Mar 04, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

साथीदार..

Read Later
साथीदार..

            तो दिवस... नक्की आठवत नाही. पण रविवार होता. एका वैतागलेल्या दुपारी मी लोकल ट्रेनने घर ते कॉलेज प्रवास करत होते. ही गोष्ट त्यावेळेची आहे, जेव्हा मी बारावीत शिकत होते. 

बोर्डाची परीक्षा नाही का?

किती टेन्शन ?

काही टक्के मिळविण्यासाठी आपण किती धडपड करतो ?

आणि किती रात्री जागतात?

अगदी जीवाचे रान करतो म्हटलं तर वावगे ठर नये. 


             त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे कॉलेजला जात होते. पण आजचा दिवस अति महत्वाचा होता. कारण हा प्रयत्न पाहणार नसून परिक्षा घेणारा दिवस होता. आज पहिला पेपर होता. विषय काय माहित आहे ?

भौतिकशास्त्र..! 

आधीच माझं आणि भौतिकशास्त्राचं जन्माचं वाकडं. त्यात कमी गुण पडल्यावर घरी काय तोंड दाखवणार ? माझ्या मनाची घालमेल सुरु होती.

 देवा.. आज काही खरे नाही.. अभ्यास झाला नाही.. असे हजारो विचार क्षणात माझ्या डोळ्यांसमोर फिरत होते. शेवटी काही विचार करून मी ठरवले आणि त्या लोकल ट्रेनच्या डब्याच्या दारात जाऊन उभी राहिले. ट्रेन धावत होती आणि मी बाहेर बघत होते. रुळावर बरचसे छोटे छोटे दगड होते. म्हणजे पडले तर चांगलंच लागलं असतं. क्षणभर विचार करून मी माझी घट्ट असलेली पकड सोडली आणि मी बाहेर फेकले गेले. आता स्वर्गात की नरकात असे विचार चालू असतानाच कळले.. मी तर बाहेर पडलेच नाही आहे. कोणीतरी माझा हात घट्ट पकडला होता. इतका की मी ताकदीने उडी मारायचं म्हटलं असतं तरी उडी मारली गेली नसती. 

          

सुमित : “तू मूर्ख आहेस का? तू हार का मानत आहेस ?”


            माझ्या तोंडून एक शब्दही निघत नव्हता. त्याने मला माझ्या सीटवर आणले. काही क्षणांच्या शांततेनंतर मी बोलू लागले. 


अर्चना : “तुला माझी सीट कशी माहित ?”


सुमित : “मॅडम, मी बराच वेळ तुमच्या बाजूला बसलो आहे. पाहिलं नाहीस आणि आज आत्महत्या करायचा विचार होता का ? 


अर्चना : “नाही.” 

मी चांगलीच घाबरले होते. हा कोण माणूस ? हा माझ्याशी का बोलतोय ? 

माझे विचार जणू त्याला कळलं होते. 


सुमित : “मला तुझा मित्र समज. पेपर इतका महत्त्वाचा नाही की आयुष्य संपवून टाकावंसं. प्रयत्न तर कर. ” 


अर्चना : “तुला कसं कळलं माझा पेपर आहे ? ”


सुमित : “मॅडम, तुम्ही युनिफॉर्म घातला आहे. शुद्धीवर या जरा. ”


सुमितला तिच्या सैरभैर चेहऱ्याचं हसू येत होत. 

मी पूर्ण शुद्धीत आले होते. संपूर्ण प्रवास संपेपर्यंत तो माझ्याशी बोलत होता. त्याच्या बोलण्याने मला माझ्या आयुष्याची किंमत कळायला मदत झाली. तो एक अनोळखी मित्र होता. जो माझ्या साथीने उभा होता. मी सर्व पेपर दिले आणि प्रत्येक पेपरच्या आधी लोकल ट्रेनमधील माझ्या प्रवासात तो माझा साथीदार बनला.


             आज मी एका चांगल्या पगाराच्या कंपनीत काम करते. पण आजही असा कठीण प्रसंग आला की मला तो दिवस आणि तो माझा मित्र आठवतो. जो कठीण प्रसंगातही माझ्या सोबत उभा राहून मला जणू सांगत असतो, की प्रयत्न तरी कर. 


सुमित : “अर्चना, तुला बाहेर जायचं आहे ना ?” 


 चला डायरीबाई, मला जायला हवं. अरे हो...सांगायचंच राहिलं. तो अनोळखी मित्र आज माझा जीवनसाथी आहे जो मला कायमच माझ्या जीवनाचं मोल समजावून देतो. दोन वर्षांपूर्वीच आमच्यातील मैत्रीचं नातं प्रेमात बदललं गेलं आणि आम्ही विवाह बंधनात अडकलो. त्याच्यासोबतच्या त्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा देत हे उरलेलं जीवन जगायचा मी निर्धार केला आहे.


त्याच त्या गोड प्रवासात..

ते अनोख्या मैत्रीचे नाते जुळले..

साथीदार झालास तु माझा.. 

मी तुझी जीवनसंगिनी बनले..

      

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

T

.

.

//