Nov 30, 2020
कथामालिका

पसंत आहे मुलगी भाग १५

Read Later
पसंत आहे मुलगी भाग १५

भाग १५

 

घरातले केव्हाच झोपी गेले होते.., सिद रागारागात घरातून बाहेर निघून गेला., बाहेर अंगणात बसून तो त्याच्या डोळ्यात साठलेल्या अश्रूंना वाट देऊ लागला...,

आशूपण आत रूममध्ये बेडवर पडून रडत होती.., सिदने एका अर्थाने तिच्यावर संशय घेतला याचे तिला वाईट वाटत होते.., खूप वेळ ती घडलेलं सगळं आठवून रडत होती...,

आई म्हणते सिध्दार्थ तुला समजून घेईल, त्याला तू सगळं खरं सांगितलं तर त्याला काही फरक पडणार नाही...,

आशूला स्वतःचीच दया वाटत होती.., तिला तिचेच बरोबर आहे असे वाटत होते आणि सिदबद्दल तिच्या मनात द्वेष निर्माण झाला होता.., शेवटी इतर मुलांसारखा तोही टिपिकलच निघाला असं स्वतःशी म्हणत ती आसवं गाळत बसली होती..,    

दोघंही कितीतरी तास असेच तळमळत बसले होते.., सिदच्या मनातही तिच्या आजच्या वागण्याने अविश्वास निर्माण झाला होता.., त्याला वाटत होते आता आत जावं आणि तिला याचा जाब विचारावा की तू का अशी वागत आहेस, काही लपवतीयेस का..., पण सिदला अजून तिच्याकडून स्वतःचीच लायकी काढून घ्यायची नव्हती.., आज त्याचा स्वाभिमान खूप दुखावला होता...,

आतमध्ये आशूला कधीच झोप लागून गेली..., सिद मात्रं बाहेर अंगणातल्या ओट्यावर विचारच करत बसला होता.., याआधी कधीही कोणतेही टेन्शन आले की तो असा एकटा कधीच बसत नसे, त्याच्यासोबत त्याचे मित्र असत.., ते त्याला धीर देत आणि मग त्यांच्यासोबत बारमध्ये वगैरे जाऊन थोडीफार तरी ड्रिंक घ्यायचा..., पण आज का जाणे त्याला हे सगळे चुकीचे वाटत होते.., त्याचा पाय तिथून हलत नव्हता..,

 

रात्री दिड वाजता आशूला अचानक जाग आली.., तिने इकडे तिकडे पाहिले.., सिद बेडवर नव्हता.., ती अस्वस्थ झाली., तिने केसांमधून हात फिरवला.., तिच्या डोळ्यावरची झोप केव्हाच निघून गेली.., तिचा चेहरा रडून रडून सुजला होता.., तिने तिच्या तोंडावरून हात फिरवला आणि थोडावेळ तशीच डोक भिंतीला टेकवून बसली...,

थोडावेळ विचार करून ती रूममधून बाहेर आली..., बाहेर हॉलमध्ये आई-बाबा झोपले होते.., अर्थात दादा-वहिनी टेरेसवर असणार..., मग सिद्धार्थ गेला कुठे..., तिच्या मनात प्रश्न आला...,

ती दरवाजा उघडून बाहेर आली.., तर सिद बाहेरच्या ओट्यावर पुस्तक वाचत बसला होता...,

तो एकचित्ताने पुस्तक वाचत बसलेला, त्यात तो चक्क हरवून गेला होता.., आशू आपल्या समोर येऊन उभी आहे हे ही त्याला कळले नाही.., आशूच्या डोळ्यातलं पाणी टचकन खाली पडलं...,

किती वेगळा मुलगा आहे हा.., याच्या जागी इतर कुणी असलं असतं तर..., ती विचार करू लागली..., त्याने तर मला, मी कुठे गेलेले, का गेलेले अशा प्रश्नांनी त्रास दिला असता..., माझ्यावर नको नको संशय घेतले असते.., मी त्याची लायकी काढली, त्याला नको नको ते बोलले..., इतर कुणी असता तर माझ्यावर हात उचलण्याचाही प्रयत्न केला असता.., पण हा तर..., हा तर जगावेगळा आहे..., रात्रभर बाहेर बसून पुस्तक वाचत बसलाय..., किती निरागसपणे...,

ती खूपवेळ तशीच त्याचे हाव-भाव, त्याची एकाग्रता टिपत दारापाशी उभी राहिली.., बाहेर थंड हवा सुटली होती.., आणि त्या हवेतच ती पूर्ण शांत झाली होती.., काहीवेळापूर्वी आलेला राग कुठेच पळून गेला होता...,

ती हळूच येऊन सिदच्या शेजारी बसली..., सिदचे अचानक तिच्याकडे पाहिले.., सुरुवातीला तो चाचरला.., पुस्तक बाजूला ठेवत तो जरा सरकून बसला..,

ती त्याच्याकडे न बघता खाली नजर घालूनच बोलली.., “सिध्दार्थ.., आय एम सॉरी...”,

हे ऐकून सिद जरा आवाक झाला.., तो कंचितसा हसत म्हणाला, “का...?”,

तिने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, “मी मगाशी खूपच बोलले..., आय एम सॉरी...”,

“इट्स ओके..., आता जे खरं आहे तेच तर बोलली...,” तो हसत म्हणाला...,

तिने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले...,

तो शांत होत म्हणाला, “तू कुठेही जा, कधीही जा.., फक्त सांगून जात जा.., आणि सांगून नाही गेली तरी एटलिस्ट फोन तरी उचलत जा.., काळजी वाटते गं खूप.., तुझी जबाबदारी माझ्यावर आहे म्हणून नाही.., तर मला सारखी अशी भिती वाटते.., की तू मला कुठेतरी सोडून जातीये...,कधी कधी असं वाटतं की तुला मी आवडलो नाहीये.., म्हणून मला सोडून तर जाणार नाही ना, तू कुठे पळून तर गेली नाहीये ना.., तुला काही बरं-वाईट तर करू वाटत नाहीये ना..., मला काहीच माहित नाही तुझ्या मनात नक्की काय चाललंय..., पण मला हे वाटतं.., मला या गोष्टीची भिती वाटते..खूप भिती वाटते..., जेव्हापासून तुला पाहिलंय ना.. तेव्हापासून का कुणास ठाऊक मला हिच भिती वाटत आहे की तुला मी आवडलो नाहीये.., तु मला..”, एवढं बोलेपर्यंत त्याने एक हुंदका दिला..,

आशूलाही आत्ता रडू आलं... ती त्याच्या हातावर हात ठेवून बोलली.., “असं काहीही नाहीये सिध्दार्थ.., प्लीज.., तू चुकीच समजतोय...”,

ती तशीच त्याच्या हातावर हात ठेवून रडू लागली...,

सिदने एकदा त्या हाताच्या दिशेने पाहिले..., तो पण आता स्वतःच्या भावना आवरू शकत नव्हता..., तो पुढे म्हणाला, “मग आपल्या आयुश्यात का काही नॉर्मल होत नाहीये..?, सगळं वेगळंच का घडतंय..., तू का माझ्याशी मनमोकळेपणाने बोलत नाहीस..?”,

ती त्याच्याशी बोलण्यासाठी त्याच्याकडे वळली.., तसं त्याने तिच्या डोळ्यात पाहिले..., तो असा पाहत असल्याने तिच्या तोंडून काही शब्द फुटले नाही...,

तो तिच्या डोळ्यातच बघत तिच्या अत्यंत जवळ आला..., तिचा हात हातात घेत तो म्हणाला, “मला कधीच दूर करू नकोस..., तुझ्या बरोबरीने बसण्या उठण्याची माझी लायकी...”,

तो पुढे काही बोलणार इतक्यात तिने त्याला घट्ट मिठी मारली..., तो पण त्याचे हात तिच्या कंबरेजवळ घट्ट करू लागला..,

दोघे काही वेळ एका वेगळ्याच विश्वात गेले होते.., दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.., वर नेहमीप्रमाणे चंद्राचा शुभ्र प्रकाश पडला होता.., संथ हवा चालू होती.., आणि दोन जीव एकमेकांमध्ये विलीन होण्यासाठी तडफडत होते...,

सिदने आता पुढाकार घेतला..., त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले.., आशू थोडी कावरीबावरी झाली.., पण नेहमीप्रमाणे तिला त्याच्या कुशीत एक वेगळीच उब मिळाली..., सिद अधीर होऊन तिच्या ओठांचे रसग्रहण करू लागला..., आणि आशूपण नातक्रार या धुंदीत मिसळून गेली...,

थोड्यावेळाने आशूनेच सिदला दूर सारले.., सिदने अस्वस्थपणे इकडे तिकडे पाहिले..., आपण बाहेर आहोत हे त्याच्या लक्षात आले..., तशी आशू उठली आणि दाराच्या दिशेने जाऊ लागली...,

सिद आता फारच अधीर झाला होता..., तो तसाच येऊन तिला पाठीमागून तिच्या कंबरेला विळखा घालत बोलला, “तुला म्हटलं ना मला सोडून जाऊ नकोस..., तू तर...”,

ती त्याचे हात तिच्या कंबरेपासून सोडत म्हणाली, “रात्रं खूप झाली आहे..., घरात चल...”,

असं म्हणून ती रूममध्ये आली...,

आत येऊन तिचे ह्रद्य धडधडू लागलं होतं..., नेहमीप्रमाणे तिला घाम फुटला होता, हात-पाय थरथरत होते..,

काही सेकंदातच सिदपण रूममध्ये आला..., तो येताच आशूने पटकन झोपायची तयारी केली..., सिद मात्रं वेगळ्याच धुंदीत होता.., ती तशीच ब्लॅंकेट अंगावर घेऊन झोपी गेली...,

सिद स्वतःशीच हसला, या मुली अशा का असतात बरं.., आधी असं अधीर करून सोडतात..., आणि मग जवळ जायचं म्हटलं की झोपायची नाटकं..., तो हसतच बेडवर आला...,

त्याने तिला मागून जोरात मिठी मारली...,

“आशू..., मला आज झोप येणार नाही...”,

आशूचे इकडे रक्तं सळसळ वाहू लागले होते.., तिच्या ह्रदयाची धडधड वाढलेली होती..

ती त्याला दूर सारत म्हणाली, “प्लीज सिध्दार्थ मला झोप आलीय..., प्लीज....”,

सिदने काही ऐकले नाही.., तो तिच्या अंगाशी खेळू लागला..., तिचे केस मागे सारून तिच्या मानेजवळ ओठ आणत म्हणाला,.., “माझी झोप मोड करून तुला कशी गं झोप येते...?”,

ती चेहरा वळवत म्हणाली, “प्लीज सिद्धार्थ.., झोपू दे....”,

तो तिच्या अंगावर रेलत म्हणाला.., “प्लीज आज तरी मला दूर सारू नकोस..., प्लीज...”,

ती उठून म्हणाली, “सिध्दार्थ मी तुला कालच सांगितलं....”,

तो थोडा तिच्याजवळ येत म्हणाला, “असं होयं..., बरं.., एटलीस्ट तुझा सुंदर चेहरा तरी बघू दे मला..., तुझे हे काळेभोर डोळे, गुलाबी ओठ..., आणखी कशाप्रकारे तुझ्या सौंदर्याचे वर्णन करू मी...? देवाने काय सुंदर बायको दिलीय मला..., तिचा चेहरा बघूनच माझा मूड फ्रेश होतो.., खरंच..., तो पूर्ण समाधानाने हे बोलत होता.

तसे आशूने एकटक त्याच्याकडे पाहत विचारले, “मी सुंदर आहे....???”,

सिध्दार्थ अवाक होऊन म्हणाला, “आता हे काय विचारणं झालं का...? आख्ख्या जगात जर कोण सुंदर असेल ना.., तर ती माझी बायको आहे....., माझे मित्रं तर मला सारखे चिडवायचे.., मला काही चांगली मुलगी भेटणार नाही, माझं शिक्षण कमी त्यात माझा हा असा स्वभाव..,, मी आजपर्यंत एकाही मुलीला भाव दिला नाही..., कारण ज्या मुली मागे लागायच्या ना त्या माझ्या टाईपच्याच नसायच्या..., एकीचा रंगच काळा, एकीची हाईटच माझ्यापेक्षा जास्त, एकीमध्ये मरणाचा एटीट्युड भरलेला, एकीचं नाकच बसकं, तर एकीचा दातच फावडे.., आता हे असं असलं तरी मी जो चेहरा शोधत होतो ना.., तो मला या मुलींमध्ये कधीच दिसला नाही..., मला त्यांच्या डोळ्यात भलतंच काही दिसायचं..., पण जेव्हा तुला पाहिलं ना.., तुझ्या डोळ्यात मला फक्त माझाच चेहरा दिसत होता.., मी तर माझं भाग्य समजतो, की मी खूप भाग्यवान समजतो की मला एवढी सुंदर बायको भेटली आहे.., मी तुला आधीही सांगितलेलं आणि आजही सांगतो.., मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.., मला तुझ्यासारखी सुंदर तितकीच हुशार आणि विशेष म्हणजे साफ मनाची बायको भेटेल ते..” तो हसत म्हणाला..

 

“तू सुंदरता लोकांच्या दिसण्यावरून ठरवतो...??”,

 

सिद हसला.., त्याला काही कळलं नाही.., तो पुढे म्हणाला, “एक मिनिट आशू तू फक्तं चेहऱ्याने सुंदर नाहीस.., मनानेही तू तितकीच सुंदर आहेस..., जे मनात येईल ते स्पष्ट, सरळ बोलणारी.., जसं मगाशी बोललीस.., जाम आवडलं मला ते.., मला माझ्या आयुष्यात असेच लोक आवडतात जे मला हक्काने शिव्या देतात, नको ते बोलतात आणि वेळ मिळेल तेव्हा मारतातही..., असेच माझे मित्रं आहेत, माझे आई-बाबा, दादा वहिनी..आणि आता तूही..., या सर्वांनी मला एकदा ना एकदा तरी माझी लायकी दाखवलीच आहे..., मला काही वाटत नाही.., मिन्स आत्तापर्यंत वाटलं नाही.., मी कधीच एवढा विचार केला नाही या गोष्टीचा.., बट आज तू बोललीस आणि मला खरोखरच माझी लायकी समजली..”, सिद तोंड पाडत म्हणाला..,

तो जरा शांत झाला..,

आशू शांतपणेच बोलली, “विषय भरकटत चाललाय.., जाऊदे.., झोप तू...,”

सिद हसत म्हणाला, “झोप लागणारच नाही...”,

“जागा रहा मग....”, आशू हे जरा रागात बोलली...,

सिदला काही समजले नाही..., तो तिला म्हणाला.., “एक मिनिट तू रागवली आहेस का..??”,

ती त्याचा हात झिडकारत म्हणाली, “नाही..”,

“मग..”, तो लाडीगोडीत करत म्हणाला..,

“तुझी सौंदर्याची व्याख्या ऐकून जरा भरून आलं मला..”, ती रागातच हे म्हणाली..,

“म्हणजे...?”, तो म्हणाला..,

“मी सुंदर आहे म्हणून माझ्याशी लग्न केलं ना..,?” तिने चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह पाडत विचारले..,

तो काही क्षण गोंधळला ही असं का विचारतेय...,

“मी सुंदर आहे, माझे डोळे सुंदर, नाक सुंदर, ओठ सुंदर..., म्हणून लग्नं केलं ना.., ज्या मुली तुझ्या मागे लागल्या त्या काळ्या, बसक्या, जाड्या म्हणून त्यांना नाकारलं...?”,

सिद हसत मनात म्हणाला, मुली मागे लागल्या हे ऐकून राग आलाय काय मॅडमला...

तो तिच्या जवळ जात म्हणाला, “तसं नाही गं.., तुला बघताच मला जे झालं ना, मनात जे वाटून गेलं ते त्यांना बघून नाही वाटलं..”,

“कारण त्या सुंदर नव्हत्या...”

सिदला आता काही कळेना...., नक्की ही कुणाच्या बाजूने बोलतीये....

तो पुढे म्हणाला, “मला माहित नाही का पण मला तू सोडून कुणाबाबतीतच आजपर्यंत स्पेशल असं वाटलंच नाही.., तुझ्याकडे बघून मला मैत्रीण हवी तर अशी, जीवनसाथी हवी तर अशीच हवी.., असंच वाटलं..., त्या मुलींबद्दल कधीच असं वाटलं नाही..., आणि इथून पुढंही तू सोडून कधीच कुणाबद्दलच असं वाटणार नाही मला..., तसं मी आजपर्यंत कुणाशी चिटिंग नाही केलीय.., नाही आवडत तर नाही आवडत.. मी कोणत्याच मुलीला खोट्या प्रेमाचं आमीष कधीच दाखवलं नाहीये..,  आवडते ती फक्त तूच मला..., फक्त तूच...”

“मी आवडते तुला..?”, आशूने प्रश्न केला...,

सिद आता फारच हसत म्हणाला, “खूप..., खूप आवडतेस तू मला...”,

“तुला मी सुंदर वाटते..,  फक्त शरीरानेच नाही तर मनानेही...?”, आशूने त्याला प्रश्न केला.

तो म्हणाला, “अर्थात...!”,

“जर उद्या माझ्या ह्या सौंदर्याला काही झालं.., माझ्या आयुष्यात मोठा असा आघात झाला आणि माझे हे सौंदर्य कायमचे संपले..., आणि मी कुरूप झाले तर...???”,

“काही पण काय बोलतेस..., असं का काही होईल..?, वाईट विचार का करतीयेस...?, कधीही पॉजिटिव्ह विचार करायचा..., का कुरुपतेच्या गोष्टी करतीये...?”, असं म्हणत तो तिला बिलगला...,

आता तर ती रडत म्हणाली, “खरंच तुला नाही फरक पडणार ना जर मी कुरूप झाले तर...”,

सिद तिला आणखीन घट्ट पकडत म्हणाला, “प्रेम हे मनावर होतं आशू.., शरीरावर, शरीराच्या सुंदरतेवर नाही.., तुला कधी काही होईल आणि माझं तुझ्यावरचं प्रेम संपेल असं तू कधीच समजू नकोस.., प्लीज...”

 

या एका वाक्याने ती त्याच्या गळ्यात पडली..., रडू लागली...,

“अगं.., काय झालं...?” तो तिच्या पाठीवर हात ठेवत म्हणाला...,

ती त्याला घट्ट पकडत म्हणाली.., “आय लव्ह यू...”,

आता आशूच्या तोंडून हे ऐकून सिद मनातून सुखावला...,

आशू त्याच्या मिठीतून बाहेर पडली आणि तिचे ओठ त्याच्या ओठांसाठी आसुसले.., त्याच्या स्पर्शासाठी तिचे अंग शहारले...,

तिच्या अशा अचानक वागण्याने सिद आधी गोंधळला.., पण शेवटी तोही याच क्षणाची वाट पाहत होता..,

सिदने पण तिला जोरात आपल्या बाहुपाशात ओढून घेतले..., तोही आता प्रणयसुखासाठी तडफडू लागला..., हळूहळू त्यांच्यामधले अंतर कमी होत होते.., दोघेही एका वेगळ्याच विश्वात पोहचले होते..,

सिदचा हात आशूच्या सर्वांगावर फिरू लागला..., त्याच्या स्पर्शाने आशूचे पूर्ण अंग शहारले.., ती आज एका नवा अनुभव घेत होती.., आणि सिदवरचे तिचे प्रेम आज द्विगुणित होणार होते...,

एक एक करून वस्त्रांची बंधने गळून पडू लागली.., आणि इतक्यात.., तिच्या कानात सिदची किंकाळी ऐकू आली..., त्याच्या त्या आवाजाने तिच्या अंगावर काटाच आला, तिने कसेबसे तिचे कपडे स्वतःच्या विवस्त्रं अंगावर पांघरले आणि उठून सिदकडे पाहिले.., तर तो तिच्याकडे पाठ करून अस्वस्थपणे उभा होता....,त्याचे दोन्ही हात त्याच्या डोळ्यांवर होते..,

 

क्रमशः

 

मी या आधीचा भाग २ ऑक्टोबरला पोस्ट केला होता.., आणि आज ११ तारीख आहे.., खरोखरोच खूपच उशीराने मी हा भाग टाकला आहे.., तुमच्या जागी मी असते तर मलाही असेच वाटले असते, माझीही वाचनाची लींक तूटून गेली असती..,

मी सर्वप्रथम सर्वच वाचकांची माफी मागते.., कथेमध्ये जेवढा लेखक गुंतत नाही तेवढे वाचक गुंतलेले असतात ते मला ईरावर कथा पोस्ट केल्यावर समजले.., आणि तुम्हाला असे जास्तवेळ नवीन भागासाठी वाट पाहायला लावणे खरंच मलाही आवडत नाहीये..,

पण कसंय ना, कथा लेखक आपल्या आंतरिक सुखासाठी लिहीतात, त्यातून लेखकांना स्वतःचे असे विश्व वाचकांसमोर खुल्लं करता येत.., कथा लिहीणं म्हणजे एका काल्पनिक विश्वात फिरणंच.., आणि काल्पनिक विश्वात फिरण्यासाठी निवांत वेळ लागतो, तसा मूडही लागतो.,

दिवसभर ऑनलाईन लेक्चर आणि ऑफीसचं काम.. यातून निवांत असा वेळ मिळत नाही आणि मिळालाच तर कथा लिहिण्यासाठी उसणा उत्साह आणावा लागतो.. आणि मग दोन-तीन तास घालवल्यानंतर कुठेतरी आपल्याला हवा तसा भाग लिहून होतो..,

रोज मी भाग लिहून ठेवते आणि तो पोस्ट करताना कुठेतरी काहीतरी राहिलं आहे असं वाटू लागतं.., डोक्यात विचार तर खूप येतात पण ते विचार शब्दात मांडायलाच भरपूर वेळ लागतो.., आणि त्यामुळे भाग टाकायला उशीर होतो...,

मला आशा आहे की तुम्ही मला समजून घ्याल आणि आजचा हा तोडका मोडका लिहिलेला भाग कसा वाटला ते सांगाल...,

आणखी एक तुमचे मत घ्यायचे होते- मी लवकर भाग टाकेल पण ते लहान असेल तर चालेल का.., किंवा मग पाच – सहा दिवसांनी एकच मोठा भाग टाकलेला आवडेल???..,

 

©Bhartie “शमिका