Jan 22, 2021
स्पर्धा

पसंत आहे मुलगी भाग ३

Read Later
पसंत आहे मुलगी भाग ३

भाग 3

 

तर ह्या दोन भागांमधून आपल्याला समजले असेल की अश्विनी आणि सिध्दार्थ हे आपल्या कथेतील नायक- नायिका आहेत.. ज्यांच्या लग्नाचा विषय सध्या चालू आहे..,मात्र आशू आणि सिद यांच्यामध्ये जमिन आसमानाचा फरक आहे.. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमीही वेगवेगळी आहे..

सिध्दार्थ एका साध्या सरळ घरातला सर्वात धाकटा मुलगा.. सर्वांचा लाडका, घरातलं शेंडफळ.. वयाच्या सत्तावीसाव्या वर्षीही आईच्या पदराला तोंड पुसणारा, बाबांच्या पाकीटातून हळूच पैसे काढून घेणारा.. आणि दादा वहिनींच्या रूममध्ये अचानक घूसून वर सॉरी सॉरी बोलणारा.. असा हा खट्याळ, मस्तीखोर, कॉलेजचा चॉकलेट बॉय.. पण तितकाच सिन्सिअर. समजूतदार, अभ्यासात कमी हुशार असला तरी नाटक, एकांकिका लिहणारा एक नवोदित लेखक..  कॉलेजमधल्या भरपूर मुली ज्याच्या मागे लागत आणि तो त्यांना त्याच्या भाषेत समजावत.., आणि त्याच मुलींशी नंतर घट्ट मैत्री करणारा असा मनमोकळे स्वभावाचा हा सिद.. इतक्या मुली मागे असूनही कधीच कोणत्या मुलीशी गैरवर्तन केले नाही, किंवा त्यांचा फायदा घेतला नाही.. एरवी मुलींच्या गळ्यात गळे घालून त्यांना जान, डार्लिंग म्हणत फिरणारा हा सिद आशूला पाहताक्षणी आपली शुध्द हरपून बसला होता..

ज्याला शांत, निर्मळ मनाची आशू फार आवडली होती.. आणि त्याला आता काहीही करून तिच्याशीच लग्न करायचे होते.. त्यासाठी तो जरा जबाबदार व्यक्ती होण्याचा प्रयत्न करत होता..

अगदी शांत, सोज्वळ स्वभावाची, थोरा-मोठ्यांचा मान राखणारी, कधी कुणाला उलट न बोलणारी, प्रेमळ.., साधी सरळ अशी ही आश्विनी.. म्हणजेच आपल्या कथेची नायिका आशू...  आपल्या बाबांच्या आणि मोठ्या भावाच्या धाकात असलेली.. नुकतीच एकविसाव्या वर्षात पदार्पण केलेली नाजूक पण तेवढीच धीट अशी ही आशू.. जिला वयाच्या सोळाव्या वर्षीपासूनच स्थळ यायला सुरूवात झाली होती.., आजपर्यंत जवळजवळ वीस -तीस जणं तिला पाहून गेले होते.. पण तरीही तिचं लग्न ठरलं नव्हतं.. आशूचे बाबा एका राजकीय पक्षात कार्यकर्ते होते.. बाप जन्मात त्यांनी कधी कष्ट केलं नव्हतं.. फक्त हेरा फेरी करूनच मोठं ऐश्वर्य निर्माण केलं होतं.. एक मोठा बंगला, मोठी गाडी, अंगावर दोन तीन तोळ्यांचं सोनं, हातात पन्नास साठ हजारांचा फोन... तोंडात पान नाही तर गुठखा आणि चेहऱ्यावर माज- आपण एका राजकीय पक्षाचे संतरजी उचलणारे कार्यकर्ते असल्याचा...

पण सुदैवाने त्यांना पत्नी अगदी सुरेख मिळाली होती.. नेहमी दातांमध्ये धरलेला पदर आणि खाली नजर.. आणि घरातल्या दोन्ही मुली अश्विनी आणि सुषमा ही तिच्याच वळणावर गेल्या होत्या.. सुषमा ही वयाने चोवीस वर्षांची होती.., तिच्या लग्नाला आता पाच वर्षे होत आले होते.. आशुला मोठा भाऊ होता.. अर्थात तो ही तिच्या वडिलांच्याच मार्गावर गेला होता.. गळ्यात सोन्याची जाडजुड चैन घालून तो गल्ली बोळ्यातून दादागिरी करत फिरत असे.., शिक्षण दहावीपण कशीबशी केली होती.. बाकी काम धंदा काहीच नाही, फक्त लोकांना लुबाडणं, सरकारी पैसा खाणं आणि ऐशाआराम एवढंच त्याला जमत होतं..

आशूचे वडिल आणि भाऊ पाहता त्या दोघांचेही आशूवर बारीक लक्ष असे.. त्यामुळे कधी तिचे पाऊल वाकडे पडलेच नाही...

आज तिच्या बाबांनी सिध्दार्थच्या वडिलांना मुलीकडून पण होकार कळवून टाकला...

संध्याकाळी सिध्दार्थचे बाबा ही गोड बातमी सांगण्यासाठी पेढे घेऊनच घरी आले..

अरे सिध्ध्या.. कुठयं गं सिध्दया.. बाबांनी किचनमध्ये जाऊन आईला विचारले..

अहो असेल ना इथेच कुठे तरी.. पण झालं तरी काय.. एवढं काय ओरडताय..?” आई आपल्या कामातच बोलली..

अगं.. धर तोंड गोड कर... बाबांनी लगेच पेढ्याच्या बॉक्समधला पेढा आईला भरवला..

अहो पण झालं तरी काय..?” आई पेढा खात म्हणाली..

आधी त्या पठ्ठ्याला कॉल कर.. कुठं असंल तिथून बोलव...बाबा बॅग वगैरे बाहेर टेबलवर ठेवत म्हणाली..

आईने लगेच सिदला कॉल केला..

अगं आई जरा कामात आहे.. सिद हळूच आवाजात बोलला..

अरे लवकर ये घरी.. बाबा पेढे घेऊन आलेत...

आई.. काय तू पण.. आल्यावर खाईनच ना पेढे त्यासाठी फोन करायची काय गरज...?” सिद जरा चिडतच म्हणाला..

दे दे माझ्याकडे दे फोन.. बाबांनी आईकडून फोन घेतला.. अरे ये गाढवा.. ये पटकन घरी... गुड न्यूज आहे.. पटकन ये... बाबा त्याच्यावर रागवत पण आनंदाने बोलले..

गुड न्यूज...? कोणती..?” सिदने विचारले..

घरी ये पटकन, सांगतो... बाबा म्हणाले...

सिदने फोन ठेवला... तो विचार करू लागला कसली गुड न्यूज आता...

अर्ध्या एक तासात सिद घरी आला.. त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता..

बाबांनी त्याला पाहिल्या पाहिल्या त्याच्या तोंडात पेढा भरवला..  त्याने सगळ्यांकडे पाहिले.. तर सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद दिसला...

काय झालंय काय शामराव.. आज आपला परिवार एवढा आनंदात का दिसतोय...य़ तो त्याच्या आजोबांची नक्कल करत म्हणाला..

गधड्या... तेच म्हटलं अजून नौटंकी कसा करत नाहीएस ते.. बाबा त्याच्या डोक्यात टपली मारत म्हणाले...

सरिताबाई तुम्ही तरी सांगा.. तो आईकडे जात म्हणाला...

अरे... त्या पाहुण्यांचा होकार आला... बाबा उत्साहात म्हणाले..

तशी सिध्दार्थची बेअरिंग सुटली.. तो त्याच्या मूळ स्थितीत येऊन बोलला.. खरं... की मश्करी...

आता घ्या.. मी कशाला मश्करी करू... दुपारीच मुलीच्या भावाचा फोन आलेला.. होकार कळवला आहे.., बाबा त्याच्या तोंडात आणखी एक पेढा टाकत बोल्ले...

सिद खूशच झाला.. त्याच्या मनात आनंदाने लड्डू फुटू लागले..  तो मनातच बोल्ला.. कमाल आहे.. आजच कामाला लागलो.. तिला कळालं की काय...?? एवढ्या लवकर होकार येईल असं वाटलं नव्हतं..

तो क्यूट लाजला आणि आई-बाबांच्या आनंदात मिसळला..

संदीप-रूचा पण खूप आनंदात होते.. शेवटी आपल्या भावाचं लग्नं ठरलं.. एवढे दिवस लहान लहान समजून त्याला जे डोक्यावर चढवून ठेवलं होतं.. ते आता नाही चालणार या विचाराने संदीपच्या डोळ्यात पाणीच आलं... पण त्याने लगेच डोळे पुसले.. आणि आनंदाने ब्लूट्यूथवर गाणी लावली आणि स्पिकर ऑन करून दोघंपण नाचू लागले..

ए बजाव.. असं बोलत संदिप नाचत होता.. रूचा वहिनी पण त्याला सोबत देत होती.. मध्ये मध्ये बाबा पण त्यांच्यात मिसळले.. आई लगेच आत गेली आणि स्वयंपाकाला लागली...

त्या दिवशी आईने छान वरण भात, वांग्याची भाजी.. सोबतीला पापड, लोणच्याचा बेत आखला.. सिध्दार्थ फारच खूश होता...

आणि जेवता जेवता त्याला अचानक आठवले, तो म्हणाला.. अरे.. तुम्हाला सांगायचंच राहिलं...

आता काय..?” बाबा म्हणाले..

सगळेजणं त्याच्याकडे टक लावून पाहू लागले...

सिदने तोंडातला घास गिळला आणि म्हणाला, संक्याच्या कंपनीत जॉब लागला मला..

तसं सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला..

बरं झालं, ही तर चांगलीच गोष्ट झाली.. आई फारच आनंदीत होत म्हणाली..

बाबांना आणि दादांना मात्र प्रश्न पडला..

सिदला लगेच समजलं.. तो पुढे म्हणाला., त्याच्या कंपनीत ऑफीस बॉयची गरज होती.. तेरा हजार सॅलरी...

दादा आणि बाबांनी एकमेकांकडे पाहिलं.. वहिनीचा पण चेहरा पडला.. आईला मात्र काही समजलंच नाही..

अरे पण एवढी काय गरज होती सिध्दू..?” दादा न राहवून बोलला..

तेच ना, ऑफीस बॉयची नोकरी करणार आता तू..?” बाबा म्हणाले..

सिद मात्र गप खाली मान घालून जेवत होता..

अरे, सिध्दू.., तू लेखक आहेस.. तू हे असलं काम का...

दादांचं बोलणं मध्येच तोडत सिद म्हणाला, मग काय झालं दादा..,? लेखक असलो म्हणून काय झालं..? आणि मी काय मोठा लेखक थोडीच आहे.. सोबतीला काहीतरी काम हवंच ना..? का लग्न झाल्यावर पण तुमच्या सगळ्यांवरच अवलंबून राहू...?” सिद खूप गांभीर्याने म्हणाला..

दादा- बाबा परत एकमेकांकडे पाहायला लागले... वहिनी पण शांत होती..

माझा सिद मोठा झाला गं बाई... आईने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला.. सिद हलकासा हसला..

अरे सिध्दू पण तरी ऑफीस बॉयचं काम..?” दादा म्हणाला..

दादा, माझ्या सारख्या बारावी पास मुलाला ऑफीस बॉयशिवाय कोणती नोकरी मिळणार आहे का..?” सिद नाराजीने बोलला..

असं नका बोलू हो भावोजी.. तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लिट करण्याचा प्रयत्न करा ना.. तुम्ही मनावर घेतच नाही आहात.. वहिनी म्हणाली..

मला नाही घ्यायचं मनावर.. मला नाही जमत ते.. ते अकाउंटिग आणि बिझनेस लॉच्या डेफिनिशन डोक्यावरून जातात माझ्या.. सिद चिडत बोलला..

ठिके ठिके.. बाबा त्याला शांत करत म्हणाले.. तुला जॉब करायचा आहे ना.. कर तू जॉब.., पण जरा चांगलं काम बघ ना सिध्दू.. ऑफीस बॉय म्हणजे, कधीकधी ऑफीस झाडून पुसून पण घ्यावं लागतं..

मग काय झालं बाबा...? कोणत्याही कामाची लाज वाटू दिली पाहिजे नाही... काम हे काम असतं.. लहान मोठं असं काही नसतं.. आणि मला आशूला सांभाळण्यासाठी काम तर करावं लागेलच ना..

मस्तीखोर सिदच्या तोंडून हे ऐकून सगळ्यांनाच त्याचा अभिमान वाटत होता..

देवा.. पावलास रे मला.. अगदी योग्य मुलगी माझ्या सिद साठी निवडलीस तू.. तिच्या फक्त चाहूलीनेच माझ्या सिदमध्ये एवढा बदल झाला... ती आली तर काय काय होईल... आई मनोमन समाधानी होत बोलली..

तसे सगळेजण हसू लागले.. सिदच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित होते..

चला मग ठरलं तर.. उद्याच मुलीकडच्यांकडं जाऊन तारीख ठरवून येतो आम्ही.. त्यांच्याशी काय ती बोलणी करून येतो...

बाबा.., सिद बाबांना थांबवत बोलला..

काय रे.. बाबा म्हणाले..

तुम्ही त्यांच्याकडून हुंडा वगैरे बिल्कुल घेणार नाही आहात.. देणं- घेणं वगैरे जास्त नकोय.. मला बिल्कुल आवडणार नाही.. सिद म्हणाला..

भावोजी, तुम्हाला वाटतं का, बाबा हुंडा वगैरे घेतील म्हणून...रूचा वहिनी म्हणाली.

तेच ना.. दादा म्हणाला..

अरे माझ्या पठ्ठ्या.. मुलींच्याकडून हुंडा घेणं हा एक गुन्हा आहे.. चुकूनही तो करणार नाही.. फक्त मुलगी आणि नारळ द्या.. बाकी काही दिलं नाही तरी चालेल.. बाबा हसत म्हणाले..

नारळ पण नको.. फक्त मुलगी द्या.. सिद आणखीन मश्करी करत म्हणाला...

सगळेजण हसायला लागले...

मी काय म्हणतो.. तारीख पण कशाला ठरवायची.. जा.. सिध्या उठ.. जा आताच घेऊन ये तुझ्या आशूला... संदिप त्याला डोळा मारत म्हणाला..

अहो.. एरेंज मॅरेज आहे त्यांचं.. लव्ह मॅरेज नाही...! तसं काही असलं असतं तर कधीचेचे आले असते घेऊन.... वहिनी पण संदीपच्या वाक्याला जोडत म्हणाली..

अरे काय कमी समजताय का माझ्या सिध्द्ला... त्याने मनावर घेतलं ना खरंच घेऊन येईल तो... बाबा मश्करी करत म्हणाले..

तसा सिद लाजला.. बाबा लवकर काय ती तारीख ठरवून या.. नाहीतर...

नाहीतर कायय..?” दादा म्हणाला..

नाहीतर.. वहिनीपण म्हणाली...

सगळेजण त्याला चिडवू लागले आणि तो आणखी न लाजू लागला..

क्रमशः

 

आणि आज फायनली मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा पसंत झाला होता..... आता सिदची सगळी स्वप्नं सत्यात उतरणार होती.. त्याला हवी तशी शांत, सुंदर, संस्कारी बायको मिळणार होती.. आणि त्यांचा सुखी संसार सुरू होणार होता... कॉलेजमध्ये सगळ्या तरूण मुलींच्या गळ्यातला तावीद असणारा चॉकलेट बॉय आता आशूचं काळं मनी म्हणून मिरवणार होता..

लग्न होण्याआधी मुलं-मुली एकमेकांशी बोलतात, आपापली वेगवेगळी मतं एकमेकांशी शेअर करतात.. पण ह्या दोघांच्या बाबतीत तर असं काहीच झालं नव्हतं.., सिदला आशू पाहिल्या पाहिल्या आवडली होती.., पण आशूचं काय..? तिला तर हे लग्न मान्य नव्हतं.. कारण तिला वाटत होतं की हा सिध्दार्थचा विश्वासघात होत आहे.., नक्की काय कारण आहे त्यामुळे तिला असे वाटते..?

तुम्ही माझ्या या आधीच्या दोनही भागांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल खरच खूप आभार... !!!!

 

Bhartie "शमिका"