पसंत आहे मुलगी भाग १०

Siddharth a chocolate boy and a cool boy, who is don't tense about their future and he don't have any dreams.. and he don't want to marry anywhere. but when he meets ashwini, his thoughts changes strangely.. Ashwini, his bride to be.. he loved he

भाग १०
आज सिद जरा फारच लवकर उठला, घरातले सर्वजण साखर झोपेत असतानांच त्याने अंघोळ वगैरे आटोपली आणि मागच्या अंगणातल्या झाडाखाली येऊन बसला… त्याला आज अख्खी रात्र धड झोप ही लागली नव्हती..,

तो तासभर तसाच पहाटे ची कोवळी थंडी अनुभवत बसला.. काहीवेळाने सगळीकडे उजाडले आणि घरातही सगळे जण उठाल्याची त्याला चाहूल लागली.. तसा तो तडक उठून आत निघाला आणि नेमकी समोरून येणाऱ्या आशू ची नी त्याची जोराची धडक झाली.. काही क्षण दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. सिदला तर देव दर्शनाला जाण्याआधीच देवाचा प्रसाद मिळाला असे वाटत होते.. काही क्षण तो आ वासून तिच्याकडे पाहत उभा राहिला..
आजू बाजूला कुणीच नाही, फक्त झाडावर पाखरांची चिव चिव चालू होती, दुरूनच कुठूनतरी देवळातल्या घंटांचा आवाज येत होता… शेजारी कुणीतरी सुगंधी उतबत्ती लावली होती…त्याचा सुवास चोहीकडे दरवळत होता आणि अशा वातावरणात सिडच्या समोर त्याची स्वप्नसुंदरी आशू होती…

कुणी तरी जोराने घंटी वाजवली आणि सिद भानावर आला..
“Sorry हा… ते आमचं घर फारच लहान आहे ना म्हणून या अशा धडका होतात… सो सॉरी..” तो चाचरत बोलला..
आशू पण चाचरतच बोलली, “इट्स ओके…” आणि तिने नळाला लावलेल्या बदलीतून मगाने पाणी घेऊन अंगणात सडा घालू लागली..
सिद तसाच भिंतीला टेकून उभा होता… त्याचे तोंड उतरले होते..
अशुला माहीत होते तो तिच्या मागेच आहे, ती आपली जीवावर आल्यासारखे पाणी शिंपडत होती…

पावसाच्या दिवसात काय मला पाणी शिंपडायचे सुचले, तो देवच जाणे… ती स्वतःवर च चिडत पाणी शिंपडत होती…

सिद इकडे उत्साहात होता.. त्याला एक आयडिया सुचली, त्याने मागचा दरवाजा बंद केला आणि मनातच म्हणाला, आता कुठं जाशील ग..

असं म्हणत तो तिच्या जवळ आला, ती बादलीत मग टाकणार एवढ्यात त्याने तिच्या हातातून मग घेतला, आणि बरोबर मग घेताना तिला चोरटा स्पर्श केला…

आशूने चटकन मग सोडला आणि आपला हात मागे घेतला….

त्याने मागत पाणी भरले आणि तिच्या हातात देत बोलला, “चल दोघं मिळून सडा घालूया…”

तिला काहीच समजत नव्हते… तिने त्याच्याकडे न पाहताच त्याच्या हातातून मग घेतला…

सिदचा परत चेहरा पडला… त्याने मनातच विचार केला, अशी जबरदस्ती करण्यात काही अर्थ नाही.. तिला ही आपल्या विषयी काहीतरी वाटले पाहिजे ना.. आपणच काय उगाच पुढे पुढे करतोय..

असा विचार करून तो निघाला, पण लगेच त्याच्या मनात दुसराच विचार आला, अरे ही तर बायको आहे आपली, लग्नाची… मग कसली आली जबरदस्ती… आणि नवीन आहे ती या घरात, त्यात माझ्यापेक्षा ७ वर्षांनी लहान… लाजत असेल ती… आणि नवी नवरी लाजली नसती तरी आपल्यालाच तिच्यावर शक आला असता… त्याने स्वतःच्याच डोक्यात मारले आणि परत तिच्या दिशेने निघाला… 

तिचे पाणी शिंपडून झाले होते ती आता आत चालली होती…
सिद तिला अडवत म्हणाला, “दोन दिवस झाले ना आपले लग्न होऊन”
तिला काही समजले नाही हा असा काय विचारतोय, ती त्याच्यापासून लांब झाली, आणि चाचरत म्हणाली “हो”

असं म्हणत ती दार उघडू लागली आणि त्याने तिला दारात पण अडवले आणि तिच्या फारच जवळ जात विचारले, “फक्त दोन दिवस झाले…?? मी तर त्या क्षणाची फार वाट पाहतोय… जेव्हा तुला आणि मला निवांत पणे बोलता येईल, एकमेकांचे विचार जाणून घेता येतील, एकमेकांमध्ये सामावून जाता येईल…”

सिद एका वेगळ्याच मूड मध्ये होता… तो हळू हळू तिच्या जवळ येत होता.. आणि नक्की तो काय बोलत आहे हे आशूला बरोबर समजले.. ती लगेच त्याच्या पासून लांब झाली…, 
“आईंने आवाज दिला वाटतं मला…” असं म्हणत ती दार उघडायचा प्रयत्न करू लागली…
सिदला आता जरा राग आला, त्याने एवढा वेळ त्याच्या भावनांवर फारच संयम ठेवला होता…, पण आता का जाणे त्याला सहन झाले नाही, त्याने चक्क तिचा हात घट्ट पकडला… आणि तिला जवळ खेचू लागला…

आशू फार घाबरली, तिच्या डोळ्यातून टचकन पाणी आले… आणि तिचा निरागस चेहरा पाहून सिद पागळला… त्याने तिचा हात सोडला…. तशी ती दार उघडून पळतच आत गेली…

“अगं रडायला झालं काय एवढं…???” त्याचे हे बोलणे न ऐकताच ती आत निघून गेली..
सिद स्वतःवरच रागवत बोलला, सिद तू जबरदस्ती नाही करू शकत तिच्या वर… चुकीचं वागला तू…. ती इतर मुलांसारखी नाहीये…. आधी बोलायचं बघायचं तर तू डायरेक्ट हात पकडला… 

***
सर्वांनी नाष्टा वगैरे केला, सिद सारखा आशू कडे पाहत होता, आणि आशू त्याची नजर चुकवत होती… सिद सकाळी जे वागला त्याचा त्यालाच पश्र्चाताप होत होता… 
काही वेळाने ठरल्या प्रमाणे सर्वजण देव दर्शनाला निघाले…
आई – बाबा आणि सिद – आशू हे चौघच जाणार होते.., वहिनी आणि दादा यांना वर्कलोड फार असल्याने त्यांना अर्जंट ऑफिसला जाव लागलं… 

आई बाबांनी एकच गाडी बुक केली होती, बाबा पुढे ड्रायव्हर जवळ बसले आणि आशू, आई आणि सिद मागच्या सीट वर बसले. 

आई मुद्दाम खिडकी जवळच्या सिट वर बसली… आणि आशू ला मध्ये बसायला सांगितलं… आणि दुसऱ्या बाजूने सिद बसला….

झालं आशुच्या मनात परत धाक-धुक सुरू झाली… सिदला हे लगेच समजले… पण त्याचा नाईलाज होता, तो बसला तिच्या शेजारीच….  सिद ची आई उगाच तिच्या हालचाली टिपत होती… जसे सिद तिच्या जवळ बसला तिला अस्वस्थ वाटायला लागले.. 

“आ आई… तुम्ही मध्ये बसता का…?? मला खूपच गुदमरल्यासारखे वाटतंय….” आशू म्हणाली.

तसंआईने आश्चर्याने पाहिले, “अगं बाई, तरणी ताठी पोर की ग तू… आसं कसं गुदमरला लागलं….?”

तसं बाबांनी पण काळजीने मागे पहिले, “ काय झालं?”

“काही नाही हो…” असं म्हणत सिद ची आई आशुला म्हणाली, “अग आशू मला पण मध्ये गुदमरत… सिद्धू तू बस बर मध्ये….”
आई हे मुद्दाम करत आहे हे सिदला समजले, “आई… गुपचुप बस तू मध्ये…” तो जरा चिडक्या स्वरात बोलला…

आशूला आपण काय वागतोय ते काहीच समजत नव्हते, 
आई काही जागची उठली नाही, “मी नाही बाबा मध्ये बसणार, हे असं नवीन नवरा नवरीच्या मध्ये बसलं की पाप लागेल की मला…” आई मशकरी करत म्हणाली…

सिद ताडकन उठला आणि बाहेर आला, तशी आशू पण बाहेर आली.
नंतर सिद मध्ये जाऊन बसला.. आशू खिडकीत बसली… शेवटी व्हायचं तेच झालं फक्त मार्ग बदलला….

पण एवढी साधी गोष्ट तिला कळलीच नाही…

अंकुश मनात बोलत होता, आपले नौटंकी मित्र तर वेगळी गाडी करा म्हणत होते…. तेव्हा तर काय हालत झाली असती हीची…. तो नकळत तिच्या कडे पाहून गालातल्या गालात हसला…

आई पण हे पाहून सुखावली, खरे तर आज च्या काळात एवढा साजुकपणा कोणत्या मुलींमध्ये नसतोच मुळी…. लग्नाच्या आधीच नवऱ्याच्या हातात हात घालून फिरतात आजच्या मुली… पण इथे मात्र यांना जवळ बसलं तरी गुदमरतंय..
असं मनात बोलून आई हसत होती…

एक तासाचा प्रवास करून नवीन नवरा – नवरी जेजुरीला पोहचले…, प्रवासा मध्ये सगळेच जण आशूसोबत बोलायचा प्रयत्न करत होते… पण ती फक्त आई बाबांशी बोलत होती.. सिद कडे वळून ही पाहत नव्हती… सिदला खूप वाटत होते की मुद्दाम हिला धक्का द्यावा, तिला चोरून स्पर्श करावा…. पण नाही, ते त्याला जमत नव्हते…, सकाळ चा प्रकार आठवून तो शांत होता…
पण लवकरात लवकर हिच्याशी आपण मन मोकळे बोलले पाहिजे, नक्कीच हीची काही तरी अडचण आहे आणि म्हणून च अशी वागत आहे ही…., तो मनाशीच विचार करत होता….

दुपार पर्यंत त्या दोघांनी जोडीने देव दर्शन घेतले,  जेजुरी गडावर एकमेकांसोबत फोटो काढले, पण जरा अंतर राखूनच…
बाबा हसत हसत बोलले, “अरे सिध्या, हात ठेव हात, खांद्यावर….” हळूच त्यांनी त्याला डोळा मारला…

सिद नुसता हसला आणि त्याने हातानेच ईशरा करत मनातच बोलला, मॅडम माझ्या सोबत फोटो काढत आहेत हेच खूप आहे..

बाबा मात्र ओरडून सांगत होते, “अरे एवढे दूर का उभे आहात तुम्ही… एवढं मधलं अंतर कुणासाठी आहे..??”

तशी आई त्यांना थांबवत म्हणाली, “हे अंतर आता त्या दोघांना हळू हळू कापायचं आहे… असं अचानक कापलं जाणार नाही ते…, दोघांना मिळून ते अंतर दूर करायचं आहे…. आणि मला तर बाई पूर्ण विश्वास आहे, माझी ही धाकटी सून आणि माझा लाडका मुलगा अगदी राजा राणी सारखा संसार करणार… पहाच तुम्ही…”
“म्हणजे आपल्या सारखा का??” बाबांनी आईला खट्याळ मश्करी करत विचारले…
“गप्प बसा हो तुम्ही….” आई चक्क लाजल्या…
“आता गप बसा काय गप… आपले अल्बम काढून बघ आपले लग्नाचे फोटो, त्यानंतर ते आपण कुलू मानली ला फिरायला गेलेलो ते फोटो… अगं मध्ये तीन फुटाच अंतर ठेवूनच उभी असायची तू….” बाबा मोठमोठ्याने हसत म्हणाले…
“हो ना… आणि आता तर ते अंतर वाढतच जाणार बघा….”
बाबा हसत म्हणाले, “मग… आधी संदीप, मग आपला सिद्धू, आता दोघांच्या बायका… आणि काहीच दिवसांतच त्यांची लहानशी चिल्ली पिल्ली पण येतील… म्हणून नवीन नवरा बायकोनी ना…, आधीच काय ते मौज मस्त्ती करून घ्यावी नंतर काय संसारामध्ये आपण एवढे बुडून जातो की विचारू च नको”
“ ते पण आहे हो, पण लवकरात लवकर आपलं घर सुखाने भरलं पाहिजे … म्हणजे आपण डोळे मिठायला मोकळे…”
तसे बाबांनी आईकडे रागाने पाहत म्हटले, “वेडी का ग तू… अग् अजून तरी आपल्या सिद चा संसार सुरू झालाय… मरायचा विचार इतक्यात नाही हो करायचा… मला तर माझ्या नातवांची पण लग्न लावायचीत… ते ही तुझ्या सोबतीने, लवकर मरायचा विचार कशाला करायचा….??”
तशी आई पण हसली आणि दोघे जण त्यांच्या समोर जोडीने फोटो काढणाऱ्या सिद – आशू कडे पाहू लागले…

फोटो काढणारा वेगवेगळ्या पोझ देऊन त्यांना जवळ आणायचा प्रयत्न करत होता, सिद त्यात चान्स मारायला बघत होता, आणि लाजरी बुजरी आशू तितकीच शरीराने त्याच्या पासून लांब जात होती आणि मनाने मात्र जवळ येत होती….


क्रमशः


Bhartie “शमिका”

🎭 Series Post

View all