिल में जो है छिपा
मैं किसी से कहूँगा नहीं
बोल दो ना ज़रा, दिल में जो है छिपा
मैं किसी से कहूँगा नहीं
मैं किसी से कहूँगा नहीं

हमारी कमी तुमको महसूस होगी
भीगा देंगी जब बारिशें
मैं भर कर के लाया हूँ आँखों में अपनी
अधूरी सी कुछ ख़्वाहिशें
रूह से चाहने वाले आशिक़
बातें जिस्मों की करते नहीं

बोल दो ना ज़रा, दिल में जो है छिपा
मैं किसी से कहूँगा नहीं
बोल दो ना ज़रा, दिल में जो है छिपा
मैं किसी से कहूँगा नहीं
मैं किसी से कहूँगा नहीं

गाणं बोलता बोलता सिद आणि आशू फारच जवळ आले.. त्या दोघांमध्ये आता फक्त काही बोटांचे अंतर होते...,

सिद गिटार बाजूला घेत, तिच्या जवळ येऊन बेडवर बसला.., आशूला काही समजलेच नाही..,

तो म्हणाला, तुला शिकायची का गिटार...,

आशू नाही नाही म्हणू लागली...,

पण सिद आता काही ऐकणार नव्हता.., तो तिच्या समोरून स्टूलवरून उठला आणि बेडवर येऊन बसला..,  त्याने तिच्या हातात गिटार दिली आणि तिच्या खांद्यावरून एक हात आणि कमरेतून एक हात टाकला..,

आशूच्या मनात धस्सं झालं.., तिला काही समजेना.., सिदने अलगद तिची बोट गिटारीच्या तारांवर ठेवली.., आणि तिच्या हाताला नाजूक स्पर्श करू लागला..,

आशूची धडधड वाढू लागली होती.., सिद तिला सूर छेडायला शिकवत होता.., आणि त्याचे ओठ तिच्या मानेवर टेकू पाहत होते...,

आशूच्या मनाची मात्रं घालमेल सुरू होती....,

बाहेर सगळेजणं झोपी गेले होते.., रात्रीचे एक वाजून गेले होते.., खिडकीतून बाहेर फक्तं चंद्राचा शुभ्र प्रकाश होता..., सिदला फक्तं तोच प्रकाश हवा -हवासा वाटत होता.., त्याने अलगद लाईटचे बटन ऑफ केले.., तशी आशू जोरात किंकाळली..,

तिच्या आवाजाने सिद दचकला...,  अगं काय झालं..?”, त्याने काळजीने विचारले..,

ती घाबरत म्हणाली.., लाईट गेली का...?”,

सिदला हसू आलं.., त्याने हळूच टेबलावरचा लॅम्प ऑन केला..,

तेव्हा कुठे आशूला बरे वाटले.., ती त्याच्यापासून दूर होऊ लागली.., पण सिदने परत त्याचा हात तिच्या कंबरेत टाकला आणि तिचा हात गिटारवर ठेवला...,

बाहेर सगळेजण आशूच्या आवाजाने उठले.., सर्वांना तिच्या अशा ओरडण्याने हसू येत होते...,

सिदने आता तिला आणखीन घट्टं पकडले.., आपसूक त्याचे ओठ तिच्या मानेवर टेकवले गेले.., लाईटच्या धीम्या उजेडातही आशूला फार भिती वाटत होती.., म्हणून तिलाही त्याच्या कुशीत फार उबदार वाटत होते.., पण सिद मात्रं आता आणखीन जवळ येऊ पाहत होता.., तो आता तिच्या हातावरून त्याचा हात फिरवू लागला..,

आशूच्या जीवाची घालमेल परत सुरू झाली.., ती त्याला म्हणत होती.., पुरे झालं., शिकले मी आता गिटार...,

तो हसत तिच्या कानात म्हणाला, आय लव्ह यू....,

आशूच्या पोटात गोळा आला हे ऐकून, अंगावर काटा आला..., तिला आता काही सुधरत नव्हते...,

सिदने तिच्या हाततली गिटार घेतली आणि बेडवर मागे टाकून दिली.., आणि तिला त्याच्या बाहुपाशात ओढून घेतले....,